पिरयाॅडिक चित्रपटाचा सध्या ट्रेंड सुरु आहे. रोज रोजची लव्ह-स्टोरी पाहण्यापेक्षा इतिहासातील काही महत्वाच्या आणि सत्य घटना पाहायला लोकांना आवडतात. म्हणूनच हे चित्रपट भरघोस कमाई करतात. आता आणखी एका चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासातील एक नवे पान उघडले जाणार आहे. ती घटना म्हणजे पानिपतची लढाई. या लढाईवर आधारीत ‘पानिपत’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. पण नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि ज्या कोणाला या चित्रपटाकडून फार अपेक्षा होती त्या अनेकांचा ट्रेलर पाहूनच पुरता हिरमोड झाला आहे. याचा परिणाम असा की, ट्रेलर खालीच लोकांनी कमेंटस द्यायला सुरुवात केली आहे. आता हा ट्रेलर पाहिल्यानंतर आणि लोकांच्या कमेंटस वाचल्यानंतर लोकांना काय खटकलं ते आधी जाणून घेऊया.
संजय दत्तला आतापर्यंत आपण अनेक भूमिकांमधून पाहिले आहे. त्याला निगेटीव्ह भूमिकेत या आधीही पाहिले आहे. पण अहमद शहा अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त उठून दिसत आहे. त्याचा मेकअप त्याचा लुक परफेक्ट झाला आहे.त्यामुळे त्याच्या अभिनयाची त्याच्या रोलची आणि त्याच्या निवडीची सगळीकडे तारीफच होताना दिसत आहे.
मंगळवारी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर 6 डिसेंबर रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. आता ट्रेलरवर नाक मुरडताना चित्रपटाला जाण्याची पसंती लोक देतात का ते पाहावे लागेल.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.