१० गोष्टींतून मुली व्यक्त करतात प्रेम, जाणून घ्या या गोष्टी (Signs That She Loves You In Marathi)

१० गोष्टींतून मुली व्यक्त करतात प्रेम, जाणून घ्या या गोष्टी (Signs That She Loves You In Marathi)

प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते हे मान्य आहे. पण मुलींच्या काही गोष्टी या थोड्याफार फरकाने सारख्याच असतात. त्या तुमच्यावर खरचं प्रेम करत असतील तरच या गोष्टी त्या तुमच्यासोबत करतात.किंवा त्यांना त्या फक्त तुमच्यासोबतच करायला आवडतात.आम्ही अशाच काही १० गोष्टी काढल्या आहेत. ज्यातून मुली आपले प्रेम व्यक्त करत असतात. पण जसं आम्ही म्हटलं की, प्रेम करणयाची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पण काही अंशी ही परिमाणे तुम्हाला तुमचे खरे प्रेम मिळवून द्यायलाही मदत करु शकेल. 


10 एखाद्या मुलीने आपल्याला आवडते असे चिन्हे (Signs That She Loves You)


वेगवेगळ्या नावांनी हाक मारणे


आता कितीतरी मुलांना माहीत असेल की, मुली त्यांना कोणकोणत्या वेगळ्या नावांनी हाक मारतात ते. शोना, बच्चा, पिल्लू, माऊ, बेबी, स्विटी, बबू, बाबू, बच्चा, बाळा,सोनू,जानू अशी अनेक नाव घेऊन मुली प्रेम व्यक्त करत असतात. जर नवीन रिलेशन असेल तर अशा प्रेमळ नावाने हाक मारायची हौस असते. त्यांच्या बॉयफ्रेंडला कोणत्या नावाने हाक मारायची याचा खूप विचार करतात. त्यामुळे प्रेमात सगळ्यात आधी मुली मुलांसाठी गोड पेटनेम शोधतात. जर तुमचेही रिलेशनशीप आता सुरु झाले असेल तर तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल.


love you 3


लाडात येणे


मुलींना आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे ते लाड करत असतात त्यात प्रिय बॉयफ्रेंड तर आलाच ना !  बॉयफ्रेंड कसाही असला तरी मुलींना त्यांचं कौतुकच असते. त्याचे लाड कसे करायचे याचा विचार मुली कायम करत असतात. जर तुम्ही दोघे बाहेर असाल तर तुमचे गाल ओढणे, तुमच्याशी सारखे प्रेमाने बोलणे,तुम्हाला फोन करुन तुमची चौकशी करणे मुलींना आवडत असते. कधीकधी तर मुली बॉयफ्रेंड जवळ असल्यावर अशा काही वागतात की, इतरांना हसायला येते. पण त्यांच्यासाठी त्याच्या बॉयफ्रेंडचे लाड करणे महत्वाचे असते. त्यांना फक्त त्यांच्या बॉयफ्रेंडला खूश ठेवायचे असते.


उदा. उगीचच फोन करुन गोड-गोड बोलणे. जानू तु जेवलास का? आज मला तुझी खूप आठवण येत आहे.  तुम्हाला ठेवलेल्या नावाने हाक मारुन तुम्हाला हसवणे.


love you 1


स्तुती करणे


लाड करायला मुलींना जसं आवडतं अगदी तशीच मुलांची स्तुती करायला मुली चुकत नाहीत. मुलींनाच कायम स्तुती हवी असते हा गैरसमज आहे. त्यांना तुम्ही नोटीस करावे इतकीच अपेक्षा असते. एखादी साधी गोष्ट मुलांनी नीट केली तरी मुलींना त्यांची स्तुती करायची असते. त्यांचा अभिमान त्यांना अचानक वाटायला लागतो. मग त्या मुलावर स्तुतिसुमने उधळायला लागतात. 


उदा. मुलाने साधे पाणी जरी गरम केले. तर मुलींना तू आज किती काम केले याचे कौतुक असते. एखादी नवी गोष्ट शिकण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना त्याचे इतके कौतुक असते की विचारायची सोय नाही.


love you 2


पुरुषांच्या सेक्स फॅन्टजीस काय आहेत माहीत आहे का? 


सारखा हट्ट करणे


मुली म्हटल्या की हट्ट आलाच. असा सर्वसामान्य मुलांचा समज आहे. पण  हा हट्ट प्रत्येकवेळी तुमच्याकडे काहीतरी मागण्याचा नसतो तर बरेचदा मुलींना आपल्या बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवायला आवडत असते. म्हणून त्या भेटण्यासाठी काही तरी कारण काढत असतात. त्यातच जर तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये असाल तर ही ओढ अधिक असते. तुम्हाला भेटून तुम्हाला जवळ घेण्याची हातात हात पकडून चालण्याची झालेल्या सगळ्या गोष्टी सांगण्याची घाई त्यांना असते. त्यामुळे त्या बरेचदा हट्टीपणा करतात. शिवाय मुलींना त्यांचे बॉयफ्रेंड नेहमीच केअरींग असावे असे वाटत असते. त्यामुळे कधी-कधी त्याच्यासमोर त्या लहानसुद्धा होतात. त्यांच्या मिठीत बसून राहायला. थिएटरमध्ये अगदी घट्ट मिठी मारुन बसायला त्यांना आवडते किंवा तुम्हाला किस करायचे असते. अस काही मुली वागत असतील तर तुम्हाला त्यांच्या प्रेमाचा अंदाज आपोआप येईल.


insitance


सरप्राईज देणे


मुलींना मुलाकडून सरप्राईजची अपेक्षा असते असेच नेहमी सगळ्यांना वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का? की मुलींना मुलांना सरप्राईज द्यायला आवडत असते. एखादी डेट प्लॅन करण्यासाठी त्या सतत धडपड करत असतात. काहीही स्पेशल नसेल तरी त्यांना तुम्हाला भेटून छोटसं सेलिब्रेशन करायचंच असतं. आता तुम्हाला माहीत आहे की, मुलींना तुम्ही भेटल्यापासून ते अगदी भांडण्यापर्यंतच्या सगळ्या तारखा लक्षात असतात. त्यानुसार चांगल्या दिवसाची आठवण कायम राहावी यासाठी  त्या काही तरी प्लॅन करतात. एखादी डेट किंवा मग कँडल लाईट डिनर प्लॅन करत असतात. तुम्हाला खूश करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. तुमच्यासाठी तुम्ही खूपच महत्वाचे झाले असतात. तुम्हाला या गोष्टी जमत नसतील तरी न रागावता मुली काहीनाकाही प्लॅन वेळ काढून करतात. 


उदा. एखादा दिवस सेलिब्रेट करता आला नाही तर थोडं वाईट त्यांना वाटत. पण लगेच तुम्हाला खूश करण्यासाठी जमेल त्या दिवशी त्या प्लॅन करायला तयार असतात. अगदी साधी भेटसुद्धा त्यांना खूप मोलाची वाटते


surprise-2


मी फक्त तुझीच


मुली जितक्या त्यांच्या बॉयफ्रेंडसमोर लहान मुलांसारख्या वागतात. पण कठीण प्रसंगी त्या समजूतदारपणा दाखवतात. मुली मुलांना आपण समजूतदार आहोत हे दाखवत असतात. कारण त्यांना मी तुझ्यासाठी कशी परफेक्ट आहे हे दाखवायचे असते त्यामुळे त्या अनेक कठीण प्रसंगात त्या आवडीने आपण किती समजूतदार आहोत हे दाखवतात. तसे करुन ते आपलं प्रेमच व्यक्त करत असतात.


perfect couple


संशय घेऊन प्रेम व्यक्त करणे


प्रेम व्यक्त करण्याचे अनेक प्रकार असतात. त्यापैकीच एक आहे संशय घेणे. आता मुलींचा स्वभावच असतो संशय घेणे असे अजिबात नाही. मुली विनाकारण संशय घेत नाही.जेव्हा त्यांना तुम्हाला गमवायचे नसते तेव्हा त्या संशय़ घेतात. यातही त्यांचे प्रेम असते. पण म्हणून मुलींची परीक्षा घेऊ नका. कारण एकदा तुम्ही त्यांना संशय येण्यासारखे वागत राहाल मग त्या असे रुप धारण करतात त्याचा  मुलांना नक्कीच त्रास होऊ शकतो. काय मुलींनो बरोबर ना?


taking doubt


डर्टी टॉक्स


डर्टी टॉक म्हणजे वाईट गोष्ट नाही. आपल्या जवळच्या व्यक्तिसोबत डर्टी टॉक करायला खूप जणांना आवडतं आणि त्यात काही वाईट नाही. त्या निमित्ताने मुलांना मुलींच्या फॅन्टसीज कळायला मदत होते.


उदा. तू आज काय आज आत काय घातलं आहे? तुला कोणत्या प्रकारचं किस करायला आवडेल? माझा कोणता बॉडी पार्ट तुला आवडतो? या आणि अशा बऱ्याच गोष्टी यात येतात. यामध्ये नक्कीच सेक्सच्या गोष्टीसुद्धा असतात. पण इतकं गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये चालते आणि त्यात काहीच वावगे नाही . उलट नॉटी टॉक त्याचवेळी होते जेव्हा मुलींचा मुलावर खूप विश्वास असतो. तेव्हा मुलांनी देखील ही गोष्ट ओळखून मुलींशी असं बोलताना जबाबदारीने वागणे गरजेचे असते.  


talk dirty


बॉयफ्रेंडसोबत तुम्हाला खेळायचे आहेत का काही सेक्सी गेम्स? मग वाचाच


सेक्शुअल बोलणे 


या आधीही आम्ही तुम्हाला सांगितले आहे की, सेक्सबद्दल बोलणे कधीच वाईट नाही. डर्टीटॉक करता करता कधी कधी ही गोष्ट सेक्सपर्यंत जाते. हे सेक्शुअल बोलणे म्हणजे एखादी सेक्स पोझीशनही असू शकते किंवा सेक्सबद्दल त्यांच्या मनात काय भावना आहेत हे देखील असू शकते. मुलींना त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत सेक्सबद्दल  बोलायला आवडत असते. त्या तुमच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या असतात. आणि त्याहीपेक्षा अधिक विश्वास त्यांचा तुमच्यावर असतो. अशा गोष्टी बोलल्याने तुम्ही अधिक कम्फर्टेबल होता आणि रिलेशनशीप आणखी घट्ट होते.पण या गोष्टीचा वाईटअर्थ घेणाऱ्यांपासून सावध राहणे दोघांनीही गरजेचे असते. 


seductive talk


सेक्स करताना तुमच्या मनातही येतात का काही प्रश्न


काहीतरी नवीन करण्याची हौस


काहीतरी नवीन करायला कोणाला आवडत नाही? मुलींना प्रेमात नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात. जर तुम्ही रिलेशनशीप असताना फिजीकली क्लोज असाल तर सेक्स ही गोष्ट आलीच. मग अशावेळी काहीतरी नवीन करण्याची इच्छा मुलींना असते. सेक्सच्यावेळी इडिबल गोष्टींचा वापर करण्याबाबत तुम्ही नक्कीच ऐकले असेल.हे असं काहीतरी ट्राय करण्याची इच्छा देखील मुली व्यक्त करतात. त्यातूनही त्या तुमच्यावरील प्रेम व्यक्त करत असतात.


उदा. किस करताना चॉकलेट, चॉकलेट सॉस किंवा विप्ड क्रिम अंगाला लावणे आणि ते लावून सेक्स करण्याची इच्छा व्यक्त करणे.


fantacy


फोटो सौजन्य- Instgram, Giphy