Vagina च्या बाबतीत या 10 गोष्टी प्रत्येक महिलेला माहिती हव्यातच!

Vagina च्या बाबतीत या 10 गोष्टी प्रत्येक महिलेला माहिती हव्यातच!

अर्धवट माहिती ही बऱ्याचदा आपल्याला हानी पोहचवू शकते. विशेषतः ती गोष्ट आपल्या आरोग्याशी निगडीत असेल तर जास्तच घातक असते. तुमच्या प्रायव्हेट पार्टच्या आरोग्यबद्दल ही गोष्ट असेल तर तुम्ही अगदी बोलायला अथवा सांगायलादेखील लाजता. पण असं करणं हे चुकीचं आहे. आपण आज Vagina Health बद्दल जाणून घेणार आहोत. याची माहिती प्रत्येक मुलीला - महिलेला असायलाच हवी. यामध्ये लाज बाळगण्यासारखं काहीच नाही. तुम्हाला जर या गोष्टींची लाज वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहात हे समजून जा.


1. Vaginal दुर्गंधी


vagina


प्रत्येक शरीराचा स्वतःचा असा एक गंध असतो. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की तुमच्या व्हजायनामधून काही गंध येत आहे. पण त्याने तुम्ही गोंधळून जायची अजिबात गरज नाही. कारण बऱ्याचदा घाम आणि डिस्चार्जच्या कारणामुळेसुद्धा असं होण्याची शक्यता असते. एका साध्या आंघोळीनंतर हा गंध निघून जातो. पण असं तुम्हाला सतत जाणवू लागलं तर मात्र तुम्हाला आपल्या डॉक्टरकडे जाऊन तपासणी करण्याची आवश्यकता आहे. पण हे असं होत असेल तर लाजेने घरात बसू नका. वेळच्यावेळी जाऊन डॉक्टरांशी सल्लामसलत करा.


2. केसांचं काय करायचं


आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की, Pubic Hair अर्थात खाली आलेल्या केसांचं काय करायचं. तुम्ही ते तसेच ठेवायचे की, काढून टाकायचे अर्थात बिकिनी वॅक्स करायचं हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. या केसांचा तुमच्या व्हजायनाच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नसतो. फक्त हे केस काढताना वा शेव्ह करताना काळजी घेणं आवश्यक आहे.  


3. White डिस्चार्ज


तुम्हाला जर हे माहीत नसेल तर जाणून घ्या की व्हजायना हा आपल्या शरीराचा असा भाग आहे जो स्वतःची स्वच्छता स्वतः करत असतो. डिस्चार्ज हा याच सफाईचा एक भाग आहे. त्यामुळे तुमच्या मासिक पाळीनंतर जर तुम्हाला डिस्चार्ज होत असेल तर तुम्ही त्याची काळजी करू नका. हे डिस्चार्ज पांढऱ्या रंगाचं जोपर्यंत आहे तोपर्यंत काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही. पण जर याचा रंग हलकासा पिवळा झाला आणि याचा जास्त दुर्गंध यायला लागत तर मात्र तुम्हाला स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जायला हवं.


4. Spotting चा त्रास


heating bag


तुम्हाला जर मासिक पाळीच्या आधी वा नंतर अनियमित spotting होत असेल तर ही तुमच्या शरीरातील अंतर्गत समस्या आहे. त्यामुळे कोणतीही वेळ न दवडता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. यातूनच तुमची ही समस्या दूर होऊ शकेल. अशावेळी आपल्या आई - वडिलांना सांगण्याची लाज बाळगू नका.


5. कोरडेपणा ही साधी समस्या


vagina dryness


व्हजायनामध्ये कोरडेपणा जाणवणं ही साधी समस्या आहे. यासाठी तुम्हाला डोक्याला ताण देण्याची गरज नाही. तुमच्या शरीरातील हार्मोनल बदल अथवा येणाऱ्या ताणामुळे असं होतं. कोरडेपणा आल्यामुळे सेक्स करतानामात्र तुम्हाला दुखू शकतं. पण यावर उपचार घेऊन तुम्ही ही समस्या दूर करू शकता.


6. clitoris Sore


Clitoris vulva च्या आत एक छोटा आणि संवदेनशील भाग असतो. सेक्सदरम्यान जास्त प्रमाणात stimulation अथवा masturbation मुळेसुद्धा Clitoris ला त्रास होण्याची शक्यता असते. तसंच तुम्ही जर जास्त वेळ स्किनी जीन्स घालून राहिलात तरीही ही समस्या येण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या.


7. व्हजायना घट्ट आणि सैल होणं


ज्या महिला जास्त वेळा सेक्स करतात त्यांचे व्हजायन मसल्स सैल होतात असा साधारणतः एक गैरसमज आहे. वास्तविक ज्या महिला कमी सेक्स करतात त्यांच्याबरोबर सेक्स करायला पुरुषांना जास्त आनंद मिळतो. त्या स्वतःदेखील जास्त चांगल्या प्रकारे सेक्सचा आनंद घेऊ शकतात. व्हजायनाचे मसल्स हे Tissues Naturally कमी होऊन आपल्या आकारात येतात. त्यामुळे तुम्ही सेक्शुअली किती अॅक्टिव्ह आहात याने काहीच फरक पडत नाही.


8. व्हजायनाचा आकार आणि रंग


बऱ्याचदा इंटरनेट अथवा अन्य कोणत्याही ठिकाणी काही बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की, तुमच्या व्हजायनाचा आकार अथवा रंग असा नाही. पण तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही काळजी करू नका. आपल्या शरीराचे भाग हे दुसऱ्यांच्या शरीराच्या भागापेक्षा कमी जास्त प्रमाणात आकार आणि रंगामध्ये लहान अथवा मोठे असू शकतात.


9. जळजळ, खाज अथवा रक्तस्राव


व्हजायनाचा रंग गडद अथवा हलका असणं हे अतिशय नॉर्मल आहे. मात्र तुमच्या लेबियावर पांढऱ्या रंगाचे चट्टे तुम्हाला दिसत असतील तर हे नक्कीच काळजीचं कारण आहे. तुमच्या व्हजायनामध्ये जळजळ, खाज अथवा रक्तस्राव होत असल्यास, तुम्हाला काहीतरी आजार असल्याची लक्षणंही असू शकतात. त्यामुळे असं काही जाणवल्यास, तुम्ही वेळच्यावेळी डॉक्टरांना भेट द्या.


10. सेक्स दरम्यान ejaculate होणं


तुम्हाला सेक्स करताना लघवी करायला जावं लागलं आणि नंतर पुन्हा परत आल्यानंतर तुम्हाला तितकी मजा येत नसेल तर हे नॉर्मल आहे. पण थोड्यावेळाने तुम्हाला पुन्हा तो उत्साह जाणवेल. अथवा एखादी पॉर्न फिल्म पाहताना किंवा सेक्सबाबत वाचत असताना तुम्हाला ejaculate (vagina मधून fluid बाहेर येणं) होत असल्यासदेखील काहीही समस्या नाही. असं झाल्यास तुम्हाला नक्की चांगलं वाटेल. याबाबत जास्त विचार करू नका.


फोटो सौजन्य - Stutterstock.com


हेदेखील वाचा


यीस्ट इन्फेक्शनशिवाय ‘या’ ५ कारणांनीही येऊ शकते व्हजायनामध्ये खाज


म्हणून महिलांनी नियमित वापरायला हवे ‘पँटीलायनर’


पहिल्या सेक्सचा अनुभव होता खास ...वाचा महिलांना नेमकं काय वाटलं