ADVERTISEMENT
home / भविष्य
वार्षिक भविष्य कर्क (Cancer)राशी : नववर्षात गतवर्षाच्या संघर्षाची फळे मिळतील पण काळजी घेतली तर…

वार्षिक भविष्य कर्क (Cancer)राशी : नववर्षात गतवर्षाच्या संघर्षाची फळे मिळतील पण काळजी घेतली तर…

२०१८ हे वर्ष कर्क (Cancer)राशीच्या लोकांसाठी संघर्षमय होतं. परिश्रम जास्त मात्र त्यामानाने मोबदला कमी अशी तुमची स्थिती होती. मात्र परिश्रम कधीच व्यर्थ जात नाहीत. याचा अनुभव तुम्ही या वर्षात घेऊ शकतात. तरीही नववर्षातील काही कालखंडात कर्क राशीच्या लोकांना सावधानता बाळगावी लागणार आहे. तेवढी बाळगली तर हे नववर्ष आपल्यासाठी भरभराटीचे ठरणार आहे. तेव्हा चला मग सविस्तर जाणून घेऊया हे नववर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी कसे असेल…

कर्क राशीचं स्वभावविशेष

खेकड्यासारखं कठोर प्राण्याचं प्रतिक असलं तरी कर्क राशीचे लोक फारच हळव्या स्वभावाचे असतात. ही चंद्राच्या अंमलाखाली येणारी जलतत्त्वाची राशी आहे. अतिशय संवेदनशील, कोमल अंत:करण, आपल्या आजुबाजुला घडणा-या गोष्टींचा तत्काळ परिणाम कर्क राशीच्या व्यक्तींवर होत असतो. मातृत्व हा या राशीचा प्रमुख गुण आहे. कर्क राशीचे लोक कोणत्याही परिस्थितीत फारच भावनिक होतात. जे काही ठिकाणी चुकीचंही असतं. त्यामुळे या राशीच्या लोकांनी आपली बुद्धी प्रगल्भ करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. जेणेकरुन भावनिकतेला थोडा लगाम घालता येईल. आयुष्य आपण एकट्याने जगत नसतोच. त्यामुळे मान-अपमान या गोष्टी प्रत्येकासाठी लागू असतातच, हे सत्य आपण लक्षात घेतले पाहिजे. ही राशी भौतिक सुखांपेक्षा प्रेमावर मनापासून प्रेम करणारी आहे. घेण्यापेक्षा देण्याकडे या राशीचा कल अधिक असतो. देण्याबरोबरच मिळण्याची अपेक्षा करणे हे स्वाभाविकच आहे. मात्र ते प्रत्येकवेळी तुम्हाला मिळेलच हे गरजेचं नाही.

तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असा काळ

ADVERTISEMENT

आपल्या राशीच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार 2018 या नववर्षात आपण खूप काही सहन केलं आहे. बराच संघर्ष केला आहे. येणारं नववर्ष या संघर्षाचे फळ आपल्याला देणार आहे. कारण 2019 ची सुरुवात होत आहे, पंचमेश आणि भाग्येश यांच्या परिवर्तन योगातून. या परिवर्तन योगाचा ठळक परिणाम आपल्या आयुष्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणाल ती पूर्व दिशा या कालखंडात असणार आहे. जे काम हाती घ्याल त्यात यश देणारा अद्वितीय असा हा योग आहे, असे असले तरी जास्त हुरळून जाऊ नका. कारण लग्नस्थानातून राहू महाराज एकाचवेळी दोघांवर दृष्टी टाकत आहेत. त्यातून जडत्व निर्माण होत असते. तुमच्या बुद्धीवर बसलेले हे जडत्व तुम्हाला निर्णय घेण्यात अडचणी निर्माण करु शकतं.

खर्चिक वृत्ती वाढणार

2018 या संपूर्ण वर्षभरात तुम्ही राहू महाराजांच्या लग्नस्थानातील अस्तित्वामुळे तणावात होतात. 2019 या नववर्षाच्या सुरुवातीलाही राहू महाराजांचे अस्तित्व तिथेच आहे. मात्र दि. 6 मार्च 2019 ला राहू राशी परिवर्तन करुन वृषभ राशीमध्ये जात आहे. त्यामुळे मानसिक अशांती, टेन्शन, परिश्रमांचा मोबदला कमी मिळणे आदी सर्व प्रकारच्या गोष्टींमधून तुमची सुटका होणार आहे. पंचमातील गुरु महाराजही तुम्हाला या कालखंडात गोड फळं देणार आहेत. मार्च, एप्रिल, मे हा कालखंड कर्क राशीच्या जातकांसाठी आनंदाचा असणार आहे. मात्र दि. 7 मे 2019 रोजी मिथुनेत निर्माण होणारा राहू – मंगळ अंगारक दोष तुमच्यात आळस निर्माण करु शकतो. सोबतीला खर्चिक वृत्तीही वाढू शकते. याशिवाय दि. 22 जून ते 7 ऑगस्ट 2019 या कालखंडात संताप, चिडचिड वाढणार आहे. कारण तुमचा राजयोगकारक मंगळ तुमच्या राशीत निचीचा होऊन बसणार आहे. त्यामुळे या कालखंडात पैशांच्या व्यवहारात फसगत होण्याचे योग आहेत किंवा कर्जबाजारी होण्याची लक्षणंही दिसत आहेत. असं असलं तरी लगेचच दि. 17 ऑगस्ट 2019 ला सिंहेत होणारी मंगळ-रवि युती पराक्रम गाजवि­ण्याचा योग निर्माण करीत असून धनवृद्धी करणार आहे. त्यामुळे आधीच्या कालखंडात शांत बसून या कालखंडात मिळालेल्या संधीचा पूरेपूर लाभ आपण घेतला पाहिजे.   

2019 हे वर्ष आर्थिक फायद्याचं

ADVERTISEMENT

थोडेसे उतार-चढाव असले तरी ग्रहांच्या स्थितीनुसार थोडी काळजी घेतली, परिश्रम घेतले तर 2019 हे वर्ष तुमच्या आर्थिक फायद्याचंच वर्ष आहे. त्यामुळे व्यवस्थित समजून उमजून आपण वर्षभरातील ग्रहस्थितीचा लाभ घेतला पाहिजे. विशेषत: इम्पोर्ट – एक्सपोर्टचा व्यवसाय असणा­-यांसाठी तर हे वर्ष अधिक लाभदायक ठरु शकते. या नववर्षात परदेशगमनाची, व्यवसाय वृद्धीची, नोकरीत प्रमोशन आणि बदली अशा अनेक संधी आपल्याला कार्यक्षेत्रानुसार मिळू शकतात. मात्र हे सहजासहजी मिळणार नाही. मार्गात अनेक अडथळे आहेत. तरीही मिळालेल्या  संधीचा पूरेपूर लाभ करुन घेणं हे तुमच्यावरच अवलंबून असणार आहे.

नोव्हेंबरनंतर विशेष काळजी घ्या

विशेषत: या वर्षात आपल्याला स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच कर्जापासून दूर राहणेही आपल्यासाठी फायद्याचं राहिलं. दि. 5 नोव्हेंबर 2019 रोजी गुरु महाराज आपल्या स्वराशीत म्हणजेच धनु राशीत प्रवेश करतील. परिणाम स्वरुप गुरु – केतु हा चांडाळ योग निर्माण होणार आहे. त्यामुळे आपल्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून त्रासही संभवतो. अवास्तव खर्चही वाढू शकतात. त्यात भरीसभर म्हणून वर्षाच्या अखेर षष्टात रोग, शत्रू आणि कर्जाच्या घरात शनि, गुरु व केतू या ३ मातब्बर ग्रहांचं वास्तव्य असणार आहे. त्यामुळे आपल्याला विशेष अशी काळजी घ्यावी लागणार आहे.

कर्क राशीमध्ये नववर्षात ग्रहांची स्थिती लक्षात घेता आपली प्रगती शक्य आहे. मात्र त्यासाठी आपल्याला थोडी काळजी घ्यावीच लागणार आहे. हे नववर्ष आपणास आरोग्यदायक, लाभदायक, प्रगतीदायक जावो, यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

शुभं भवतू|

लेखिकेचा संपर्क मेल आयडी : jyotishbhaskarjjoshi@gmail.com

हेही वाचा : 

वार्षिक भविष्य 2019 : मेष रास

ADVERTISEMENT

वार्षिक भविष्य 2019 : वृषभ रास

वार्षिक भविष्य 2019 : मिथुन रास

04 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT