अक्षय कुमारसाठी 2019 ठरलंय लकी! एका वर्षात 1000 कोटींची कमाई

अक्षय कुमारसाठी 2019 ठरलंय लकी! एका वर्षात 1000 कोटींची कमाई

वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार कामाच्या बाबतीत नेहमीच सिरिअस असतो. त्याच्यासाठी काम हे सगळ्यात आधी आणि त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आहेत.त्यामुळेच तो वर्षभरात तो 7 ते 8 चित्रपटांचे शुटींग पूर्ण करतो. त्याची हीच जिद्द आणि हीच चिकाटी त्याला यशाकडे घेऊन जाते. त्यातच 2019 हे वर्ष त्याच्यासाठी फारच लकी ठरलंय कारण त्याच्या चित्रपटांनी तब्बल 1000 कोटींची कमाई केली आहे. 2016 पासून एका मागोमाग एक हिट चित्रपट देणारा अक्षय कुमार बॉलीवूडचा मेगा सुपरस्टार ठरला आहे. वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट निवडून अक्षयने 2019 स्वत:साठी शुभमंगल करुन घेतले आहे.

अभिनेता सुबोध भावे लवकरच येत आहे एका नव्या भूमिकेत

सगळ्यात जास्त मानधन

Instagram

अक्षय कुमारच्या करिअरचा ग्राफ पाहता त्याने वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटात काम केल्याचे लक्षात येते. शिवाय त्याने केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर हमखास चालतात. त्याच्या या कामामुळेच तो सध्याच्या घडीला सगळ्यात मानधन घेणारा अभिनेता आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार जून 2016 पासून ते जून 2019 पर्यंत तब्बल 444 कोटींची कमाई केली आहे. 

2019 साल म्हणून ठरलं लकी

अक्षय कुमारचे ‘केसरी’, ‘मिशन मंगल’, ‘हाऊसफुल 4’, ‘ गुड न्यूज’ हे चित्रपट 2019 साली रिलीज झाले आहेत. त्यापैकी गुड न्यूज चित्रपट डिसेंबरला रिलीज होणार आहे. केसरी या चित्रपटाने अक्षयने त्याच्या वर्षाची सुरुवात केली. सारागढी युद्धावर आधारीत असलेला त्याचा हा चित्रपट खूप चालला. तर ‘मिशन मंगल’ इस्रोच्या मंगळ मिशनवर आधारीत हा चित्रपट होता. नुकताच रिलीज झालेला ‘हाऊसफुल 4’ हा चित्रपट कॉमेडी होता. तर ‘गुड न्यूज’ हा चित्रपट ही कॉमेडीपटात मोडणारा आहे.  मिशन मंगल आणि हाऊसफुल या चित्रपटांनी तर प्र्त्येकी 200 कोटींचा गल्ला पार केला आहे. 

बॉडी शेमिंगवर इलियानाने ट्रोलर्सला दिले सडतोड उत्तर

सूर्यवंशी चित्रपटात दिसणार अक्षय

Instagram

आता राहिला प्रश्न अक्षयच्या अपकमिंग चित्रपटांचा तर लोकांना प्रतिक्षा आहे ती त्याच्या सूर्यवंशी या चित्रपटाची. कारण सिंबाचा सिक्वल असलेला हा चित्रपट. रोहित शेट्टीचा असून या चित्रपटात अक्षय कुमार पोलीसाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा एक लुक सिंबा चित्रपटाच्यावेळीच दाखवण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपटही मेगा हिट असणार आहे. 

अक्षय कुमार आणि शिस्त

इंडस्ट्रीमध्ये अत्यंत शिस्तप्रिय असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यापैकी एक आहे अक्षय कुमार.. सकाळी उठण्याची त्याची सवय अगदी जगजाहीर आहे. कोणतेही शूट असो तो सगळ्यांना सेटवर पहाटेच हजर राहायला सांगतो. शिवाय चित्रपटांच्या शुटींगसाठी लागणारा वेळही त्याला आवडत नाही. त्याच्या चित्रपटाचे शुटींगही लवकर होते. त्याच्यासोबत काम करणाऱ्या को- स्टार्सनाही त्याच्या या शिस्तीचा फटका बसतो असे देखील अनेक सेलिब्रिटींनी सांगितले आहे. पण तरीदेखील त्याच्यासोबत कामाची मजा असते असे देखील सेलिब्रिटी म्हणतात.

 

 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.