#2020 मध्ये या सेलिब्रिटीजच्या घरी आले लहान पाहुणे, पहिल्यांदाच झाले आई-वडील

#2020 मध्ये या सेलिब्रिटीजच्या घरी आले लहान पाहुणे, पहिल्यांदाच झाले आई-वडील

2020 हे वर्ष प्रत्येकासाठीच चढउतार असल्याचं गेलं आहे. काही जणांना खाण्याचीही चिंता सतावत होती तर काही जणांकडे किमान दोन वेळ डोकं टेकवायला तरी जागा होती. मात्र काही सेलिब्रिटीजच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन झालं आणि त्यांच्यासाठी मात्र हे वर्ष अत्यंत सुखाचं गेलं. तर काही सेलिब्रिटींनी आपल्याकडे नव्या वर्षात लहान पाहुण्याचं आगमन होणार आहे अशी घोषणा केली. काही सेलिब्रिटी हे पहिल्यांदाच आई - वडील झाले आहेत. अशाच काही सेलिब्रिटीबद्दल जाणून घेऊया. सरत्या वर्षातील काही आठवणी जागवूया.

हार्दिक पंड्या - नतासा स्टॅनकोविक

हार्दिक आणि नतासाने गेल्यावर्षी अचानक साखरपुडा करून सर्वांनाच धक्का दिला होता. इतकंच नाही तर लॉकडाऊन काळातच घरातल्या घरात दोघांनी लग्न केलं आणि आपण आईवडील होणार असल्याची घोषणाही केली. यावर्षी जुलै महिन्यात नतासाने अगस्त्यला जन्म दिला आणि हार्दिकच्या घरात एकदम सुखाचे दिवस आले असल्याचे त्यांनी सांगितले. अगस्त्यचा जन्म झाल्यानंतर लगेचच त्याचा फोटो दोघांनाही शेअर केला होता.  सोशल मीडियावर हार्दिक आणि नतासा नेहमीच अॅक्टिव्ह असतात आणि अगस्त्यचे फोटो शेअर करत असतात. 

गौरव चोप्रा - हिताशा चोप्रा

अभिनेता गौरव चोप्रासाठी हे वर्ष अत्यंत वाईट गेले आणि त्या वाईट क्षणांमध्ये आशेचा किरण दाखवणारा क्षणही त्याला मिळाला. लागोपाठ दहा दिवसांच्या अंतरावर गौरवने आपल्या आई-वडिलांची साथ गमावली. दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात त्याच्या घरी मुलाचा जन्म झाला. हिताशाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. गौरवने ही बातमी स्वतः सोशल मीडियावर शेअर केली होती. इतक्या सगळ्या वाईट घटनांनंतर या मुलाचा जन्म झाल्याने जगण्यासाठी गौरवला थोडासा आधार मिळाला असंच काहीसं गौरवच्या बाबतीत घडलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

2021 मध्ये या जोड्यांनी थाटावा संसार, चाहत्यांची इच्छा

कुणाल वर्मा - पूजा बॅनर्जी

लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच पूजा आणि कुणाल धामधुमीत लग्न करणार होते. मात्र या सगळ्यात त्यांनी कोर्ट मॅरेज केलं आणि इतकंच नाही तर या दोघांनी याचवर्षी बाळालाही जन्म दिला. पूजाने ऑक्टोबरमध्ये मुलाला जन्म दिला. तर पहिल्यांदा त्याचा फोटो शेअर करताना मुलाचा चेहरा दोघांनीही शेअर केला नव्हता. मात्र आपण आई - वडील झाल्याची गोड बातमी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. दोघेही टीव्ही इंडस्ट्रीतील नावाजलेले असून सध्या बाळाच्या पालनपोषणात व्यस्त आहेत. 

सुमीत व्यास - एकता कौल

सुमीत व्यास आणि एकता कौलचं लग्न हे एखाद्या परीकथेप्रमाणे वाटलं होतं. दोघेही आपल्या संसारात अत्यंत आनंदी असून यावर्षी एकताने मुलाला जन्म दिला आहे. दोघेही पहिल्यांदाच आई - वडील झाले आहेत. जूनमध्ये एकताने मुलाला जन्म दिला असून त्याचं नाव वेद ठेवण्यात आल्याचं दोघांनी सोशल मीडियावरून जाहीर केलं होतं. सुमीतचं वेबसिरीजमध्ये मोठं नाव आहे. अनेक वेबसिरीज आणि चित्रपटांमध्ये सुमीत काम करताना दिसतो. तर एकताही टीव्हीवर अभिनेत्री म्हणून काम करते.

2020 मध्ये एकाही चित्रपटात नाही दिसले हे सुपरस्टार्स

गौतम गुप्ता - स्मृती खन्ना

नुकताच लॉकडाऊन सुरु झाला होता आणि अशा परिस्थितीत काळजी घेत स्मृती खन्नाने एका सुंदर परीला अर्थात मुलीला जन्म दिला. गौतम गुप्ता आणि स्मृती हे दोघंही अभिनय क्षेत्रात असून पहिल्यांदाच आई - वडील झाले आहेत. सध्या दोघेही आपल्या मुलीच्या संगोपनामध्ये व्यग्र आहेत. तर लॉकडाऊनच्या अशा परिस्थितीत घरात आलेला आनंद गौतमने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करत व्यक्त केला होता. 

2020 मध्ये यांचे उजळून निघाले भाग्य, मिळाली अमाप प्रसिद्धी

रूसलान मुमताझ - निराली मेहता

रूसलान हा टीव्हीवरील चॉकलेट बॉय आहे. रूसलानचा फॅन फॉलोईंगही खूप आहे. लॉकडाऊन सुरू होऊन काहीच दिवस झाले होते आणि रूसरान आणि निरालीच्या घरी 26 मार्चला रायनचा जन्म झाला. रूसलान अगदी पहिल्या दिवसापासून रायनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपला आनंद व्यक्त करत असतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक