ADVERTISEMENT
home / मनोरंजन
#coronaheroes ना मराठी कलाकारांचा मानाचा मुजरा

#coronaheroes ना मराठी कलाकारांचा मानाचा मुजरा

लॉकडाऊनच्या कठीण काळातही सर्वांना एकत्र जोडणारं माध्यम आहे ते म्हणजे सोशल मीडिया. या माध्यमाचा वापर करून मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी लॉकडाऊनमध्ये अविरत झटणाऱ्या भारताच्या खऱ्या हिरोजना केलं सलाम.

तब्बल 32 मराठी कलाकारांनी पुढे येऊन हे गाणं साकारलं आहे. ज्याचं नाव आहे तू चल पुढं. या गाण्यात अमेय वाघ, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर आणि अजूनही अनेक कलाकार आहेत. या कठीण काळातही आपल्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता समाजासाठी झटणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य सेवेतील अनेकजण, पोलीस आणि इतर जण जी समाजासाठी झटत आहेत त्यांना धन्यवाद या गाण्यातून देण्यात आले आहेत.

हे गाणं प्रत्येक कलाकाराने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की,

तू चाल पुढं…

ADVERTISEMENT

तू आहेस म्हणुन आम्ही घरी सुरक्षित आहोत… तू आहेस म्हणुन हा देश लढतोय… तू आहेस म्हणुन माणुसपण जगतंय… माणसातल्या देवा, तुला आमचा मानाचा मुजरा… तू चाल पुढं… तुझं हे योगदान आम्ही कधीच विसरणार नाही… #तूचालपुढं #सलाम #Thank you.

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक समीर विद्वंस आणि हेमंत ढोमे यांच्या संकल्पनेतून हे गाणं साकारण्यात आलं आहे. हे गाणं 1937 साली आलेल्या मराठी चित्रपट कुंकू मधील आहे. हे गाणं याआधीही डबल सीट या अकुंश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांच्या चित्रपटात वापरण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटकाळात धडाडीने लढणाऱ्या सर्वांना हे गाणं समर्पित करण्यात आलं आहे

अभिनेता आयुषमान खुरानाने मानले मुंबई पोलिसांचे मराठी भाषेत आभार

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

आता कोरोनावर पोलीस करु लागलेत अफलातून मीम्स

‘मुंबई पोलीस’ ट्विटर हँडलवरून सेलिब्रिटींना देण्यात येणाऱ्या ‘अफलातून’ उत्तराचीच चर्चा

कोरोनावर मात करण्यासाठी कपिल शर्माची गोरगरिबांना लाखोंची मदत

ADVERTISEMENT
14 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT