लॉकडाऊन काही संपायचे नाव घेत नाही. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनी त्यांचे वेगवेगळे छंद जोपासले पण आता पुन्हा काही ते सगळं करण्याची इच्छा कोणालाच फारशी दिसून येत नाही. मनोरंजनाचा एकमेव स्त्रोत म्हणून हल्ली ओटीटी प्लॅटफॉर्मकडे पाहिलं जातं. त्यावरच काय आता नवनवीन सीरिज आणि चित्रपट पाहायला मिळत आहे. सगळ्या कुटुंबासोबत एकत्र पाहण्यासाठी काहीतरी छान शोधत असाल तर वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बेस्ट सीरिज आम्ही तुमच्यासाठी निवडल्या आहेत. चला तर जाणून घेऊया या विषयी थोडे अधिक आणि त्यांची स्टोरीलाईन नेमकी काय आहे ते.
लवकरच भेटीला येणार ‘पवित्र रिश्ता 2’, मानवचा शोध सुरु
स्ट्रेंजर थिंग (Stranger Things)
लॉकडाऊन लागण्याआधी नेटफ्लिक्सवर एका सीरिजने फारच धुमाकुळ घातला होता. अशी ही सीरिज लहान मुलांमध्ये खूपच प्रसिद्ध झाली. जर ती तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर तुम्हाला नेटफ्लिक्सवर ती पाहता येईल. ही सीरिज लहान मुलांसाठी तर उत्तम आहे. पण तरुणांसाठीही उत्तम आहे. साय- फाय गटात मोडणाऱ्या या सीरिजमध्ये अपसाईड डाऊन अशी दुनिया दाखवण्यात आली आहे. काही सुपर पॉवर असलेल्या मुलांपैकी एक मुलगी एका शहरात पळून येते. पण तिच्यासोबत काही संकटही येतात. या संकटाचे दोन हात करताना ती दिसते. पण नेमकी अपसाईड डाऊन दुनिया काय आहे हे कळायला आणि ते जाणून घ्यायला खूपच मजा येते. आतापर्यंत या सीरिजचे तीन भाग आलेले आहेत. जे तुमचा बरापैकी वेळ चांगला घालवतील.
लुथर ( Luther)
जर तुमच्या घरात सगळे 18 हून अधिक वयाचे असतील आणि तुम्हाला जर सायफाय अशापद्धतीच्या सीरिज आवडत असतील तर तुमच्यासाठी ड्रामा आणि सस्पेन्सने भरलेली लुथर नावाची अमेझॉन प्राईम वरील सीरिजही बेस्ट आहे. या सीरिजमध्ये तुम्हाला भरपूर ड्रामा पाहता येईल. या सीरिजचे एकूण 5 सीझन आतापर्यंत आलेले आहेत. हे पाच सीझन तुम्हाला अगदी आरामात आणि अभ्यासपूर्वक असे पाहता येईल. त्यामुळे जर तुम्हाला क्राईम पेट्रोल किंवा सीआयडी सारखा ड्रामा आवडत असेल तर तुमच्यासाठी हा एक मस्त पर्याय आहे जो तुम्ही नक्कीच बघायला हवा.
मोहित मलिक आणि आदिती शिरवाइकरने शेअर केलं बाळाचं नाव, जाणून घ्या अर्थ
बिग लिटल लाईज ( Big Little Lies)
जर तुम्हाला महिला केंद्री अशा प्रकारात काही पाहायचे असेल तर हॉटस्टारवरील ही सीरिज तुम्ही पाहायला हवी. सेलिब्रिटींचे आपल्या सगळ्यांना कौतुक असते. त्यांचे आयुष्य आपल्याला जाणून घ्यायचे असते. अशाच काही इंटरनॅशनल सेलिब्रिटींचे आयुष्य जरी आपल्याला फार वेगळे आणि खूप आनंदाने भरलेले असे वाटत असले तरी देखील त्यांच्या आयुष्यातही काही दु:ख असतात. ज्यांचा आपण कधीही विचार करत नाही. तीच दु:ख आणि सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत हे 5 अॅप
अभय ( Abhay)
जर तुम्हाला काही इंटरनॅशनल पाहायचे नाही तर शुद्ध देसी सीरिज पाहायची असेल तर तुमच्यासाठी ZEE 5 वरील अभय ही सीरिज फारच उत्तम आहे. अॅक्शन, सस्पेन्स आणि ड्रामाने भरलेली अशी ही सीरिज आहे जी तुम्ही अगदी कधीही पाहू शकता. या सीरिजचे दोन कॉम्बो आले आहेत. जर तुमच्याकडे याचे सबस्क्रिब्शन नसेल तर तुम्ही आताच्या या दिवसात राधे कॉम्बोमध्ये अवघ्या 499 रुपयांना घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला यामध्ये अशा अनेक सीरिज पाहता येतील.
शॅडो अॅण्ड बोन ( Shadow And Bone)
सुपर नॅचरल आणि पावर्स अशा काही गोष्टी तुम्हाला आवडत असेल तर नेटफ्लिक्सवरील ही सीरिज तुम्हाला नक्की आवडेल. शॅडो अॅण्ड बोन नावाची ही सीरिज तुम्हाला नक्की आवडेल. या सीरिजमध्ये ब्लॅक मॅजिक आणि पावर अशा गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. आपल्या चुकिच्या कामांसाठी तयार केलेली काळी सावली मिटवण्याची जबाबदारी एका सर्वसामान्य मुलीवर येऊन पडते. पण ती कशाप्रकारे हे सगळे करेल हे दाखवणारी ही सीरिज आहे. आता याचा एक सीझन आला आहे. पण लवकरच याची दुसरी सीरिज येणार आहे.
आता घरी बसून कंटाळू नका ही सीरिज नक्की बघा.