नव्या वर्षात नव्या चित्रपटांचा धमाका, होणार लवकरच प्रदर्शित

नव्या वर्षात नव्या चित्रपटांचा धमाका, होणार लवकरच प्रदर्शित

सगळ्याच इंडस्ट्रीसाठी 2020 हे वर्ष अत्यंत वाईट गेलं आहे आणि बॉलीवूड इंडस्ट्रीही त्यातून वाचली नाही. मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाले तर नाहीच पण अनेक नामवंत कलाकारांचाही मागच्या वर्षी मृत्यू झाला. याशिवाय ड्रगमध्ये अनेक कलाकारांची नावं गुरफटली गेली आणि ते समोरही आले. तर या सगळ्यात ओटीटी प्लॅटफॉर्मने आपली जागा बनवली. अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. पण मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची मजाच वेगळी आहे हेदेखील तितकंच खरं. मात्र आता 2021 मध्ये हे चित्र बदलेल अशी आशा सर्वांना आहे. इतकंच नाही तर असोसिएशनने सलमान खान याला पत्र लिहून विनंतीही केली आहे. दरम्यान यावर्षी नव्या चित्रपटांचा धमाका होणार असून कोणकोणते चित्रपट पाहता येतील (Bollywood movies to releas in 2021) ते जाणून घेऊया.

सूर्यवंशी

मागच्या वर्षी मार्चमध्ये रोहित शेट्टीचा मोठा प्रोजेक्ट असणारा आणि अक्षयकुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. याचे ट्रेलरही लाँच करण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मपेक्षा थिएटरमध्येच हा चित्रपट प्रदर्शित व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे रसिकांसाठी पर्वणी असते.  त्यामुळे या नव्या वर्षात ही पर्वणी नक्कीच प्रेक्षकांंना मिळेल अशी आशा आहे. 

राधे

ईदचा मुहूर्त आणि सलमान खानचा चित्रपट हे आता समीकरण झालं आहे. मागच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणारा राधे हा सलमान खानचा चित्रपट लॉकडाऊनमुळे रखडला होता. चित्रपटाचे काही चित्रीकरण आणि डबिंग शिल्लक असल्याने चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. मात्र यावर्षी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा अशी संपूर्ण असोसिएशनचीदेखील इच्छा आहे आणि त्यासाठी सलमान खान याला विनंती करण्यात आली आहे. या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चांगले दिवस येतील अशी सर्वांना अपेक्षा आहे.

2020 मध्ये लहान वयातच केला या कलाकारांनी जगाला अलविदा  

लाल सिंह चढ्ढा

आमिर खान आपल्या परफेक्ट गोष्टींसाठी जास्त ओळखला जातो. लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट मागच्या वर्षी नातळच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना व्हायरसमुळे याचे चित्रीकरणच अर्धवट राहिले. लॉकडाऊनध्ये जेव्हा चित्रीकरणाला परवानगी मिळाली तेव्हा या चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. यामध्ये करिना कपूरही मुख्य भूमिका साकारत आहे. पुन्हा गरोदर असणाऱ्या करिनाने याच अवस्थेत चित्रीकरण पूर्ण केले आहे. तर हा चित्रपटही यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

कधी होणार आई...यावर दीपिका पादुकोणचा खुलासा

83

कबीर खान याचा महत्वाकांक्षी चित्रपट 83 हादेखील मागच्या वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना व्हायरसमुळे हा चित्रपट रखडला. हा चित्रपट कपिल देव आणि क्रिकेटवर असल्याने थिएटरमध्येच मोठ्या पडद्यावर पाहण्याची मजा आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या  मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल अशी प्रेक्षकांना आशा आहे. दरम्यान आता हळूहळू थिएटर उघडत  असून या  चित्रपटांचे लवकरच प्रदर्शन करण्यात यावे अशी मागणीही आता होते आहे. 

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या 7 महिन्यांनंतर दिसली रिया चक्रवर्ती

बेलबॉटम

अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असणारा बेलबॉटमदेखील याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वात पहिल्यांदा काम करणारा आणि  चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करणारा अभिनेता  होता अक्षयकुमार. हा चित्रपट एका विमानाच्या हायजॅकवर आधारित असून 1980 मध्ये भारताला या प्रकरणामुळे कसा त्रास झाला होता याची कथा आहे. यामध्ये लारा दत्ता, हुमा कुरेशी, वाणी कपूर यांच्यादेखील भूमिका आहेत. तसंच या चित्रपटाकडून प्रेक्षकांना अपेक्षा आहे.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक