#StrengthOfAWoman : प्रत्येक महिलेच्या स्मार्टफोनमध्ये असल्याच पाहिजेत 'या' अॅप्स

#StrengthOfAWoman : प्रत्येक महिलेच्या स्मार्टफोनमध्ये असल्याच पाहिजेत 'या' अॅप्स

कोणत्याही ठिकाणी आपल्याला कंटाळा येऊ लागल्यावर आपण मोबाईल काढतो आणि त्यातच बिझी होऊन जातो. रात्री झोप येत नसल्यासही बरेचदा आपण मोबाईल सर्फ करतो. एवढंच काय तर प्रत्येक प्रवासात आपल्यासोबत मोबाईल हा असतोच. आज कोणालाही विचारलं तर ते मान्य करतील की, मोबाईलशिवाय आयुष्याचा विचारही शक्य नाही. हा छोटासा मोबाईल आपलं फक्त मनोरंजनच नाहीतर तर छोट्या-मोठ्या कामातही मदत करतो. मग ते यु-ट्यूब बघून रेसिपी करणं असो वा उपयोगी टीप्ससाठी POPxo बघणं असो वा काही प्रश्न पडल्यास गुगल करणं असो. मोबाईलपासून लांब राहणं अशक्य आहे. पण अनेकदा फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्वीटर आणि ब्यूटी अॅप्स आपण इतकं बिझी होऊन जातो की, अॅप्सकडे आपलं लक्षच जात नाही. महिला सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, फिटनेस आणि फायन्सासमध्ये मदत करण्यासाठी काही खास अॅप महिलांकरता बनवण्यात आल्या आहेत. या अॅप्सचा तुमच्या मोबाईलमध्ये नक्कीच असल्या पाहिजेत. आम्ही तुम्हाला अशाच काही अॅप्सबाबत सांगणार आहोत.


1- My SOS Family- Personal Safety App


App for Women 2
आपण कितीही मोकळ्या विचार करणाऱ्या व्यक्ती असलो तरी महिला सुरक्षेची चिंताही आपल्याला सतावतेच. My SOS Family- Personal Safety App ही महिलांची सुरक्षा लक्षात ठेऊन बनवण्यात आलेली अॅप आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका जाणवल्यास तुमच्या फोनला (निर्देशानुसार) फक्त शेक करा. त्यानंतर हे अॅप आपोआप तुमचं करंट लोकेशन आणि फोनची माहिती तुमच्या जवळच्यांपर्यंत पोचवेल. हे अॅप सर्व Android आणि iOs फोनवर उपलब्ध आहे.  


2- Female Fitness - Women Workout


my-fitness-app


तुमचं वजन तुम्हाला वाढल्यासारखं वाटतं का? जिम किंवा योगाला तर जायचंय पण घरातल्या कामातून वेळ मिळत नाही का? मग तुम्ही घरच्याघरीही फिट राहू शकता या अॅपच्या मदतीने. या अॅपमध्ये घरी वर्कआऊट करण्यासाठी सोपे व्हिडीओज, ट्रेनिंग प्लॅन, हेल्थ टीप्स, डेली रूटीन आणि हेल्थ प्रोग्रेस ट्रॅकरसुद्धा आहे. या सगळ्यांचा समावेश आहे. मग आता घरच्याघरी तुम्हीही फिट राहू शकता.  


3- My Pill


App for Women 3
तुम्ही तुमच्या बर्थ कंट्रोल पिल वेळेवर घ्यायला विसरता का, जर तुमचं उत्तर हो असेल तर हे अॅप डाऊनलोड करा. कारण हे अॅप तुमच्या बर्थ कंट्रोल पिल या गोष्टीची विशेष काळजी घेतं. या शिवाय My Pill तुमची हेल्थ हिस्ट्रीसुद्धा ट्रॅक करतं आणि गरज लागल्यास डॉक्टरकडे जाण्याचा सल्लाही देतं.


4- Daily Beauty Care - Skin, Hair, Face, Eyes


daily-beauty-care-app


हे अॅप म्हणजे एक ब्युटी गाईड आहे. या अ्ॅपवर तुम्हाला सौंदर्याशी निगडीत विविध नैसर्गिक टीप्स मिळतील. ज्यामुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यातील ब्युटी निगडीत समस्या दूर होतील. या अॅपवर 1000 पेक्षा जास्त ब्युटी टीप्सचा खजाना आहे. त्यासोबतच तुमच्या समस्यावर डाएटच्या मार्गानेही तुम्ही कसा उपाय करू शकता हे सांगण्यात आलंय. तसंच स्टेप बाय स्टेप व्यायाम देण्यात आले आहेत.  


5- LXME


App for Women 5
LXME हे अॅप महिलांसाठी ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट सर्विस आणि फायनॅन्शियल प्लानिग टूल आहे. या अॅपमध्ये महिलांना करियर आणि त्यांचे पैसे योग्य जागी इन्व्हेस्टमेंट आणि इतरही बरीच माहिती देतं. तसंच कोणत्यावेळी इन्व्हेस्टमेंट करावी हेही सुचवतं.


हेही वाचा -


फिरायला जाणार असाल तर तुमच्या बॅगमध्ये 'या' गोष्टी असायलाच हव्यात 


श्रीमंत व्हायचं असेल तर टाळा ‘या’ 5 चुका, करा बचत


तुम्हाला देखील विसरण्याची सवय आहे का...स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करा 'हे' उपाय