बाहुबली फॅन्सचा आजचा दिवस खास आहे कारण बाहुबली चित्रपटाला आज 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या सोशल मीडियावर बाहुबली आणि प्रभास पुन्हा ट्रेंड होऊ लागला आहे. बाहुबली हा एकमेव असा चित्रपट आहे ज्याने सगळ्या भाषांमधील प्रेक्षकांना आपलेसे करुन घेतले. बॉक्सऑफिसवर तर कोट्यांनी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. हा चित्रपट रिलीज होऊन 5 वर्ष पूर्ण झाली तरी या चित्रपटाची मोहिनी काही लोकांवरुन उतरत नाही. आजही अनेकांना या चित्रपटातील बाहुबली, त्यातील संवाद आणि विशेष म्हणजे गाणी ओठावर आहेत. बाहुबली चित्रपटाला 5 वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने बाहुबली अर्थात प्रभासनेही एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे आजचा दिवस बाहुबली फॅन्ससाठी एकदम खास आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला का?
एस. एस. राजमौली यांनी निर्मित केलेल्या या चित्रपटाला एवढी प्रसिद्धी मिळेल असे कधीही वाटले नव्हते. पण बाहुबली द बिगनिंग सगळ्या भाषांमध्ये रिलीज झाल्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. काल्पनिक विश्वातील बाहुबली अनेकांच्या गळ्यातला ताईत बनला. बाहुबली या चित्रपटात बाहुबलीची भूमिका साकारणाऱ्या प्रभास राजूचा फॅन क्लब एका दिवसात कित्येक कोटींच्या घरात गेला. पाहता पाहता या चित्रपटाने 100 कोटींचा पल्ला अगदी आरामात पार केला. बाहुबलीचा पहिल्या भागाचा शेवट अनेकांना दु:खी करुन गेला . कारण कटप्पाने बाहुबली को क्यो मारा? या प्रश्नाचे उत्तर निरुत्तरीतच राहून गेले होते. त्यामुळे दुसरा भाग येईपर्यंत लोकांना प्रतिक्षा होती की, कटप्पाने बाहुबली को क्यो मारा?
बाहुबली द कन्क्ल्युजन हा दुसरा भाग रिलीज 10 जुलै 2015 मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज झाला तो ब्लॉकब्लस्टर ठरला. यामध्ये कटप्पाने बाहुबली को क्यो मारा है कळले. त्यानंतर फॅन्सनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या सिक्रेटसोबतच फॅन्सना आवडले ते या चित्रपटाचे प्रेझेंटेशन. मोठ्या पडद्यावर इतके चांगले अॅनिमेशन पहिल्यांदाच फॅन्सनी पाहिले होते. पहिल्या भागापेक्षाही अधिक प्रभावशाली दुसरा भाग ठरला. यातील ग्राफिक्स अनेकांना आवडले. यातील प्रत्येक कॅरेक्टरला त्याची ओळख मिळाली.
अनेक हिंदी चित्रपट आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आहे. पण बाहुबलीची गोष्ट काही औरच होती. अनेक देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. कित्येक भाषांमध्ये याचे डबिंगही करण्यात आले होते. त्यामुळे अनेक देशांनी या चित्रपटाचा आनंद घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची दखल घेण्यात आली.
बाहुबलीमुळे घराघरात पोहोचलेल्या प्रभासने या रोलसाठी विशेष मेहनत घेतली होती. त्याने या संदर्भात अनेक मुलाखती दिल्या आहेत. त्याच्या फॅन्समुळे त्याने त्याचे इन्स्टा अकाऊंटही सुरु केले. आज त्याने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर बाहुबलीच्या आठवणीत एक व्हिडिओही शेअर केला आहे. तर एसएस राजमौली म्हणजेच या चित्रपटाच्या निर्मात्याने मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत एक असा व्हिडिओ शेअर केला आहे जो तुम्ही नक्की पाहायला हवा.
तर आता प्रभास आणि बाहुबली फॅन्सना जर पुन्हा एकदा बाहुबलीला पाहायचे असेल तर पुन्हा एकदा बाहुबलीचे दोन्ही भाग पाहायला विसरु नका.
एक वर्षात सुश्मिता सेनचा भाऊ होणार पत्नीपासून वेगळा, नात्यात दुरावा