देशभरात कोणत्या सेलिब्रेटीची काय ब्रॅंड वॅल्यू आहे हे फार महत्त्वाचं ठरतं. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहची ब्रॅंड वॅल्यू सध्या चांगलीच वाढत असल्याचं दिसत आहे. अभिनेत्यांच्या ब्रॅंड वॅल्यूमध्ये रणवीर नंबर वन ठरला आहे. रणवीरच्या मागील तीन चित्रपटांची कमाई जवळजवळ 800 करोड झाली आहे. लागोपाठ तीन हिट चित्रपट दिल्यामुळे रणवीरचा भाव आता चांगलाच वधारला आहे. रणवीर सिंह जाहिरातक्षेत्रातदेखील सध्या देखील नंबर वन ब्रॅंड ठरत आहे. त्यामुळे त्याला सतत नवनवीन ब्रॅंडच्या जाहिरातींच्या ऑफर येत आहेत.
मागील वर्षी रणवीरने संजय लीला भन्सालीच्या पद्मावतमध्ये अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली होती. पद्मावत चित्रपटासाठी रणवीरने विशेष मेहनत घेतली होती. शिवाय पद्मावतचं यश रणवीरसाठी चांगलच लकी ठरलं. कारण पद्मावत नंतर रणवीरचे सिम्बा आणि गलीबॉय हे दोन्ही चित्रपट लागोपाठ हिट झाले. एका मागोमाग हिट झालेल्या या चित्रपटांनी रणवीरला प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर नेले. रणवीरने या तिन्ही चित्रपटांमधून एकूण 800 करोडची कमाई केली. 2018 आणि 2019 मध्ये रणवीर शिवाय कोणत्याही इतर अभिनेत्याची इतकी कमाई झालेली नाही. शिवाय या यशामुळे रणवीरची जाहिरात क्षेत्रातील ब्रॅंड वॅल्यूदेखील वाढतच चालली आहे.
सिम्बा चित्रपटात रणवीरचा एक डायलॉग आहे की, “मी पैशांचा नाही तर प्रेमाचा भुकेला आहे.” रणवीरच्या मते तो त्याच्या खऱ्या जीवनात देखील असाच आहे. त्याच्या मते त्याने कमावलेल्या कमाईचा फायदा संपूर्ण बॉलीवूड इंडीस्ट्रीला होत आहे. शिवाय यासाठी तो त्याच्या चित्रपटांच्या निर्मात्यांचादेखील मनापासून आभारी आहे. देशभरात सध्या चित्रपटसृष्टीला उद्योगाचे स्वरूप देण्याची मोहिम सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणवीर या मोहिमेत स्वतःला लीडरच्या भूमिकेत पाहत आहे. त्याच्या मते सिनेसृष्टीचा कारभार आता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. रणवीरच्या मते त्यांचे घर या उद्योगावर चालते त्यामुळे सिनेउद्योगाची जास्तीत जास्त प्रगती व्हावी असाच विचार त्याने करायला हवा. त्याच्या मते या क्षेत्रात विश्वास आणि सर्वांचा विकास या दोन गोष्टी फार गरजेच्या आहेत. असं झालं तरच खऱ्या अर्थांने सर्व सिनेसृष्टीची प्रगती होऊ शकेल.
दीपिका आणि रणवीर मागील वर्षी विवाहबंधनात अडकले. आजच्या घडीला सर्वात जास्त ब्रॅंड वॅल्यू असण्यामध्ये हे बॉलीवूड कपल नंबर वन आहे. सेलिब्रेटी ब्रॅंडच्या वॅल्यूवर नजर असलेल्या डफ अॅंड फेल्पसच्या आकडेवारीनुसार दीपिकाची ब्रॅंड वॅल्यू 10 करोड डॉलर म्हणजेच 700 करोड झाली आहे. मागील वर्षी सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सेलिब्रेटीजमध्येदेखील दीपिका पहिल्या क्रमांकावर होती. फोर्ब्सच्या यादीनुसार दीपिकाने मागच्या वर्षी 113 करोडची कमाई केली होती. दीपिका पदुकोनने मागील वर्षी जवळजवळ 21 निरनिराळ्या उत्पादनांसाठी ब्रॅंड अॅंम्बेसेडरचं काम केलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या ब्रॅंडसाठी काम करणारी जगभरात दीपिका एकमेव सेलिब्रेटी ठरली आहे. थोडक्यात रणवीरसाठी दीपिका फार लकी ठरत आहे. कारण लग्नानंतर दीपिकाप्रमाणेच त्याचीही प्रगती होताना दिसत आहे.
रणवीर सिंह टीम इंडीयाला प्रोत्साहन देण्यासाठी नुकताच वर्ल्ड कपमध्येदेखील सहभागी झाला होता. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्डमध्ये रंगलेल्या भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यात सगळ्यात जास्त लक्ष वेधलं ते रणवीर सिंहने. रणवीरने यासाठी मँचेस्टरमध्ये पोचून मॅचआधीच्या प्री शोमध्येही भाग घेतला आणि आपल्या खास अंदाजात जोशपूर्ण वातावरण निर्माण केलं. रणवीरने अनेक क्रिकेटर्ससोबत फोटो काढले. मॅच सुरू होण्याआधी त्याने शिखर धवनशीही खूप गप्पा मारल्या. तसंच स्टेडिअममध्ये उपस्थित पाकिस्तानी अँकर झैनब अब्बाससोबतही रणवीरने सेल्फी घेतली. सुनिल गावस्कर यांच्यासोबत बदन पे सितारे लपेटे हुए या गाण्यावर डान्स केला. थोडक्यात आजकाल जिथे पहावं तिथे रणवीरच्या नावाची चर्चा दिसते.
रणवीर सिंगचा आगामी चित्रपट ‘83’ हा भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन कपिल देव यांची बायोपिक आहे. रणवीर या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. आश्चर्य म्हणजे या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका दीपिका पादूकोन साकारणार आहे. रणवीरने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये दीपिका रणवीर सिंगला बॅटने मारत असल्याचा एक व्हिडिओ रणवीरने शेअर केला होता. रणवीरने यावर एक कॅप्शन देखील दिलं होतं “माझं रिल लाईफ आणि रिअल लाईफ” यातून रणवीर आणि दीपिकाची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री दिसून येते.
अधिक वाचा
आशुतोष गोवारीकरच्या पानिपतमधून अभिनेत्री ‘झीनत अमान’ यांचा कमबॅक
IndvsPak: सलमान खानपासून तैमूरपर्यंत पूर्ण बॉलीवूडने साजरा केला भारताचा विजय
लवकरच लग्न करणार बॉलीवूडमधील ‘हे’ 5 सेलिब्रिटी कपल्स
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम