कोणाला बघून आली शिल्पा शेट्टीला ‘अक्की’ची आठवण

कोणाला बघून आली शिल्पा शेट्टीला ‘अक्की’ची आठवण

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी खूप रंगल्या होत्या. वास्तविक या दोघांचं ब्रेकअप होऊन आता जवळजवळ पंधराहून अधिक वर्ष झाली आहेत. दोघंही आपापल्या जीवनात अतिशय आनंदी आहेत. टेलीव्हिजनवरील एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये सध्या शिल्पा शेट्टी जज म्हणून काम पाहत आहे. लहान मुलांच्या ‘सुपर डान्सर चॅप्टर 3’ या डान्स शोमध्ये एका अभिनेत्याला पाहून शिल्पाला अचानक 'अक्की'ची आठवण आली. या डान्स शोमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन त्यांच्या ‘लुका छुपी’ या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. कार्तिक आर्यनला पाहून शिल्पा शेट्टीला अचानक अक्षय कुमारची आठवण आली. शिल्पाने या शोमध्ये सर्वांसमोर कार्तिकला पाहून तिला तरुणपणीच्या अक्षय कुमारची आठवण आल्याचं कबुल केलं. कार्तिक आर्यनच्या नावामध्ये (KA) अशी आज्ञाक्षरे आहेत आणि अक्षय कुमारच्या नावात (AK) अशी आज्ञाक्षरे आहेत त्यामुळे असं झालं असावं असंही तीने या शोमध्ये सांगितलं. अक्षय आणि कार्तिकचे लुक्स सारखे असल्याचंदेखील तिने सर्वांना सांगितलं.  शिल्पा आणि अक्षयच्या जुन्या नात्यांना उजाळा देणाऱ्या भावना तिने व्यक्त केल्यामुळे शोमधील इतर जज तिला चिडवू लागले. या शोमध्ये तिच्या सोबत दिग्दर्शक अनुराग बासु आणि कोरिओग्राफर गीता कपूर हे को-जज आहेत. विशेष म्हणजे शिल्पाने या शोमध्ये कार्तिक सोबत तिच्या आणि अक्कीच्या एका गाण्यावर डान्सही केला. अक्षय कुमार आणि शिल्पाचं ‘पोस्टर छपवा दो बाजार में’ हे गाणं एकेकाळी खूप गाजलं होतं. याच गाण्यावर शिल्पा आणि कार्तिकने ताल धरला. कार्तिक आर्यननेदेखील तो अक्षय कुमारचा फॅन असल्याचं कबूल केलं.
शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारचं अफेअर


शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांनी अनेक चित्रपटातून काम केलं आहे. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांनी में खिलाडी तू अनाडी, इंसाफ, जानवर, धडकन अशा अनेक चित्रपटातून काम केलं आहे. एकेकाळी प्रेक्षकांनी या हीट जोडीला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. 'मैं खिलाडी तू अनाडी' या चित्रपटात दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. चिनेसृष्टीतील हीट जोडी असूनही हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. जवळजवळ पंधरावर्षापूर्वी शिल्पा आणि अक्कीच्या अफेअरपासून ते ब्रेकअपपर्यंत सर्वच गोष्टींच्या चर्चा रंगल्या होत्या. शिल्पाही तेव्हा हे नातं तुटल्यामुळे दु:खी झाली होती. मात्र ब्रेकअपनंतरही त्या दोघांच्या प्रोफेशनल नात्यात कोणताही बदल झाला नाही. आजही एखाद्या कार्यक्रमात भेटल्यावर ते दोघं एकमेकांशी प्रोफेशनली बोलतात. शिल्पा शेट्टीसोबत ब्रेकअप झाल्यावर अक्षय कुमारचं सुत रविना टंडनसोबत जुळलं होतं मात्र तेही नातं फार काळ टिकलं नाही. शेवटी अक्षयने ट्विकंल खन्नासोबत विवाह केला. आज ट्विंकल आणि अक्षय आपल्या नात्यामध्ये आनंदी आहेत. त्यांना 'आरव आणि नितारा' ही दोन मुलं आहेत. शिल्पा शेट्टीनेही प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रासोबत विवाह केला. शिल्पादेखील तिच्या जीवनात सुखी आहे. शिल्पा आणि राज यांच्या मुलाचे 'वियान' नाव आहे. शिल्पा आणि राज हे एक सेलिब्रेटी कपल आहे. दोघं सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. शिल्पाच्या मुलाचा वाढदिवस असो, शिल्पा आणि राजच्या लग्नाचा वाढदिवस असो किंवा शिल्पाचा एखादा फिटनेस मंत्रा असो त्याची चर्चा सोशल मीडियावर सतत होत असते. मात्र असं असूनही या रिअॅलिटी शोमध्ये शिल्पाला अचानक अक्कीची आठवण आल्याने तिच्या चाहत्यांना शिल्पा आणि अक्कीच्या अफेअरचे जुने दिवस पुन्हा आठवले.

 


 


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम