"रावरंभा" तून उलगडणार एक ऐतिहासिक प्रेमकहाणी

"रावरंभा" तून उलगडणार एक ऐतिहासिक प्रेमकहाणी

येत्या काळात अनेक ऐतिहासिक चित्रपट येऊ घातले आहेत. त्यातून शिवकालातील कथानकं रुपेरी पडद्यावर पहायला मिळेल. अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित 'रावरंभा' हा चित्रपट त्या सर्व ऐतिहासिक चित्रपटांमध्ये वेगळा ठरणार आहे. रावरंभातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या  राजधानी सातारा जिल्ह्यात निर्मिती होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. हे पोस्टर लाँच झाल्यानंतर सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे. नक्की या चित्रपटात कोणते कलाकार काम करत आहेत आणि याची काय कथा असणार आहे याबाबत चर्चेला आता सुरूवात झाली आहे. 

नेहा कक्करची घोषणा, यापुढे करणार नाही रियालिटी शो

कलाकारांची नावे गुलदस्त्यात

शशिकांत पवार प्रॉडक्शन्सचे  श्री शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे "रावरंभा" - द ग्रेट वॉरियर ऑफ 1964 या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. "बेभान", "झाला बोभाटा", "भिरकीट", "करंट"  असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी रावरंभाचं लेखन केलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच आता सुरु होणार असून चित्रपटातील कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आता नक्की कोणकोणते कलाकार यातून दिसणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. गेल्या काही वर्षात अनेक ऐतिहासिक मराठी चित्रपट आले आणि मोठ्या पडद्यावर गाजलेेदेखील. त्यामुळे आता रावरंभामध्ये असं काय वेगळं पाहायला मिळणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. नवे कलाकार असणार की जुन्या कलाकारांचा दमदार अभिनय बघायला मिळणार हा प्रश्नदेखील आता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे. पण या सगळ्याची उत्तरे मिळण्यासाठी प्रेक्षकांना आणि चाहत्यांना नक्कीच आता थोडा वेळा वाट पाहावी लागणार आहे. कारण सर्वच गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या असून लवकरच याबाबत माहिती मिळेल अशी आशा आहे. तर आपल्याकडे नेहमीच प्रेमकहाणी चित्रपटातून दाखवण्यात आल्यावर प्रेक्षकांना आवडते, त्यामुळे आता या चित्रपटालाही प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील पाहावे लागेल. 

कियारा आडवाणीने का नाकारला मुराद खेतानी चा 'अपूर्वा'

सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यातील प्रेमकहाणी

इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच "रावरंभा" या चित्रपटातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर येत आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला मावळा या पोस्टरवर दिसत असून अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे. त्यामुळे आकर्षक नाव आणि लक्षवेधी पोस्टर यामुळे चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे. रावरंभा असं वेगळंच नाव असल्याने नक्की कोणत्या प्रकारची प्रेमकहाणी असणार आणि यातील मुख्य पात्र आणि कलाकार कोण असणार याची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहचली आहे. मात्र अजूनही याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. पण या नव्या पोस्टरमुळे पुढील पोस्टर कसे असेल आणि या दुसऱ्या पोस्टरमधून काही अधिक माहिती मिळेल की नाही याच्या चर्चेला सुरूवात झाली आहे. हा चित्रपट नक्की कधी पूर्ण होईल आणि चित्रपटगृहामध्ये कधी येणार आहे याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या चित्रपटावर सध्या काम चालू आहे हे नक्की. 

शिव- वीणाच्या ब्रेकअपच्या बातमीवर या व्हिडिओने फिरवले पाणी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक