सनी लिओनच्या चुकीने होतोय एका व्यक्तीला त्रास

सनी लिओनच्या चुकीने होतोय एका व्यक्तीला त्रास

सनी लिओनने बॉलीवूडमध्ये आता आपलं एक स्थान पक्कं केलं आहे. बऱ्याच दिवसांनंतर सनी लिओन ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात दिसत आहे. सध्या सनी टीव्हीवर जास्त दिसते. रियालिटी शो मध्ये व्यग्र असणारी सनी या चित्रपटामध्ये बऱ्याच दिवसांनी दिसत आहे. पण या चित्रपटात सनीकडून अशी चूक घडली आहे ज्याची शिक्षा एका व्यक्तीला भोगावी लागत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सनीने अशी नक्की काय चूक केली आणि त्याची शिक्षा नक्की कोणाला भोगावी लागत आहे? थांबा, थांबा सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथेच मिळणार. 

सनीकडून काय झाली चूक?

Instagram

वास्तविक सनी लिओनचा ‘अर्जुन पटियाला’ हा दिलजीत दुसांझ आणि क्रिती सनॉनबरोबर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सनी लिओनने यामध्ये एक संवाद म्हटला आहे ज्यात तिने एक मोबाईल नंबरही सांगितला आहे. कदाचित त्यावेळी कोणत्याही कलाकाराच्या अथवा काम करणाऱ्या कोणाच्याही हे लक्षात आलं नाही की, ज्या व्यक्तीचा हा मोबाईल नंबर आहे त्याच्या बाबतीत नेमकं काय घडू शकतं. वास्तविक हा मोबाईल क्रमांक आहे तो मोर्या एन्क्लेव्ह इथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा. जे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत. पण मागच्या दोन ते तीन दिवसांपासून अश्लील आणि अभद्र भाषा बोलणाऱ्या अनेक व्यक्तींचे कॉल त्यांना येत आहेत. या कॉल्सने त्रस्त झाल्यानंतर शेवटी रविवारी रात्री उशीरा मोर्या एन्क्लेव्ह पोलीस स्टेशनमध्ये या व्यक्तीने तक्रार नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पीतमपुरामध्ये राहणाऱ्या पुनीत अग्रवाल या व्यक्तीने ही तक्रार नोंदवली आहे. सनी लिओनने या चित्रपटामध्ये जो क्रमांक सांगितला आहे तो त्यांचा असून त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच त्यांना दिवसभरात साधारण तीनशेपेक्षाही अधिक कॉल येऊन गेले आहेत. कॉल करणाऱ्या व्यक्तीला हा क्रमांक कुठून मिळाला असं विचारल्यानंतर त्यांना एकच उत्तर मिळत आहे आणि ते म्हणजे सनी लिओनने हा क्रमांक चित्रपटात सांगितला आहे असं. प्रत्येकजण कॉल करून त्याला सनी लिओनला भेटायचं असल्याचं सांगत आहे. तर प्रत्येकाला हा मोबाईल क्रमांक आपला असून सनी लिओनचा नाही हे सांगून अग्रवाल थकून गेले आहेत. तसंच काही कॉलर तर फोन करून अश्लील आणि अभद्र भाषेतही त्यांच्याशी बोलत आहेत. दर मिनिटाला त्यांचा फोन शुक्रवारपासून वाजत असल्याने ते हैराण झाले असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

सनीला याची माहितीही नाही

Instagram

सनी लिओनला या गोष्टीची अजूनपर्यंत कोणतीही माहिती नाही. वास्तविक नेहमीच जेव्हा मोबाईल क्रमांक दाखवायचा असतो तेव्हा तो चित्रपटामध्ये अर्धवट सांगितला जातो अथवा चुकीचा क्रमांक दिला जातो. पण या चित्रपटाच्या वेळी कोणाच्याही हे लक्षात आलेले दिसत नाही. त्याचा नाहक त्रास एका व्यक्तीला सहन करावा लागत आहे. सनीला या गोष्टीची सुतराम कल्पना नाही. त्यामुळे तिचाही यामध्ये काही दोष आहे असं म्हणता येणार नाही. आता या तक्रारीनंतर पोलीस नक्की काय पाऊल उचलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान तीन दिवसात ‘अर्जुन पटियाला’ने बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवलेली दिसून आलेली नाही. पण पुढच्या आठवड्यात काय घडतं आणि हा क्रमांक आता एडिट केला जातो का हेदेखील पाहावं लागणार आहे.