आकाश आणि श्लोकाच्या लग्नामध्ये फुलांच्या सजावटीचं संपूर्ण डेकोरेशन

आकाश आणि श्लोकाच्या लग्नामध्ये फुलांच्या सजावटीचं संपूर्ण डेकोरेशन

आकाश आणि श्लोकाचं लग्न हे अर्थातच बिग फॅट वेडिंग आहे. या लग्नामध्ये प्रत्येक गोष्ट रॉयल असणार यात नक्कीच कोणाचं दुमत नाही. आकाश आणि श्लोकाच्या लग्नासाठी अंबानीची अँटिलिया ही बिल्डिंग तर अक्षरशः नव्या नवरीप्रमाणे सजवण्यात आली आहे. या लग्नामध्ये कुठेही कमतरता राहू नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. आकाश आणि श्लोकाचं लग्न हे बीकेसीमध्ये होणार असून बीकेसीदेखील अगदी संपूर्ण फुलानी सजलं आहे. लग्नघटिका जवळ आली तसं डेकोरेशनचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. हे खास व्हिडिओ तुमच्यासाठी -

ambani decoration


डोळ्यांना सुख देणारे डेकोरेशन


तेच तेच डेकोरेशन न ठेवता डोळ्यांना सुखद वाटेल असं फुलांचं डेकोरेशन प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेलं आहे. शिवाय या डेकोरेशच्या सोबतीला रोमँटिक गाणीही ऐकू येत आहेत. फुलांनी सजलेला मोर जेव्हा आपला पिसारा फुलवत आहे तेव्हा बघून डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटत आहे. जिओ गार्डनमध्ये होणारं हे लग्न म्हणजे अगदी गार्डनमध्ये असणाऱ्या फुलांप्रमाणे मळा फुलला असल्याचं सध्या दिसून येत आहे. फुलं तर आहेतच पण माणसांचाही एक वेगळा मळा फुलला असल्याचं दिसून येत आहे. अगदी हत्ती, घोडे यांचंही डेकोरेशन करण्यात आलं आहे. एखादं मनमोहक मनाला भावेल असं दृष्यं या डेकोरेशनमुळे जाणवत आहे. जिथे नजर जाईल तिथे हत्ती, घोडे, मोर यांची फुलांनी केलेली सजावट आणि फुलांचीही अप्रतिम रंगसंगती दिसून येत आहे. 


भगवान कृष्णाची कृपा
 

 

 


View this post on Instagram


 

 

Blessings from #lordkrishna #akashambani #shlokamehta wedding ❤️#bigfatindianwedding #desibride #weddingoftheyear @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
अंबानी कृष्णाला खूपच मानत असल्यामुळे सर्व डेकोरेशन हे कृष्णाशी संंबंधित करण्यात आलेलं आहे. याआधी ईशाच्या लग्नातदेखील कृष्णाशी संबंधित डेकोरेशन करण्यात आलं होतं. शिवाय घोडे, आजूबाजूला असलेलं कारंजं हे सर्व डोळ्याला सुखद वाटेल अशा तऱ्हेने सजवण्यात आलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मनाला सुख देणारी कृष्णाची अप्रतिम सजवलेली मूर्ती दिसून येत आहे. तर सर्वच गोष्टी फुलांनी सजवलेल्या दिसत आहेत. कारज्यांच्या समोर करण्यात आलेली सजावट तर तोंडाचा आ वसायला लावणारी आहे. आकाश आणि श्लोकाच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. शिवाय प्रत्येक ठिकाणी फुलांचा सडा आहे. रंगसंगती तर डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे. डेकोरेशनमध्ये प्रत्येक ठिकाणी जितकं रॉयल आहे तितकंच डोळ्याला सुखद वाटेल याचीही काळजी घेण्यात आली आहे. 


लग्न बघायला बिल्डिंगमधील बघ्यांचीही गर्दी

बीकेसीमधील जिओ गार्डनमध्ये हे लग्न होत आहे. तर लग्न बघायला आजूबाजूच्या बिल्डिंगमधील बघ्यांचीही गर्दी जमली आहे. हे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. भारतातील मोठ्या लग्नांपैकी हे एक लग्न असल्यामुळे अनेक दिग्गज मंडळींचीही या लग्नाला उपस्थिती असणार आहे. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी सध्या तोबा गर्दी झालेली दिसून येत आहे. 


फोटो सौजन्य - Viral Bhayani, Instagram 


हेदेखील वाचा 


आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नाआधीच्या विधींना सुरूवात


आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या प्रि-वेडिंग पार्टीमध्ये ‘रणबीर-आलिया’ लाईमलाईटमध्ये


आकाश अंबानी आणि श्लोकाच्या लग्नाचं ‘मंगल पर्व’, पत्रिका व्हायरल