आमीर खानची मुलगी इरा खान झाली विचित्र ड्रेसमुळे ट्रोल, फोटो व्हायरल

आमीर खानची मुलगी इरा खान झाली विचित्र ड्रेसमुळे ट्रोल, फोटो व्हायरल

स्टार किड्सवर सगळ्यांचेच फार लक्ष असते. विशेषत: असे स्टार किड्स ज्यांच्या पालकांनी एक काळ चांगलाच गाजवला होता. त्यांच्याकडे तर फार कटाक्षाने पाहिले जाते. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या मुलीकडेही सध्या सगळ्या पापा राझींचे बारीक लक्ष आहे. ती कुठे जाते? कोणाला डेट करते या विषयीची सगळी माहिती पापाराझी ठेवतात. पापाराझींना तिचा असाच एक फोटो क्लिक केला. पण सोशल मीडियावर मात्र तिच्या याच फोटोवर खिल्ली उडवली जात आहे. इररा खानने घातलेला आऊटफिट यासाठी कारणीभूत असून तिला यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

इराचा हा आऊटफिट नक्की होता तरी काय?

Instagram

इरा खान मुंबईमध्ये एक पार्टी अटेंट करण्यासाठी आली होती. त्यावेळी तिने घातलेला अटायर हा एका प्रिसेंस वॉरियरसारखा होता. तिच्यासोबत आलेल्या मुलीचा ड्रेस मात्र तसा नव्हता. ती गाडीतून उतरल्यानंतर तिचा ड्रेस पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. ब्लॅक लेदरमध्ये असलेला हा ड्रेस शॉर्ट स्कर्ट आणि लेदर पट्टे असलेला ब्लाऊज असा हा वेअर होता. याखाली तिने ब्लॉक हिल्समधील सँडल्स घातल्या होत्या.ती या ड्रेसमध्ये कॉन्फिडंट वाटत होती. पण तरीदेखील लोकांनी तिला यासाठी खूपच ट्रोल केले. तिचे हे फोटो पोस्ट झाल्यानंतर या फोटोवर अनेक वाईट कमेंट पडू लागल्या. आमीर खानचे नाक तू कापणार आहेस असे म्हणण्यापासून ते अगदी तिच्या विचित्र फॅशनसेन्सबद्दल तिला लोकांनी ट्रोल केले आहे. 

Bigg Boss 2 ‘टिकिट टू फिनाले’ शिवानीला मिळणं कितपत योग्य

इराचे फोटो होत असतात व्हायरल

Instagram


इराचे फोटो व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. इरा नेहमीच बोल्ड कपड्यांमध्ये असते.तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. पण ती कोणतेही फोटो कधीच हाईड किंवा डिलीट करत नाही. तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे अनेक फोटो आतापर्यंत शेअर केले आहेत. त्यामुळे ती आधीच चर्चेत असते. नुकतेच तिने तिचे फोटोशूट केले होते. तिचे या फोटोशूटमधील फोटोसुद्धा चर्चेचा विषय ठरले आहेत. कारण फोटोशूटमधील फोटो हे तितकेच बोल्ड आणि वेगळ्या विषयाला धरुन आहे. तिने या फोटोशूटदरम्यान घातलेला ड्रेस तिने पार्टीसाठी घातला होता ते या फोटोवरुन कळत आहे. या शिवाय तिचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर आहे.

#KBC11 च्या पहिल्या 'कर्मवीर स्पेशल' भागात सिंधुताई सपकाळ

बॉयफ्रेंड पॉप सिंगर होण्याच्या तयारीत

Instsagram

इराने तिच्या बॉयफ्रेंडचा एक व्हिडिओ डिरेक्ट केला होता. इंग्लिश पॉप साँग त्याने गायले होते. त्याचा व्हिडिओ पाहता ते गाणं कोणाला आवडेल असं अजिबात नव्हतं. त्या गाण्यात विशेष असं काहीच नव्हतं. उलट त्या गाण्यावर हसूच येईल की, काय असं वाटत होतं. इराचे ते दिग्दर्शन पाहता पुढे ती काय करेल असा प्रश्न अनेकांना पडला होता.

देसी गर्ल प्रियांका ‘युनिसेफ’ची ambassador नको, पाकिस्तानची मागणी

लवकरच करणार डेब्यू

इरा खान लवकरच एका प्लेच्या माध्यमातून डेब्यू करणार आहे असे कळत आहे. यासाठी तिची तयारी सुरु झाली असून ती अभिनयाच्या माध्यमातून नाही तर दिग्दर्शनाच्या माध्यमातून डेब्यू करणार आहे. आता ती कोणत्या माध्यामातून डेब्यू करणार आहे ते कळेलच पण त्या आधी तिच्या या फोटोमुळे काय घोळ होणार आहे ते मात्र पाहावं लागणार आहे.