वडील आमिर खानला आहे मुलगा जुनैद खानबाबत विश्वास  

वडील आमिर खानला आहे मुलगा जुनैद खानबाबत विश्वास  

परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खानही आता बॉलीवूडमध्ये येण्याच्या तयारीत आहे. पण बॉलीवू़डच्या इतर स्टार किड्ससारखा त्याचा प्रवास मात्र नक्कीच सोप्पा असणार नाहीये. कसं ते जाणून घेऊया. आमिरने ठेवली जुनैदपुढे एक अट   
 

 

 


View this post on Instagram


 

 

#aamirkhan #junaidkhan Aamir Khan’s first born, Junaid, has been working closely with his superstar father-filmmaker. Aamir told a source, “Junaid works with me.” The actor-filmmaker is a forward thinker and doesn’t believe in imposing his views on his children — Junaid and Ira. He doesn’t give them career advice and they have always been free to chose their vocation. Quite obviously, Junaid is drawn to the arts. The strapping six feet-plus 20-something lad has assisted filmmaker Rajkumar Hirani on a couple of movies. Now, he has decided to become an apprentice with Aamir, who, we are guessing, will give him the entire 360 degree drill on filmmaking and other aspects related to it. This is also Aamir’s way of spending more time with his son. If he proves to be a chip off the old block, Junaid will be a force to reckon with in the time to come.


A post shared by JunaidKhan Fanclub (@junzi_fans) on
बॉलीवूडमध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा खानच्या एंट्रीनंतर आता आमिर खानही आपला मुलगा जुनैद खानला लाँच करण्याचा विचारात आहे. जान्हवी कपूरने करण जोहरच्या 'धडक'मधून तर साराने 'केदारनाथ'मधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली. पण परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा आहे म्हंटल्यालर जुनैदसाठी बॉलीवूडमध्ये एंट्री करणं एवढं सोप्पं असणार नाहीयं. सूत्रानुसार, आमिरने अट ठेवली आहे की, जुनैद जर स्क्रीन टेस्ट पास झाला तरच त्याला बॉलीवूडमध्ये एंट्री मिळावी. कारण आमिरला जुनैदला अभिनयाच्या बळावर बॉलीवूडमध्ये आणायचंय ना की आमिरच्या स्टारडमच्या बळावर.  


जुनैदला करायचं होतं दिग्दर्शन पण आता करणार अॅक्टींग
 

 

 


View this post on Instagram


 

 

Mr charmer with mom at qsqt screening. #junaidkhan #reenadatta #aamirkhanson #qayamatseqayamattak #30years


A post shared by JunaidKhan Fanclub (@junzi_fans) on
आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खान आधी दिग्दर्शनाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणार होता. पण आमिर खानने नुकताच खुलासा केला की, तो अभिनेता म्हणूनच हिंदी सिनेमांमध्ये येईल. पण तो कोणत्या चित्रपटातून एंट्री करणार याबाबत काही कळलेलं नाही. सध्या आमिर जुनैदसाठी चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असल्याचं कळतंय. आमिर खान हा नेहमीच त्याच्या भूमिकांमधील परफेक्शनसाठी ओळखला जातो. आपला मुलगाही त्याच्या भूमिकेमुळे ओळखला जावा, असं पिता आमिरची इच्छा आहे. 


आमिरला आवडलंय जुनैदचं काम
 

 

 


View this post on Instagram


 

 

#allset #mothercourage #theatre #stage #gwahati #assam #junaidkhanfan #traveldiaries #lifeofanactor


A post shared by JunaidKhan Fanclub (@junzi_fans) on
गेल्या तीन वर्षांपासून जुनैद नाटकांमध्ये काम करत आहे आणि त्याने निवडलेल्या भूमिकाही आमिरला आवडल्यात. त्यामुळे त्याला विश्वास आहे की, जुनैदही बॉलीवूड चांगला अभिनेता म्हणून नक्कीच ओळख बनवेल. अगदी आमिरचा बायोपिक आल्यास त्यालाही जुनैद न्याय देऊ शकेल, असं आमिरला वाटतं. एचआर कॉलेजमधून जुनैदने गॅज्युएशन केलं असून अमेरिकन अकॅडमी आणि ड्रामाटीक आर्ट (लॉस अँजलिस) मधून डिग्री घेतली आहे. जुनैदने राजकुमार हिरानीच्या 'पीके' चित्रपटासाठी असिस्टंट म्हणूनही काम केलं होतं. इन्स्टावर जुनैदचे खास फॅन पेजही आहे. 


हेही वाचा : 


रोहित शेट्टी कँम्पमध्ये पहिल्यांदाच सलमानची एंट्री


यावर्षी बॉलीवूडमध्ये रंगणार 'या' बिग फॅट वेडींगची चर्चा


प्रेमवीरांची दांडी गुल करायला आले 'दांडी गुल' गाणे