'एक होती राजकन्या' मालिकेत आस्ताद काळे साकारणार पत्रकाराची भूमिका

'एक होती राजकन्या' मालिकेत आस्ताद काळे साकारणार पत्रकाराची भूमिका

एक होती राजकन्या या मालिकेने अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील राजकन्या म्हणजेच अवनीचा प्रवास दिवसेंदिवस चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत आता एका पात्राची एन्ट्री होणार आहे. मराठी अभिनेता आस्ताद काळे या मालिकेतील एक प्रमुख भूमिका साकारणार आहे. एक होती राजकन्या या मालिकेत आस्ताद पुष्कराज नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.

अवनी आणि  पुष्कराजची भेट


मालिकेतील पात्र आवडली की प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य वाटू लागतात. या मालिकेतील कर्तव्यनिष्ठ, साधी, हळवी अशी बाबांची लाडकी राजकन्या अवनीदेखील सगळ्यांना भावली आहे. आतापर्यंत झालेल्या एपिसोड्स मधून अवनीचा स्वभाव, तिच्या घरचे वातावरण, तिचे पोलीस खात्यात वावरणे हे आता. प्रेक्षकांच्या चांगलेच ओळखीचे झाले आहे. मात्र अवनीच्या या छोट्याश्या जगात आता एका नवीन पात्राची भर पडली आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आस्ताद काळे साकारत असलेल्या पुष्कराजची एंट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी सुखद धक्काच आहे. पुष्कराज पोलीस ठाण्यात बातमी शूट करत असताना अवनी अनवधानाने त्याच्या वाटेत येते. अवनी आणि पुष्कराजची ही प्रोमोत दिसलेली ओझरती भेट बरंच काही सांगून जाते. पुष्कराज पोलीसांशी बोलत असताना अवनीच्या वडिलांचा संदर्भ आलेला प्रोमोत दिसतो. त्यामुळे तो आणि अवनी त्यांची भेट व्हायच्या आधीच एका अदृश्य धाग्याने बांधले गेले आहेत असे प्रेक्षकांना वाटत आहे. अवनीला आधीपासूनच पुष्वराजबाबत आदर असलेला दिसूम येत आहे. त्यामुळे वरवर पाहता साधी वाटणारी हि अचानक झालेली छोटीशी भेट कोणते वळण घेईल आणि त्यामुळे कथानकात पुढे काय घडेल हे पाहणं आता उत्सुकता वाढविणारं ठरणार आहे. पुष्कराज नेमका कोण आहे आणि त्याचं आणि अवनीचं नेमकं काय नातं आहे  या प्रश्नाची उत्तरे जाणून घेताना मालिकेला एक रंजक वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

अवनीचा ड्युटीवरील पहिला दिवस तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. जप्त झालेला युनिफॉर्म ती परत मिळवू शकेल का नाही हे जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका, एक होती राजकन्या सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता. नवीन वाहिनी, सोनी मराठीवर. #एकहोतीराजकन्या | #EkHotiRajakanya #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati @kiran_dhane


A post shared by Sony मराठी (@sonymarathi) on
आस्ताद काळेच्या भूमिका


आस्ताद काळेने 2007 मध्ये निरोप या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. पुढचं पाऊल आणि सरस्वती या मालिकांमधून त्याला घराघरात लोकप्रियता मिळाली. आस्तादने अनेक मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. शिवाय मराठी बिगबॉसच्या फायनलपर्यंत आस्ताद पोहचला होता. आता एक होती राजकन्या या मालिकेतील त्याच्या या भूमिकेबाबत जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उस्तुक आहेत.


aastad kale 3


खाकी वर्दीतील अवनी


या मालिकेत किरण ढाणेची भूमिका साकारत आहे. किरण ढाणेने  यापूर्वी लागीर झालं जी या मालिकेत जयडीची भूमिका साकारली होती. या मालिकेत जयडीची नकारात्मक भूमिका होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जयडी ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतानाच किरणने काही अंतर्गत कारणामुळे ही मालिका सोडली होती आणि त्यानंतर तिला त्याच साच्यातील भूमिकेमुळे अडकून राहायचं नव्हतं. त्या नकारात्मक भूमिकेतून बाहेर येत किरण साकारत असलेली खाकी वर्दीतील अवनी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे एक होती राजकन्या या मालिका सध्या लोकप्रिय होत आहे.

रणबीर- आलियावर कंगना पुन्हा बरसली, साधला निशाणा


इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये झळकणार संतोष जुवेकर


तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांसाठी खुशखबर, दयाबेन येणार परत


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम