तुला पाहते रे मधील मायरा साकारणार 'हटके' भूमिका

तुला पाहते रे मधील मायरा साकारणार 'हटके' भूमिका

तुला पाहते रे या लोकप्रिय मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेली 'मायरा' अर्थात मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच एक आगळीवेगळी भूमिका साकारत आहे. सूरसपाटा या आगामी चित्रपटात ती नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. सुरसपाटा हा चित्रपट कबड्डी या खेळावर आधारित आहे. या चित्रपटात अभिज्ञा एका कबड्डीपटूच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. प्रत्येकाच्या जीवनात मोठ्या बहिणीचे स्थान हे अनन्यसाधारण असते. आईनंतर जर आपल्यावर कोणी जीवापाड प्रेम करतं तर ती असते आपली 'मोठी ताई'. सुरसपाटामध्ये अभिज्ञा एका ध्येयवेड्या कबड्डीपटूची ताई साकारणार आहे. चिन्मय पटवर्धन या चित्रपटात 'पूरन' या कबड्डीपटूची भूमिका साकारत  आहे. या पुरनचीच ती मोठ ताई असणार आहे. पूरनच्या यशामध्ये या ताईचा मोलाचा वाटा असणार आहे. त्याच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ती खंबीरपणे उभी असणार आहे. खरंतर यापूर्वी अभिज्ञाने अशा प्रकारची गंभीर भूमिका कधीच केलेली नाही. त्यामुळे ही भूमिका अभिज्ञासाठी खास असणार आहे. शिवाय यामुळे तिच्या अभिनयातील एक वेगळा पैलू जगासमोर येणार आहे.


abhi new


अभिज्ञाचा अभिनय प्रवास


अभिज्ञा भावे हे नाव आज मालिकेंच्या दुनियेत लोकप्रिय होत आहे.सध्या तुला पाहते रे मध्ये अभिज्ञा साकारत असलेल्या मायराच्या भूमिकेला नकारात्मक छटा असूनही लोकांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. अभिज्ञाने यापूर्वी देवयानी, लगोरी, खुलता कळी खुलेना, कट्टी -बट्टी अशा मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. तिच्या आतापर्यंतच्या सर्वच भूमिका थोड्या फार नकारात्मक छटा असलेल्या होत्या. त्यामुळे सूरसपाटामधील नव्या भूमिकेत अभिज्ञाला पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.


abhidnya bhave


सूर सपाटा चित्रपट 22 मार्चला प्रदर्शित


सूर सपाटा चित्रपट 22 मार्चला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात दुनियादारी फेम संजय जाधव नकारात्मक भूमिकेतून दिसणार आहे तर अभिनेता उपेंद्र लिमये एका प्रमुख भूमिकेत असणार आहे. या कलाकारांव्यतिरिक्त आणखी अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असण्याची शक्यता आहे. किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे यांनी या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाची कथा मंगेश कंठाळे यांची आहे. गावागावांमध्ये उनाडक्या करणारी मुलं ते यशाचं शिखर गाठणारे कबड्डीपटू असा प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Subscribe to POPxoTV

चित्रपटसृष्टीत वाहत आहेत खेळाचे वारे


सध्या बॉलीवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीत खेळांवर आधारित विविध चित्रपटांची निर्मिती होत आहे. बॉलीवूड  अभिनेत्री कंगना रणौतचा ‘पंगा’ हा चित्रपट देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पंगा चित्रपटदेखील कबड्डीवर आधारित  आहे. दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी या चित्रपटासाठी कंगनावर विशेष मेहनत घेत आहेत. मणिकर्णिकाच्या यशानंतर कंगना या चित्रपटासाठी कबड्डीचे धडे गिरविण्यासाठी सज्ज झाली आहे. बिग बी अभिताभ बच्चन नागराज मंजुळे दिग्गर्शित ‘झुंड’ या चित्रपटात काम करत आहेत. झुंड चित्रपट फुटबॉल या खेळावर आधारित आहे. अमिताभ बच्चन या चि्त्रपटात फुटबॉल कोचची भूमिका साकारणार आहे. सध्या कबड्डी या खेळाला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. अनेक वर्ष प्रसिद्धीपासून दूर असलेला अस्सल मातीतील हा खेळ प्रो- कबड्डीमध्ये ले पंगा म्हणत लोकप्रियतेचं शिखर गाठत आहे. आता हिंदीमधील ‘पंगा’ आणि मराठीतील ‘सूर सपाटा ‘या दोन चित्रपटांमधून घराघरात हा खेळ पोहचेल हे निश्चित.


sur sapata


अधिक वाचाः


अभिनेत्री करिश्मा कपूर करतेय कमबॅक


‘माझं लग्न झालं आहे’ म्हणाली आलिया भट


‘गलीबॉय’चा कहर, पाच दिवसात 75 कोटींचा गल्ला


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम