Bigg Boss: अभिजीत बिचकुलेची पुन्हा होणार एंट्री

Bigg Boss: अभिजीत बिचकुलेची पुन्हा होणार एंट्री

चेक बाऊंसप्रकरणी घरातून बेघर करण्यात आलेल्या अभिजीत बिचुकलेला अखेर दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातून त्याची सुटका झाल्यामुळे अभिजीत बिचुकलेचा Bigg Boss च्या घरात घरवापसी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडलेला बिचुकले घरात परतल्यानंतर आता घरातील इतर सदस्यांच्या काय प्रतिक्रिया असणार ? बिचुकले घरात कोणते राजकारण खेळणार या सगळ्यासाठी त्याच्या रिएंट्रीची वाट पाहावी लागणार आहे.

फिर्यादीच फिरला

Instagram

अभिजीत बिचुकलेला घरातील सदस्यांना किती त्रास होतो ते सर्वश्रूत आहे. दोनच दिवसांपूर्वी रुपाली भोसलेसोबत जोरदार वाजलं यात तो तिला अर्वाच्च बोलला. त्याला बाहेर काढण्याची मागणी अनेक महिला संघटनांनी केली. हा वाद शांत होत नाही. तोच बिचुकलेविरोधात सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. चेक बाऊंसप्रकरणी त्याला सातारा पोलिसांनी शुक्रवारी मुंबईतून ताब्यात घेतले. त्याला साताऱ्यात आणल्यानंतर त्याचा जामीन अर्ज शनिवारी फेटाळण्यात आला. पण फिर्यादी अचानक फिरला त्याने बिचुकलेविरोधात काहीही तक्रार नाही असे सांगितले. शिवाय आता ज्याने तक्रार केली त्यानेच तक्रार मागे घेतल्यामुळे अभिजीत बिचकुललेला दिलासा मिळाला आहे. फिर्यादीच फिरल्यामुळे बिचुकलेला चांगलाच फायदा झाला आहे.

अभिजीत बिचुकलेला घरातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे मागणी

तक्रारदाराने का घेतली तक्रार मागे

Instagram

सध्या रिअॅलिटी शोमध्ये अभिजीत बिचुकलेचीच चर्चा आहे. त्याचे वागणे जितके खटकते तितकेच ते एटंरटेनिंग आहे असे लोकांना वाटते म्हणून त्याचा टीआरपी जास्त आहे. साताऱ्यात बिचुकले विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदाराने तक्रार मागे घेताना जे लिहून दिलं आहे ते ऐकून आणखी आश्चर्य वाटेल. त्याने त्यात म्हटले  आहे की, अभिजीत बिचुकले या खेळाच्या माध्यमातून साताऱ्याचे नाव मोठ करत आहे.तो असाच खेळत राहिला तर तो हा शोसुद्धा जिंकेल. त्यामुळे त्याच्या विरोधातील माझी तक्रार मी मागे घेत आहे असे तक्रारदार फिरोज पठाण याने लिहले आहे. 

नो कमेंटस…

Instgram

Bigg Boss च्या घरातून थेट अटकेत घेतल्यानंतर अभिजीत बिचुकलेचा बाईट घ्यायला प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्याच्या बाईटसाठी त्याच्या मागे लागले होते. पण त्यावेळी त्याने नो कमेंटस म्हणत सगळ्या गोष्टी टाळल्या होत्या. पण आता सुटका झाल्यानंतर या विषयी तो  स्पर्धेत परतल्यानंतर नेमकं काय सांगणार याकडे अनेकांना उत्सुकता लागली आहे. 

अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी केली अटक

हा तर नाही ना रिअॅलिटी स्टंट

बिचुकलेच्या काहीही बोलण्यामुळे तो नेहमीच फुटेज खातो, हे अनेकांना माहीत आहे. पण आता अटकेचं हे नाटक म्हणजे एखादा रिअॅलिटी स्टंट तर नाही ना ? असा संशय येऊ लागला आहे. कारण शुक्रवार ते सोमवार इतकेच दिवस हे नाटक सुरु झाले. तक्रारदारही अचानक तक्रार मागे घ्यायला तयार होणे हा निव्वळ योगायोग आहे की, नुसतात स्टंट असा संशय येऊ लागला आहे.

रुपालीला दिल्या अर्वाच्च शिव्या

Instagram


हे सगळं प्रकरण होण्याआधी रुपालीसोबत एका टास्कदरम्यान बिचुकलेचं जोरदार वाजलं होतं. त्यानंतर बिचुकलेच्या विरोधात अनेक महिला संघटना उभ्या राहिल्या. भाजपच्या माजी नगरसेवक रितू तावडे यांनी तर चक्क बिचुकलेला घरातून बाहेर काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर बिचुकलेला घरातून बाहेर काढणार का याकडे सगळ्यांचे लागले होते.त्यावर निर्णय होणार या आधीच त्याचे चेक बाऊन्सप्रकरण समोर आले.

 अशी रंगली Bigg Boss च्या घरात शाळा