ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सोनू निगमच्या ‘रकम्मा’ गाण्यावर अभिनय करणार हटके डान्स

सोनू निगमच्या ‘रकम्मा’ गाण्यावर अभिनय करणार हटके डान्स

आतापर्यंत प्रेमावर असंख्य चित्रपट येऊन गेले आहेत. तरीही प्रेम म्हटलं की, कोणताही चित्रपट बघावा वाटतोच. पण मराठीमध्ये असे चित्रपट फारच कमी प्रमाणात पाहायला मिळाले आहेत. वास्तविक ‘आशिक’ आणि ‘आशिकी’ हे दोन शब्द जरी उच्चारले तरी ‘लैला-मजनू’, ‘रोमिओ-जुलिएट’ यांसारख्या रोमँटिक आणि प्रेमळ जोड्या आणि त्यांची लव्हस्टोरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आशिकी म्हटलं की प्रेमातला वेडेपणा, जीव ओतून समोरील पार्टनरला खूष करण्याचे प्रयत्न या गोष्टी हक्काने येतातच. अशीच आशिकी आता मराठीत पाहायला मिळणार आहे. अभिनय बेर्डे या चित्रपटात प्रमुख भूमिका करणार असून सचिन पिळगावकर बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शन करत आहेत. ‘अशी ही आशिकी’ हा मराठी चित्रपट येत्या 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सोनू निगमने गायलेल्या धमाकेदार ‘रकम्मा’ गाण्यावर अभिनय करणार हटके डान्स करताना दिसत असून हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

अभिनय पहिल्यांच करणार धमाकेदार डान्स

गुलशन कुमार प्रस्तुत, टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित आणि सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाचा टीझर रिलीझ झाल्यानंतर अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे साकारत असलेल्या ‘स्वयम-अमरजा’च्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नवीन विषय, नवीन जोडी, चित्रपटाचे कॅची नाव आणि प्रेक्षकांच्या भेटीला आलेला टीझर आदी गोष्टी चित्रपटाविषयीची आतुरता वाढवत आहेत. इतकेच नव्हे तर, १४ फेब्रुवारीला व्हॅलेंनटाईन्स डे ऐवजी AHA Day साजरा होणार म्हणजे नेमकं काय हॅपनिंग पाहायला मिळणार याविषयी देखील कुतुहल अनेकांच्या मनात आहे. अभिनय पहिल्यांदाच धमाकेदार डान्स करत आहे. सोनू निगमच्या आवाजातील हे धमाकेदार गाणं प्रदर्शित झालं असून सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

स्वयम – अमरजाची आशिकी
स्वयम आणि अमरजा या कपलची आशिकी चित्रपटातून तर फुलणार आहेच पण त्यांची लव्हस्टोरी गाण्यामधूनही फुलणार आहे. प्रेमात जस-जसे अनेक टप्पे पार पाडावे लागतात, जसे की पहिली भेट, पहिली आठवण वैगरे वैगरे… तसंच काहीसं या प्रेमात पण होणार आहे. स्वयम आणि अमरजाच्या आशिकीची थोडीशी हिंट देण्यासाठी नुकतेच या चित्रपटातील ‘रकम्मा’ हे गाणं डिजीटल मिडीयावर रिलीज करण्यात आले आहे. ‘रकम्मा’ या गाण्यातून आपल्याला स्वयम रकम्माला शोधतोय हे दिसून येत आहे. पण अमरजच्या प्रेमात असलेला स्वयम अचानकपणे रकम्माला का शोधतोय आणि मुळात कोण आहे ही रकम्मा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. या गाण्याच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना नवीन वर्षात सोनू निगमच्या आवाजाची जादू अनुभवयाला मिळणार आहे. सोनू निगमने या चित्रपटातील सर्व गाणी गायली आहेत. तर संगीत सचिन पिळगावकर यांनी दिलं आहे. आता लवकरच अभिनयची जादू पुन्हा पडद्यावर चालणार का हे पाहायला मिळेल.

ADVERTISEMENT

14 फेब्रुवारीला होणार चित्रपट प्रदर्शित

सचिन पिळगावकर पाच वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शन करत असून या चित्रपटाचं लेखन, संगीत आणि दिग्दर्शन या सर्व धुरा सचिन पिळगावकर यांनी सांभाळल्या आहेत. अभिनयचा हा दुसरा चित्रपट असून पहिल्या चित्रपटात त्याने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. आता पुन्हा एकदा अभिनय काय वेगळं काम करत आहे याचीदेखील सर्व चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ही लव्ह स्टोरी असल्यामुळे प्रेमाचा दिवस अर्थात 14 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

09 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT