Lockdown मुळे दिल्लीत अडकलेल्या जया बच्चन यांना मिस करतोय अभिषेक

Lockdown मुळे दिल्लीत अडकलेल्या जया बच्चन यांना मिस करतोय अभिषेक

नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो...आईचा वाढदिवस हा प्रत्येक मुलासाठी खास असतो. पण नेमकी त्याच दिवशी आईसोबत नसेल तर हूरहूर लागते. सध्या अभिनेता अभिषेक बच्चनचंही तसंच झालंय. काय झालं नेमकं वाचा.

अभिनेत्री जया बच्चन यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. पण या खास दिवशी त्या आपल्या कुटुंबापासून दूर दिल्लीत आहेत. कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन झाल्याने जया बच्चन दिल्लीतच अडकल्या. पण आपल्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिषेक बच्चन आपल्या आईला मिस करत आहे आणि ते साहजिक आहे. आईच्या वाढदिवशी त्याने तिचा छानसा फोटो शेअर करत बर्थडे विश केलंय आणि प्रेमळ संदेशही लिहीला आहे. अभिषेकने आईला विश करताना लिहीलं आहे की, प्रत्येक मुलाचा आवडता शब्द असतो आई. माझाही आहे. हॅपी बर्थडे मां. तू दिल्लीत लॉकडाऊनमुळे अडकली आहेस आणि आम्ही सगळे इकडे मुंबईत आहोत. आम्ही प्रत्येक क्षणी तुझी आठवण काढत आहोत आणि तू आमच्या मनात आहेस. आय लव्ह यू. अभिषेकसोबतच त्याची बहीण श्वेता बच्चननेही आईसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करत त्यांना विश केलं आहे. श्वेताने लिहीलं आहे की, माझ्या मनात नेहमीच तू असतेस. मी कुठेही तुझ्याशिवाय जाऊच शकत नाही. हॅपी बर्थडे मम्मा. आय लव्ह यू. 

जया बच्चन यांचं फेव्हरेट कोण अभिषेक की श्वेता?

घरात दोन भावंड असली की, त्यांच्यात नेहमीच वाद असतो की, आईचं जास्त लाडकं कोण? अभिषेक आणि श्वेता दोघंही जयाजींशी क्लोज बाँड शेअर करतात. पण कॉफी विथ करण या शोमध्ये श्वेताने सांगितलं होतं की, अभिषेक जयाजींचा लाडका आहे. त्या अभिषेकवर खूप प्रेम करतात. तर अभिषेकने सांगितलं होतं की, अमिताभ बच्चन यांची लाडकी श्वेता आहे.

बॉलीवूडमध्ये जया बच्चन यांची गणती अशा अभिनेत्रींमध्ये होते, ज्यांनी समाजाची विचारधारा बदलणाऱ्या आणि सशक्त भूमिका साकारून स्वतःची ओळख बनवली. अभिषेकबाबत बोलायचं झाल्यास लवकरच त्याची वेबसीरिज ब्रेथ सिझन 2 येणार आहे. तसंच त्याचा चित्रपट बॉब बिस्वासचं शूटींगही सुरू झालं आहे.

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.