अभिषेक बच्चनच्या 'दसवी'चं आग्रामध्ये शूटिंग झालं पूर्ण, शेअर केले मजेशीर किस्से

अभिषेक बच्चनच्या 'दसवी'चं आग्रामध्ये शूटिंग झालं पूर्ण, शेअर केले मजेशीर किस्से

अभिषेक बच्चन एका हटके विषयासह प्रेक्षकांसमोर येणार आहे. लवकरच त्याचा 'दसवी' चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचं आग्रामधील शूटिंग पूर्ण देखील झालं आहे. शूटिंगचं पहिलं शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर पुढच्या शूटिंगसाठी टीम लखनऊमध्ये रवाना झाली आहे. अभिषेक मात्र मुंबईत परतला असून तो मुंबईतूनच त्याच्या चित्रपटाचं बाकीचं काम करणार आहे. या चित्रपटातील अभिषेकच्या लुकबद्दल चाहत्यांना खूपच उत्सुकता लागली आहे. शिवाय अभिषेकही सोशल मीडियावरून या चित्रपटाचे अपडेट त्याच्या चाहत्यांना सतत देत आहे. 

कसा होता अभिषेकचा आग्रामधील दिनक्रम

अभिषेक बच्चन या शूटिंग दरम्यान उत्तरप्रदेशमध्ये राहण्याचा खूपच आनंद लुटला आहे. एक तर उत्तर प्रदेश हे त्याच्या पूर्वजांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे  य ठिकाणी त्याच्या अनेक भावना गुंतलेल्या आहेत. शिवाय आग्रात असल्यामुळे शूटिंग दरम्यान दररोज सकाळी उठल्यावर तो ताजमहलचं दर्शन घेत असे. दररोज प्रेमाच्या या प्रतिकाकडे पाहत पाहत त्याची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या रॉयला फोन करून तिच्याशी गप्पा मारणं हा अनुभव त्याच्यासाठी खूपच रोमॅंटिक होता. आग्रामधील दसवीचं शूटिंग अभिषेकसाठी खूपच आनंददायी होतं आणि याच कारणासाठी तो पुन्हा पुन्हा या शहरात येण्यास कधीही तयार असेल असं त्याचं म्हणणं आहे. 

गंगारामची भूमिका साकारणार अभिषेक

दसवी चित्रपटात अभिषेक बच्चन गंगाराम चौधरीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात त्याचा लुकदेखील स्पेशल आहे. मोठी पगडी, लांबसडक मिशा आणि पारंपरिक वेशभूषा असा त्याचा लुक असणार आहे. अभिषेकने या चित्रपटातील शेअर केलेला लुक त्याच्या चाहत्यांनाही खूपच आवडला आहे. ज्यामुळे चाहत्यांना आता या चित्रपटाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात यामी गौतमीने ज्योति देसवालची भूमिका साकारली आहे. तिच्या लुकवरून ती एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असं वाटत आहे. या चित्रपटात निम्रत कौरचीदेखील महत्त्वाची भूमिका असेल या चित्रपटात ती एक नेता असण्याची शक्यता आहे. तिचं नाव या चित्रपटात बिमला देवी असं असेल. दसवीचं दिग्दर्शन तुषार जलोटा करत आहे.चित्रपटाचं शूटिंग 22 फेब्रुवारीला सुरू झालं होतं. आता या चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. रितेश शाह, सुरेश नायर आणि संदीप लेजेल यांनी या चित्रपटाची कथा लिहीली आहे.

अभिषेकचे आगामी चित्रपट

दसवी चित्रपटाच्या शूटिंगनंतर अभिषेक मुंबईत परतला असून बाकीचे काम तो मुंबईतून करणार आहे. अभिषेकला यानंतर त्याच्या 'ब्रीद' या वेबसिरिजचं शूटिंगही त्याला लवकर पूर्ण करायचं आहे. ब्रीदमधील अभिषेकची भूमिका सर्वांना धक्का देणारी असणार अशी चर्चा आहे. यासोबतच अभिषेकच्या 'बॉबी बिस्वास'चीही सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यानंतर तो त्याच्या 'दोस्ताना' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करेल. दोस्तानाच्या सिक्वलमधून पुन्हा एकदा अभिषेक  आणि जॉन अब्राहम प्रेक्षकांसमोर येणार आहेत. यावेळी मात्र दोस्तानाचं कथानक थोडं वेगळं असणार आहे. जॉन अब्राहमने साऊथ चित्रपट अय्यप्पनुम कोशियमच्या रिमेकचे अधिकार खरेदी केले आहेत. मूळ मल्याळम असलेल्या या चित्रपटाचा रिमेक दोस्तानामध्ये असण्याची शक्यता आहे.