श्रद्धा कपूरच्या गाण्यावर थिरकली लक्ष्मी, व्हिडिओ व्हायरल

श्रद्धा कपूरच्या गाण्यावर थिरकली लक्ष्मी, व्हिडिओ व्हायरल

अॅसिड हल्ल्यातील विक्टीम लक्ष्मी अग्रवालचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या  व्हिडिओमध्ये लक्ष्मी श्रद्धा कपूरच्या एका गाण्यावर थिरकत असून स्वत: श्रद्धा कपूरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. श्रद्धाच्या छम छम या गाण्यावर ती थिरकली असून तिच्या या डान्ससोबत तिच्या केसांचीदेखील सोशल मीडियावर तारिफ होत आहे. एकूणच जगण्याची नवी प्रेरणा देणारा असा हा लक्ष्मीचा व्हिडिओ आहे.


विराट कोहलीच्या घरी येणार नवा पाहुणा, अनुष्का गरोदर?


पाहा लक्ष्मीचा हा अफलातून परफॉर्मन्स
 

 

 


View this post on Instagram


 

 

😘🥰💫🦋❤️ @thelaxmiagarwal


A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on
 काही दिवसांपूर्वी श्रद्धा थिरकली होती दिलबरवर 


काही दिवसांपूर्वी श्रद्धाचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यात ती 'दिलबर' या गाण्यावर थिरकत होती. तिला या गाण्यावरी डान्सचे धडे या गाण्याची डान्सर नोरा फतेही देत होती. या व्हिडिओमध्येही ती धम्माल करत होती. 


तैमुर करतोय डेब्यु, आईसोबत दिसणार चित्रपटात


 काय झाले होते लक्ष्मीसोबत?


2005 साली लक्ष्मीवर हा अॅसिड हल्ला झाला. त्यावेळी ती साधारण १५ वर्षांची असेल. तिच्याच परिसरात राहणाऱ्या नदीम खानला (त्यावेळी ३२)  लक्ष्मी अग्रवालसोबत लग्न करायचे होते. पण लक्ष्मीला हे लग्न मान्य नव्हते. तिने त्याला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला पण तो समजून घेण्यास तयार नव्हता. लक्ष्मीने त्याला नकार दिलेला त्याला सहन झाला नाही आणि त्याने संधी साधून तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. या अॅसिड हल्ल्यानंतर तिचे आयुष्य बदलून गेले. लक्ष्मीला गायक व्हायचे होते.पण घटनेनंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि तिने या विरोधात लढा देण्याचे ठरवले.


laxmi 10 years


मदर अॅडॉटर व्हिडिओ


लक्ष्मी सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अॅक्टीव्ह असते. तिच्या मुलीसोबतचे तिचे कितीतरी व्हिडिओ तिने आतापर्यंत पोस्ट केले आहेत. यात दोघीही त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात तिच्या मुलीचे नाव पिहू आहे. पिहूसोबतचे अनेक व्हिडिओ ती नेहमीच शेअर करत असते. त्यामुळे तिचे कुटुंबच तिच्या या खडतर प्रवासाचा आधार आहे, असे म्हणायला हवे.  

 

 


View this post on Instagram


 

 

#sabsepyarakounhai #puhu 💕


A post shared by Pihu_she (@pihu_she) on
कसौटी जिंदगी मालिकेतून बाहेर पडत हिना एन्जॉय करतेय सुट्टी


लक्ष्मीवर येतोय चित्रपट


आता तुम्हा सगळ्यांना माहीत झालेच असेल की, लक्ष्मीच्या या जीवनप्रवासावर ‘छपाक’नावाचा एक चित्रपट देखील येणार आहे. दीपिका पदुकोण यामध्ये लक्ष्मीची भूमिका साकारणारा आहे. काहीच दिवसांपूर्वी लक्ष्मीच्या रुपातील एक फोटो दीपिकाने तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला होता. मेघना गुलजार यांचा हा चित्रपट असून या चित्रपटाचे शुटींगही सुरु झाले आहे. २०२०मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


लक्ष्मीला चित्रपटावर पूर्ण विश्वास


लक्ष्मीचा एकूणच प्रवास हा प्रेरणादायी आहे. तिला तिच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनवण्याची इच्छा जेव्हा व्यक्त करण्यात आली तेव्हा तिला आनंद झाला. शिवाय दीपिका तिची भूमिका साकारणार म्हटल्यावर तिला अधिक आनंद झाला. चित्रपटावर तिला पूर्ण विश्वास असून तिचा हा चित्रपट अनेक अशा मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल ज्यांना नाहक अॅसिडने जाळण्यात आले. शिवाय समाजाची प्रवृत्ती बदलण्यासाठीही हा चित्रपट मदत करेल अस लक्ष्मीला विश्वास आहे.


laxmi agrwal work