देशात सध्या भयावह स्थिती सुरु आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा कोरोनाने घाबरवून ठेवलेले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढणारा आकडा आणि देशात ओढावलेली लॉकडाऊनची स्थिती पाहता सगळेच संभ्रमात आहेत. देशात सुरु असलेल्या सगळ्या गोंधळामुळे अभिनेत्री तेजस्विनी पंडीतही गोंधळून गेलेली आहे. कोरोनापेक्षाही देशाला पोखरणाऱ्या राजकारणाने हैराण करुन टाकले आहे. त्यामुळेच तिने एक सर्वसामान्य आणि एक सुजाण नागरिक म्हणून एक स्टोरी शेअर करत सध्याच्या भयाण परिस्थितीबद्दल सगळ्यांना विचार करायला भाग पाडले आहे.
तेजस्विनीने शेअर केली स्टोरी
तेजस्विनीने एक स्टोरी शेअर केली आहे. ज्या स्टोरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने तिच्या स्टोरीवर सध्या देशात सुरु असलेल्या कोरोनासारख्या भयावहस्थितीवर भाष्य केले आहे. पण असे करताना तिने सध्या सुरु असलेल्या राजकारणावरही प्रकाश टाकला आहे. तिने या स्टोरीमध्ये लिहिले आहे की, सगळ्यात मोठी जी कीड आपल्या देशाला आपल्या जगाला लागली आहे ती ‘राजकारण’… ही कीड कोविडपेक्षा घातक आणि आपल्याला पोखरत जाणारी आहे. ‘कीड’ पासून बचाव करता आला तर बघा.. अवघड आहे सगळंच काळजी घ्या. असे तिने यामध्ये म्हटले आहे. यावरुन देशात सुरु असलेली कोरोना स्थिती आणि त्यासाठी होणारे राजकारण या सगळ्याचाच अंदाज येत आहे. ती या सगळ्यामुळे उद्विग्न झाली आहे हेही कळत आहे.शिवाय तिने शेवटी प्रत्येकाला काळजी घेण्यासही सांगितले आहे.
कोरोनाचा फटका सोसत आहेत हे बिग बजेट चित्रपट
पुन्हा लॉकडाऊन आणि टेन्शन
देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. पण देशात एकीकडे केसेस वाढत असताना दुसरीकडे सुरु असलेले राजकारण हे अनेकांना संभ्रमात टाकत आहे. देशाने आणि संपूर्ण जगाने आपले एक वर्ष या साथीच्या आजारामध्ये घालवले आहे. अनेकांना बरेच नुकसान झाले आहे. पण आता पुन्हा एकदा या कोरोनाने डोकं वर काढलं आहे. पुन्हा एकदा रुग्णालयाची कमतरता आणि पेशंटची वाढती संख्या ही अनेकांना डोक्याला ताप देत आहे. पुन्हा एकदा शूटिंगवर गदा आलेली आहे. ज्यामुळे मनोरंजन क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. पण आजुबाजूची परिस्थिती पाहता सगळ्यांसाठीच कठीण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जी तेजस्विनीने व्यक्त केली आहे.
अपघातातून बचावली गौतमी देशपांडे, चाहत्यांना दिली माहिती
ती सध्या काय करते?
तेजस्विनी पंडीत अनेक मराठी दर्जेदार चित्रपटात तिने कामं केली आहेत. लॉकडाऊनच्या काळात तिचे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नसले तरी देखील ती तिच्या सोशल मीडियामधून कायमच वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. तिने नवरात्रीच्या दरम्यान केलेले एक शूट हे फारच गाजले होते. तिने वेगवेळ्या क्षेत्रातील महिलांना सलामी देण्यासाठी त्यांची निरनिराळी रुपे वेषभूषेच्या माध्यामातून साकारली होती. त्यावेळी तिची फारच स्तुती झाली होती.
तेजस्विनीने शेअर केलेली ही स्टोरी सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे ज्याचा विचार करण्याची आपल्या सगळ्यांनाच गरज आहे.