महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकरांचा मुलगा करतोय अभिनय क्षेत्रात एंट्री

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकरांचा मुलगा करतोय अभिनय क्षेत्रात एंट्री

आतापर्यंत बॉलिवूडच्या स्टारकिडच्या अभिनय क्षेत्रातील एंट्रीविषयी जोरदार चर्चा नेहमीच रंगते. पण मराठीमध्ये असे फारच कमी चेहरे असतील ज्यांच्या मुलांनी सिनेक्षेत्राची निवड करिअर म्हणून केले आहे. गश्मीर महाजनी, शुभंकर तावडे अशी काही नाव जरी आपल्या समोर नक्कीच असतील. आता आणखी एका एका प्रसिद्ध मराठी सेलिब्रिटीचा मुलगा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांचा मुलगा लवकरच एका मालिकेतून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात करणार आहे. अभिनयातील त्याच्या एन्ट्रीबद्दल स्वत: आदेश बांदेकरांना ही माहिती दिली आहे. आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर नेमका कोणत्या मालिकेतून पदार्पण करणार आहे ते जाणून घेऊया.

मालदिव्जमध्ये आहे बिपाशा बासू, शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट

पोलिसांच्या वर्दीत दिसणार सोहम

 तुम्ही मराठी मालिकांचे चाहते असाल तर स्टार प्रवाहवर येणारी ‘नवे लक्ष्य’ या मालिकेचे प्रोमो तुम्ही नक्की पाहिले असतील. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचे पालन करत अहोरात्र ऑनड्युटी असणाऱ्या पोलिसांवर आधारीत अशी ही मालिका आहे. या आधीही लक्ष्य या नावाने ही मालिका सुरु होती. अत्यंत हुशारीने गुन्ह्याची उकल करणारे पोलीस यामध्ये दाखवण्यात आले होते. ही मालिका सुपरडुपर हिट झाली होती. आता हीच मालिका पुढे जात तिचे नाव ‘नवे लक्ष्य’ असे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मालिकेमध्ये आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेची निर्मिती स्वत: आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनचे आहे. 

सोहमने घेतली विशेष मेहनत

सोहमला होम प्रोडक्शनची ही मालिका मिळाली असली तरी त्याने या रोलसाठी बरीच मेहनत केलेली दिसत आहे. लॉकडाऊनचा वेळ सत्कारणी लावत त्याने या मालिकेसाठी चक्क आपले वजन कमी केले आहे. त्याचे अनेक व्हिडिओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. घरीच जीम आणि योग्य आहार घेत त्याने आदर्श पोलीस दिसण्यासाठी आपली फिजिक बनवली आहे.सोहमचे काही जुने फोटो पाहिल्यानंतर त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाचा चांगलाच अंदाज येतो. तो आताच्या नव्या फोटोमध्ये फिट आणि फाईन दिसत असून त्याची एक वेगळीच बाजू बघायला मिळत आहे.

घटस्फोटाचे रहस्य लवकरच उलगडणार, 'मंगलाष्टक रिटर्न' येत आहे

अनेकांना उत्सुकता

महाराष्ट्राचे लाडके भावोजी हे अनेकांसाठी जीव की प्राण आहेत. होम मिनिस्टर या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे मराठी इंडस्ट्रीमधील नावाजलेले चेहरे आहेत. त्यामुळे त्यांचा मुलगा या क्षेत्रात पदार्पण करणार म्हटल्यावर अनेकांना उत्सुकता आहे. सोहमने त्याच्या इन्स्टा पोस्टमध्ये कुठेही नव्या मालिकेचा किंवा त्याच्या पदार्पणाचा उल्लेख केलेला नाही. पण तो पोलिसाच्या भूमिकेत दिसणार याबद्दल आदेश बांदेकर यांनी काही वृत्तपत्रांना सांगितले आहे.

प्रोमो ठरत आहेत हिट

लक्ष्य ही मालिका आधीही अनेकांच्या पसंतीस उतरली होती. युनिट 8 चं पथक गुन्ह्याचा मागोवा घेत आरोपीला शोधताना आपण सगळ्यांनी पाहिले आहे. ही शोधमोहीम आणि पोलिसी वर्दीतील पोलीस यांविषयी अभिमान निर्माण करणारी ही मालिका आहे. आता या नव्या भागाचे प्रोमो प्रसारीत झाल्यानंतर त्यातील नवी पोलिसांची बॅच पाहून अनेकांना आनंद झाला आहे. कारण याचे प्रोमो हे सोशल मीडियावर हिट ठरत आहे. 


आता सोहम बांदेकरचा रोल या मालिकेत काय आहे ते पाहण्याची उत्सुकता अनेकांना आहे. 

नव्या मराठी मालिकांची लागणार वर्णी, या मालिका घेत आहेत निरोप