सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे कोडे अद्याप उलगडले नाही तोच मुंबईत आणखी एका अभिनेत्याच्या मृत्यूने गोंधळ निर्माण केला आहे. रविवारी अंधेरीतील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. नवोदित कलाकार म्हणून ओळख असलेला अभिनेता अक्षत उत्कर्षच्या अस्माक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. तो आत्महत्या करु शकत नाही. तर त्याचा खून करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला असून त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, हे नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊया.
लग्न, घटस्फोटाची चर्चा फक्त बिग बॉस 14 साठी, काय म्हणाली यावर पूनम पांडे
गळफास लावून केली आत्महत्या
अक्षत हा अंधेरीत राहात होता. तो नोकरी आणि अभिनय दोन्ही करत होता. नवोदित कलाकार म्हणून त्याने नाव कमावले होते. रविवारी ( 27 सप्टेंबर) ला रात्री उशिरा त्याचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत दिसला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे प्राथमिक तपासानुसार सांगितले. पण कुटुंबियांना ही आत्महत्या असल्याचे पटले नाही. त्यांनी हा खूनच असल्याचे म्हटले आहे. कुटुंबियांनी मुंबई पोलिसांकडे यासंदर्भात मदत मागत याचा अधिक तपास करण्याची मागणी केली आहे. पण पोलिस योग्य दिशेने तपास करत नसल्याची नाराजी कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी या संदर्भात अधिक तपास सुरु असल्याचे सांगत कुटुंबाला पोस्टमार्टम रिपोर्टही सुपूर्त केला आहे.
मृत्यूच्या दिवशीच कुटुंबियांशी बातचीत
अक्षतच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार अक्षतने त्यांच्या वडिलांशी मृत्यूच्याच दिवशी फोनवरुन वडिलांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेचच काही तासांत त्याने आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. त्यामुळे कुटुंबाला याचा फारच धक्का बसला आहे. अक्षतच्या फ्लॅटवरुन सुसाईड नोट अथवा इतर काही गोष्टी सापडल्याचा कोणताही पुरावा अद्याप पोलिसांकडून सादर करण्यात आला या संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अक्षतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली असा पेच सध्या तरी कायम राहिला आहे. कुटुंबाने मुंबई पोलिसांकडे ही गुत्थी लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी केली आहे. अक्षत हा मुझ्झफरपुरच्या सिंकदरापूरचा मूळ रहिवासी आहे पण तो काही काळापासून मुंबईक राहात होता.
बिग बॉस’ मराठीमधील टफ फाईट देणारी अभिनेत्री प्रेमात, सोशल मीडियावर केले जाहीर
मनोरंजनसृष्टीला ग्रहण
लॉकडाऊनमध्ये अनेक वाईट बातम्या सातत्याने समोर येत आहेत. 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतच्या आकस्मिक आत्महत्येच्या बातमीने सगळ्यांना अचंबित केले होते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषेतील अनेक कलाकारांनी काही खासगी कारणामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले. मार्च महिन्याच्या शेवटापासून सुरु झालेल्या या लॉकडाऊननंतर सगळ्याच क्षेत्राला धक्का पोहोचला आहे. शूटिंग थांबल्यामुळे आणि काम नसल्यामुळे अनेकांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यामुळेच अनेकांच्या मनात वाईट विचार येताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी पुढे येऊन या संदर्भात बोलायलाही सुरुवात केली आहे.
आता अक्षतच्या मृत्यूचे कारण त्याचे खासगी करण आहे की त्याच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा खून झाला आहे हे तपासाअंती समोर येईलच.