‘हा’ अभिनेता झालाय सोनाक्षी सिन्हाचा मेकअप आर्टिस्ट, पाहा हा प्रँक व्हिडिओ

‘हा’ अभिनेता झालाय सोनाक्षी सिन्हाचा मेकअप आर्टिस्ट, पाहा हा प्रँक व्हिडिओ

कलाकारांना शूटिंगच्या निमित्ताने अनेक दिवस एकमेकांसोबत राहवं लागतं. ज्यामुळे त्यांच्यामध्ये एक चांगलं बॉडिंग असणं गरजेचं आहे. कामातून कामातून थोडासा विरंगुळा म्हणून मग सेटवर थोडीशी मौजमस्ती सुरू असते. अभिनेता अक्षय आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा या दोघांमध्येही असंच बॉडिंग पाहायला मिळत आहे. हे दोघं मिशन मंगलमध्ये एकत्र दिसणार आहेत. मिशन मंगलच्या प्रमोशनसाठी चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या दिल्लीत आहे. अक्षय आणि सोनाक्षी ऑफस्क्रीनदेखील सतत काहीतरी मजेशीर गोष्टी करत असतात. मिशन मंगल चित्रपटाच्या प्रमोशनच्या एका सेटवर अक्षयने चक्क सोनाक्षीचा मेकअप केला. सोनाक्षीचा हा नवा  मेकअप आर्टिस्ट असलेला व्हिडिओ चाहत्यांना फारच आवडला आहे. दोघांचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा सोनाक्षीचा मेकअप अक्षय कुमार करू लागतो तेव्हा नेमकं काय घडतं हे या व्हिडिओमधूनच पहा. 

सोनालीचा मेकअप आर्टिस्ट अक्षय कुमार

या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार सोनाक्षीचा मेकअप करत आहे. सोनाक्षी देखील अगदी शांतपणे त्याच्याकडून मेकअप करून घेत आहे. मात्र मजा करत करत अक्षय तिच्या नाकावर पफ लावतो आणि मग मात्र सोनाक्षी हसून त्याला फटके देऊ लागते. असा हा मजेशीर व्हिडिओ आहे. यात अक्षयने ब्लू कलरचं टी शर्ट घातलं आहे तर सोनाक्षीने फ्लोरल प्रिंटचा ड्रेस घातला आहे. मिशन मंगलच्या प्रमोशनच्या निमित्ताने त्यांची ही मौजमजा सुरू आहे.

यापूर्वीदेखील सोनाक्षीने केला होता असा प्रँक व्हिडिओ

मिशन मंगलच्या सेटवर आधीदेखील अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होते. एकदा सर्व कलाकार एकत्र बसून पत्रकारांसोबत चर्चा करत होते. मात्र अचानक सोनाक्षीने अक्षय बोलत असताना  त्याला असा धक्का दिला की तो खुर्चीसह जमिनीवरच आदळला. याबाबत सांगताना तापसी पन्नूने सोनाक्षीने असं इतरांना घाबरवण्यासाठी केलं असंही म्हटलं होतं. ज्यामुळे या व्हिडिओची चर्चा देखील झाली होती. आम्ही मिशन मंगलच्या सेटवर शूटिंगसोबत खूप एन्जॉयदेखील केलं असंच सर्व कलाकार म्हणत आहेत. कारण अक्षय नेहमीच काही ना काही प्रँक्स करत असतो. अक्षयने अनेकदा विद्या बालनच्या साडीला चमचे बांधून ठेवले होते. तर तो कधी कधी एखाद्याचा फोनच लपवून ठेवायचा. मग त्याचा बदला घेण्यासाठी सर्वजण मिळून अक्षयसोबत असं काही तरी करायचे. शूटिंगच्या सेटवर असं केल्यामुळे सर्व कलाकारांसोबत खेळीमेळीचं वातावरण निर्माण होत असतं. शिवाय सर्व कलाकार नेहमीच शूटिंगच्या निमित्ताने घरापासून दूर असतात. अशा वेळी असं वागल्यामुळे त्यांना कुटुंबापासून दूर राहिल्याचा त्रास कमी होतो. शिवाय कलाकारांचं एकमेकांसोबत चांगलं बॉडिंग निर्माण होतं. 

Also Read: Best Makeup Artist In Mumbai

मिशन मंगल 15 ऑगस्टला होतोय प्रदर्शित

मिशन मंगल हा भारताच्या यशस्वी अंतराळ मोहिमेवर आधारित चित्रपट आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू , किर्ती कुलहारी हे कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत. हा मल्टीस्टारर चित्रपट असून येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. देशप्रेमावर आधारित हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. 

 

अधिक वाचा

#POPxoMarathiBappa : बाप्पा माझं सर्वात आवडतं दैवत आहे - विद्या बालन

सोनाक्षी सिन्हा केलं होतं बॉलीवूड सेलिब्रिटीला डेट, केला खुलासा

#HappyBirthdaySridevi: आईच्या आठवणीने भावूक झाली जान्हवी

फोटोसौजन्य - इन्साग्राम आणि शटरस्टॉक