ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
एकता कपूरच्या दोन वेबसीरिजमध्ये झळकणार हा चेहरा

एकता कपूरच्या दोन वेबसीरिजमध्ये झळकणार हा चेहरा

मनोरंजन जगतातील अनेक अभिनेता आणि अभिनेत्री आज वेबसीरिजकडे वळत आहेत. याला अगदी सुपरस्टार्सही अपवाद नाहीत. असंच काहीसं झालं आहे अजून एका नव्या चेहऱ्याबाबत. अभिनेता अर्सलान गोनी (Arslan Goni) जो मूळचा काश्मीरचा रहिवासी आहे. अर्सलानने 2017 साली रिलीज झालेल्या ‘जिया और जिया’ (Jia Aur Jia) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं होतं. या चित्रपटानंतर आता त्याला मिळाल्या आहेत एक नाहीतर दोन वेबसीरिज त्याही ऑल्ट बालाजीच्या. अर्सलानने काळाची गरज ओळखत OTT प्लॅटफॉर्मकडे मोर्चा वळवला आहे.

अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका साकारणार

‘मैं हीरो बोल रहा हूँ’ या वेबसीरिजमध्ये तो लवकरच झळकणार आहे. ही वेबसीरिज 1980 ते 1990 दशकातील काळावर आधारित आहे. या वेबसीरिजमध्ये अर्सलान एका अंडरवर्ल्ड डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्सलानसाठीही भूमिका नक्कीच आव्हानात्मक असेल यात शंका नाही.

‘हक से 2’ मध्ये अर्सलानची वर्णी

एवढंच नाहीतर तो यानंतर ऑल्ट बालाजीच्याच ‘हक से 2’ या वेबसीरिजमध्येही दिसेल. ज्याची घोषणा एकता कपूर ने खूप आधीच केली होती. या काश्मिरी बॉयला अखेर त्याच्या करियरची नवी दिशा सापडली आहे. असं म्हणायला हरकत नाही. कारण आता त्याला एक नाहीतर दोन वेबसीरिज मिळाल्या आहेत. त्यामुळे त्याच्या करिअरला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

कथेमध्ये जास्त इंटरेस्ट

‘जिया आणि जिया’मध्ये अर्सलान झळकला होता बॉलीवूडमधील दोन कसदार अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींसोबत. एक म्हणजे कल्की केकला आणि दुसरी म्हणजे रिचा चढ्ढा. त्यामुळे अर्सलानला हवा तसा वाव नव्हता. पण आता त्याला सुवर्णसंधी आहे स्वतःला प्रेक्षकांसमोर नव्याने सादर करण्याची. आपल्या या नव्या भूमिका आणि वेबसीरिजबाबत बोलताना अर्सलान गोनी म्हणाला की, ‘मला कंटेटमध्ये जास्त रस आहे. जर मला कथा आवडली तर ती मी नक्की करेन. मग तो प्लॅटफॉर्म कोणताही असो. मला ‘मैं हीरो बोल रहा हूँ’ ची कथा फारच आवडली आणि या संधीला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. ही वेबसीरिज निश्चित रूपाने प्रेक्षकांचं मनोरंजन करेल. माझ्यासाठी ही प्रेक्षकांसमोर आपला अभिनय दाखवण्याची उत्तम संधी आहे. मला नक्कीच आवडेल जेव्हा प्रेक्षक माझ्या दोन्ही वेबसीरिज पाहतील.

ADVERTISEMENT

वकीलांच्या कुटुंबातील अर्सलानचं एक्टिंग कनेक्शन

अर्सलान गोनी हा काश्मिरी असल्याचं वरचं सांगितलं होतं. पण देशभरातून अभिनयात करियर करण्यासाठी शेकडो तरूण रोजच्यारोज मुंबईत दाखल होता. खरंतर अर्सलान काश्मीरमधील उच्च पदस्थ सरकारी अधिकारी आणि वकिलांच्या कुटुंबातील आहे. पण त्याचं अभिनयाचं कनेक्शन जोडलं आहे ते त्याचा भाऊ अली गोनीशी. जो टीव्ही मालिकातील एक प्रसिद्ध नाव आहे.

असो आता अर्सलानने आपल्या नव्या इनिंग्जला जोरदार सुरूवात केली आहे आणि आशा करूया की, त्याच्या या नव्या भूमिका प्रेक्षकांनाही नक्कीच आवडतील. #POPxoMarathi कडून अर्सलान गोनीला खूप खूप शुभेच्छा.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

ADVERTISEMENT

हेही वाचा –

ग्लॅमरस आणि मसालेदार त्रिकोणाचा ‘मीडियम स्पाईसी’

‘एबी आणि सीडी’ चा याराना येतोय या दिवशी भेटीला

17 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT