ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
क्वारंटाईन सेंटरसाठी या अभिनेत्याने दिले आपले पूर्ण हॉटेल, बीएमसीच्या मदतीसाठी पुढे

क्वारंटाईन सेंटरसाठी या अभिनेत्याने दिले आपले पूर्ण हॉटेल, बीएमसीच्या मदतीसाठी पुढे

कोरोना व्हायरस संंपवण्यासाठी आणि यातून पूर्ण देशाला बाहेर काढण्यासाठी सध्या सगळेच झटत  आहेत. यामध्ये आपल्याकडून जितकी आणि जशी मदत करता येईल त्यासाठी प्रत्येक जण पुढे सरसावला आहे. बॉलीवूडमधील कितीतरी सेलिब्रिटींनी पीएम फंड, एनजीओ आणि वेजेस वर्कर्ससाठी दान दिले आहे. दरम्यान अभिनेता आणि यशस्वी उद्योपगपती अशी ओळख असणाऱ्या सचिन जोशीनेदेखील यामध्ये आपला वाटा उचलला आहे. त्याने केवळ पैसेच नाही तर बीएमसीला क्वारंटाईन सेंटर बनवण्यासाठी आपले हॉटेल दिले  आहे. आपल्याकडे क्वारंटाईन सेंटरची कमतरता असल्याने सचिन जोशीने नागरिकांच्या सोयीसाठी ही मदत करण्याचे ठरवले आहे. 

COVID – 19 च्या रुग्णांसाठी दिले आपले हॉटेल

अभिनेता आणि उद्योगपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन जोशीने बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोव्हिड – 19 च्या रूग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून आपले हॉटेल दिले आहे. या हॉटेलमध्ये 36 रूम्स असून हे हॉटेल पवईस्थित आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिनने हा निर्णय घेतल्यानंतर सांगितले की,  मुंबईमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि आपल्या शहराला वाचवण्यासाठी तितकीशी रुग्णालये आपल्याकडे नाहीत. त्याचप्रमाणे त्यामध्ये राहण्याची व्यवस्थाही नाही. जेव्हा महापालिकेने आमच्याशी संपर्क साधला तेव्हा आम्ही स्वेच्छेने ही मदत करण्यासाठी तयार झालो. तसंच सचिनने सांगितले, ‘आम्ही आमचे हॉटेल हे महानगरपालिकेच्या मदतीने क्वारंटाईन सुविधेमध्ये बदलले आहे.’ याशिवाय सचिनने लॉकडाऊनदरम्यान काम करणाऱ्या पोलीस आणि नगरातील कर्मचाऱ्यांना न्यूट्रिशियस फूड बॉक्सदेखील काही दिवसांपूर्वी वाटले होते. तसंच रस्त्यात अडकलेल्या लोकांना, अधिकाऱ्यांना आणि गरजू व्यक्तींना सचिन मदत करत आहे. 

क्वारंटाइनमध्ये या गायक आणि अभिनेत्रीचं फुलतंय प्रेम

सचिन जोशीने विजय माल्याचाही बंगला विकत घेतला होता

सचिन जोशी हा प्रसिद्ध उद्योगपती असून मोना सिंह आणि नर्गिस फाखरीसह अमावस या चित्रपटातही त्याने काम केले होते. याआधी सनी लिओनसह त्याचा पहिला चित्रपट आला होता. तर विजय माल्याचा गोव्यातील बंगला सचिन जोशीने विकत घेतला तेव्हा त्याला जास्त ओळख मिळाली होती. त्यावेळी त्याने हा बंगला 73 कोटी रूपयांना विकत घेतला होता.  विजय माल्याचा हा बंगला त्यावेळी विक्रीत काढण्यात आला होता आणि तो सचिन जोशीने खरेदी केला. सचिनची ओळख अभिनेत्यापेक्षाही उत्कृष्ट उद्योगपती म्हणून अधिक आहे. 

ADVERTISEMENT

कोरिओग्राफर फराहा खानची मुलगी अन्या लहान वयातच बनली अॅक्टिव्हिस्ट

अभिनेत्री उर्वशी शर्मासह केले लग्न

सचिन शर्माने अभिनेत्री उर्वशी शर्मासह काही वर्षांपूर्वी लग्न केले असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सध्या दोघेही आपल्या संसारात सुखात असून सचिन जोशीने चित्रपटांपेक्षा आपल्या उद्योगामध्ये जास्त लक्ष घातले असल्याचे दिसून येत आहे. सचिन जोशीने केवळ दोनच चित्रपट केले असले तरीही त्याचे बॉलीवूडमध्ये अनेक मित्रमैत्रिणी आहेत आणि त्यामुळे नेहमी त्याच्या घरी होणाऱ्या पार्टीना बॉलीवूडमधील बऱ्याच जणांची वर्दळ चालू असते. मात्र असं असलं तरीही केवळ मजा मस्तीवर पैसे न उडवता सचिन जोशीने या कोरोनाच्या काळात नागरिकांना मदत करण्याचे ठरवले असून एक कर्तव्यदक्ष व्यक्तीप्रमाणे त्याने आपले हॉटेल सध्या क्वारंटाईन सेंटर म्हणून दिले आहे. त्याशिवाय  प्रत्येक बाबीत जितकी मदत करता येईल तितकी मदत सचिन जोशीने करण्याचा निर्णयही घेतला असल्याचे कळते. 

अभिनेत्री श्वेता तिवारी झाली हेअर स्टायलिस्ट, घरातच कापले मुलाचे केस

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा 

ADVERTISEMENT
08 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT