Good News: कपिल शर्मा पुन्हा झाला बाबा, मुलाच्या जन्माची दिली बातमी

Good News: कपिल शर्मा पुन्हा झाला बाबा, मुलाच्या जन्माची दिली बातमी

कपिल शर्माने काही दिवसांपूर्वीच आपण पुन्हा बाबा होणार असल्याचे सांगितले होते. तर आज सकाळीच (1 फेब्रुवारी) कपिलने tweet करून ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. ही बातमी कळल्यानंतर चाहत्यांनी आणि कपिलच्या मित्रमैत्रिणींनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. कपिल शर्मा (Kapil Sharma) हा भारतातील कॉमेडियनपैकी सर्वात प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून गणला जातो. कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी हे दोघेही कॉमेडियन असून कपिलचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. कपिलने लग्नाच्या पहिल्याच वर्षाच्या आत गुड न्यूज देत मुलीबाबत सांगितले होते. तर आता लग्नाचे दुसरे वर्ष पूर्ण होताच मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी दिली आहे. कपिल आपली मुलगी अनायराचे फोटो नेहमी शेअर करत असतो. त्यामुळे आता नव्या बाळाचे फोटो कधी पाहायला मिळणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे. कपिलचा चाहतावर्ग खूपच मोठा आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यात काय घडत असतं याची माहिती जाणून घेण्याचीही सर्वांना उत्सुकता असते. या गुड न्यूजमुळे सर्वांनाच आनंद झाला आहे.

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे नाते करणार का घोषित, चर्चांना उधाण

गिन्नी आणि मुलगा दोघेही उत्तम

कपिलने ट्विट करत आपण पुन्हा बाबा झाला असल्याची बातमी शेअर केली आहे. कपिलने आपल्या चाहत्यांसह ही बातमी शेअर करत म्हटले, ‘आज पहाटेच आम्हाला आनंदाची बातमी मिळाली असून मुलगा झाला आहे. देवाच्या कृपेने मुलगा  आणि आई दोघेही उत्तम आहे. सर्वांचे प्रेम, शुभेच्छा आणि प्रार्थना यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. सर्वांना खूप प्रेम. शुभेच्छा...गिन्नी आणि कपिल’ सध्या ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत असून कपिल आणि गिन्नीला त्यांचे चाहते भरभरून शुभेच्छा देत आहेत.  केवळ चाहतेच नाही तर कपिलने बॉलीवूडमध्येही अनेक मित्रमैत्रिणी आहेत आणि त्यांनी कपिल आणि गिन्नीचे अभिनंदन केले असून बाळाला भरभरून आशिर्वाद दिले आहेत. 

Bigg Boss 14 - पवित्रा आणि एजाज लवकरच देणार Good News

कपिल शर्मा शो मधून घेणार आहे ब्रेक

कपिलला एक वर्षांची अनायरा नावाची मुलगी असून आता मुलगा झाला आहे.  काही दिवसांपूर्वीच कपिल शर्मा शो (The Kapil Sharma  Show) बंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र याबाबत कपिलने स्वतः खुलासा काही दिवसांपूर्वीच केला.  पुन्हा एकदा बाबा होणार असल्याने आणि कपिल शर्मा शो चा हा सीझन खूपच मोठा झाल्याने केवळ काही दिवसांसाठीच हा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा नव्या स्वरूपात हा शो घेऊन येणार असल्याचे कपिलने स्पष्ट केले आहे. कपिलचा हा शो अनेक जण पाहतात आणि हा शो खूपच प्रसिद्ध असून कधीही बंद होऊ नये असं त्याच्या चाहत्यांना वाटत असल्याचेही बरेचदा त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून  आपल्या पत्नी, मुलगी आणि मुलाला वेळ देण्याचीही गरज आहे असे कपिलने सांगितले आहे.  पण लवकरच आपण प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येऊ असेही कपिलने स्पष्ट केले आहे. मात्र हा शो पुन्हा कधी चालू होणार याची मात्र कल्पना कपिलने दिलेली नाही. कपिलचा एप्रिल महिन्यात वाढदिवस असतो. त्यामुळे एप्रिलमध्येच पुन्हा हा शो सुरू होईल असा कयासही सध्या बांधला जात आहे. प्रेक्षकांनी हा शो डोक्यावर उचलून धरला असून लवकरच पुन्हा कपिलच्या हास्यजत्रेची आतिषबाजी अनुभवायला मिळेल अशीच प्रेक्षकांना अपेक्षा आहे. 

लग्नाच्या दोन महिन्यानंतर सना खानने शेअर केली अशी पोस्ट की झाली चर्चा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक