ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अभिनेता कादर खान यांचं वयाच्या  81 व्या वर्षी निधन

अभिनेता कादर खान यांचं वयाच्या  81 व्या वर्षी निधन

अभिनेता कादर खान  (Kader Khan) यांचं वयाच्या 81 व्या वर्षी कॅनडामध्ये निधन झालं. ते बऱ्याच काळापासून आजारी होते आणि कॅनडामधील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुुरू होते. प्रोग्रेसिव्ह सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डरने ते ग्रस्त होते. ज्यामुळे त्यांचा मेंदू निकामी झाला होता.

अभिनेता कादर खान यांची कारकीर्द  

कादर खान (Kader Khan) यांचा जन्म अफगाणिस्तानातील काबूल येथे झाला होता. ते एक हास्य अभिनेता तर होतेच त्यासोबतच ते फिल्म निर्देशकही होते. त्यांनी तब्बल 300 हून अधिक चित्रपटात काम केलं होतं. कोणतीही भूमिका असो त्यांनी प्रत्येक भूमिकेमध्ये प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आणि वेळप्रसंगी रडवलंही होतं. कादर खान (Kader Khan) यांनी 1973 साली चित्रपट ‘दाग’ मधून पदार्पण केलं. कादर खान (Kader Khan) यांनी तब्बल 250 हून जास्त चित्रपटांसाठी संवादलेखनही केलं होतं. त्यांनी भूमिका केलेला शेवटचा चित्रपट ‘दिमाग का दही’ हा होता. कादर खान आणि गोविंदा यांच्या विनोदी जोडीने अनेक चित्रपट गाजवले.  

आधी अफवा पण नंतर खरी ठरली मृत्यूची बातमी

ADVERTISEMENT

सोमवार (31 डिसेंबर)पासूनच त्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येत होत्या पण त्यांचा मुलगा सरफराज खान यांने मात्र त्या अफवा असल्याचं सांगत नकार दिला होता. पण 1 जानेवारीला ही दुःखद बातमी खरी ठरली.

बिग बींनी केलं भावनिक ट्वीट

कादर खान (Kader Khan) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी  ‘दो और दो पांच’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘सुहाग’, ‘कुली’ आणि ‘शहेनशाह’ यासारख्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. कादर खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना बिग बींनी भावनिक ट्वीट करून आपल्या भावन व्यक्त केल्या.

बॉलीवूडने व्यक्त केला शोक  

ADVERTISEMENT

कादर खान यांच्या निधनाची बातमी येताच अनेक बॉलीवूड स्टार्सने शोक व्यक्त केला. 

आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे कादर खान यांनी आज मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय.

01 Jan 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT