अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरचं लग्न तुटण्याच्या मार्गावर

अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरचं लग्न तुटण्याच्या मार्गावर

बॉलीवूड सेलिब्रिटीजची लग्न जेवढी धूमधडाक्यात होतात तितक्याच वेगाने ती तुटतातही. काही अपवाद वगळता ही सत्य परिस्थिती आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेता व राजकारणी राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरचं लग्न अवघ्या एक वर्षानंतर तुटण्याच्या मार्गावर आहे. काय आहे नेमकं कारण वाचा.

सोशल मीडियावर एकमेकांना केलं अनफॉलो

खरंतर एखाद्या कपलमध्ये आलबेल नसल्याची पहिली कुणकुण लागते ती त्यांच्या सोशल मीडिया अपडेट्सवरून. या कपलबाबतही तसंच झालं. जेव्हा सान्या आणि प्रतीकने एकमेंकाना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. त्यामुळे दोघांमध्ये पटत नसल्याचा पहिला पुरावा तिथेच मिळाला. एवढंच नाहीतर प्रतीकने सान्यासोबतचे सर्व फोटोज आपल्या प्रोफाईलवरून डिलीट केले आहेत. पण सान्याच्या प्रोफाईलवर मात्र प्रतीकसोबतचे फोटो आहेत. प्रतीकने कपल फोटो डिलीट करण्याआधी त्याच्या प्रोफाईलवर फक्त या दोघांचे फोटो दिसायचे. प्रतीक बब्बर आणि सान्या सागर लग्न ठरण्याआधी 8 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. पण त्यांनी डेटींग मात्र 2017 सुरू केलं. 2018 मध्ये प्रतीकने सान्याला प्रपोज करून लग्नाची मागणी घातली होती.

पण आता बातमी येत आहे की, या दोघांचं पटत नसून ते गेल्या काही आठवड्यांपासून वेगळे राहत आहेत. सूत्रानुसार, प्रतीकच्या जवळच्यांकडून मिळालेल्या बातमीनुसार या कपलमध्ये आलबेल नाहीयं. त्यामुळे प्रतीक आणि सान्या एकसोबत राहत नाहीयेत. तसंच याबाबत काही दिवसांपूर्वी स्पॉटबॉयने प्रतीकला कॉल करून याबाबत विचारलं असतं त्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

फॅमिली सेलिब्रेशनमध्येही सान्या होती गायब

बब्बर कुटुंबियांच्या होळी सेलिब्रेशन आणि राज बब्बर यांच्या अॅनिव्हर्सरी पार्टीमध्ये सान्या आणि प्रतीक दिसले नव्हते. या दोघांचं फॅमिली सेलिब्रेशनपासून दूर राहणं तेव्हाच बऱ्याच जणांना रूचलं नव्हतं. दुसरीकडे सान्याने आपल्या नाटकासाठी प्रतीकला बोलावलं नव्हतं. सान्याचं हे नाटक रॉयल ओपेरा हाऊसमध्ये मार्च महिन्यात होतं. ज्युलियस-सीझर या नाटकात सान्या पोर्टिया ही भूमिका साकारत होती.

धूमधडाक्यात झालं होतं लग्न

23 जानेवारी 2019 ला प्रतीक बब्बरचं लग्न सान्या सागरसोबत अगदी पारंपारिक पद्धतीने आणि धूमधडाक्यात झालं होतं. त्यांच्या हाय प्रोफाईल लग्नाला अनेक सेलिब्रिटीज आणि राजकारणी यांची उपस्थिती होती, पाहा फोटोज. सान्याच्या लखनऊमधल्या फार्महाऊसवर डेस्टिनेशन वेडिंग झाल्यामुळे या कपलने मुंबईत वेगळं जंगी रिसेप्शनही दिलं होतं. ज्याचे फोटोजही व्हायरल झाले होते.

आधीही जोडलं गेलं होतं नाव

प्रतीकचं सान्यासोबत लव्ह मॅरेज होतं. पण त्याआधी प्रतीकचं नाव अभिनेत्री एमी जॅक्सनसोबत जोडलं गेलं होतं. हे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यांनी एकत्र सिनेमा केला होता. तसचं एकमेकांच्या नावांचं टॅटूही काढलं होतं. पण एमी आणि प्रतीकचं नातं काही जास्त दिवस टिकलं नाही आणि त्यांचा ब्रेकअप झाला.

View this post on Instagram

@_prat ♥️

A post shared by Sanya Sagar (@pynkmoss) on

पण POPxoMarathi आणि प्रतीकचे फॅन्सना ही आशा आहे की, या कपलमधील दुरावा लवकरच दूर होईल आणि ते पुन्हा एकत्र येतील.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.