2018 हे वर्ष गाजलं ते बॉलीवूडमध्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक लग्नामुळे. 2019 या नवीन वर्षातल्या पहिल्या बॉलीवूड लग्नाची तारीखही जाहीर झाली आहे. हे शुभमंगल आहे, मराठीतील अजरामर अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याचं.
कोण आहे सान्या सागर
View this post on Instagram
सान्या ही व्यवसायाने लेखक आणि दिग्दर्शक आहे. सान्याने नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून फॅशन कम्युनिकेशनमध्ये गॅज्युएशन केलं आहे. त्यानंतर लंडनच्या फिल्म अकादमीमधून तिने फिल्म मेकिंगमध्ये डिप्लोमा केला. प्रतीकच्या बाबांप्रमाणेच सान्याचे वडील पवन सागर हेही राजकारणात सक्रीय आहेत. फक्त फरक एवढाच आहे की, राज बब्बर हे काँग्रेस नेते आहेत तर पवन सागर बहुजन समाज पार्टीचे नेते आहेत.
2018 मध्ये झाला साखरपुडा
प्रतीक आणि सान्या एकमेकांना गेल्या दहा वर्षापासून ओळखत असून मागच्या 2 वर्षांपासून दोघंही डेटींग करत होते.
View this post on Instagram#gymdate thats gone well so far!! #birthdayboy🎉 @ryan101982 thanks for the picture ❤️
मागच्याच वर्षी त्यांचा साखरपुडा झाला होता. सिनेमावरील प्रेम या समान आवडीमुळे त्यांचं प्रेम जुळलं.
शुभमंगल होणार लखनऊमध्ये
22 व 23 जानेवारीला लखनऊतील सान्याच्या फार्म हाऊसवर त्यांचं शुभमंगल होणार आहे. तसंच लग्नानंतर मुंबईतही एक रिसेप्शन देण्यात येणार आहे. अनुष्का-विराट, दीपिका-रणवीर, प्रियांका चोप्रा-निक जोनासच्या सेलिब्रिटी लग्नानंतर या वर्षातलं हे पहिलं सेलिब्रिटी लग्न असून लखनऊमधल्या दोन दिवस चालणाऱ्या या लग्न समारंभाला अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेते येण्याची शक्यता आहे.
प्रतीक आणि बॉलीवूड
प्रतीकने आपल्या आईबाबांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2008 साली आमिर खान निर्मिक जाने तू या जाने ना या सिनेमातून त्याने डेब्यू केलं होतं. या चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी त्याचं कौतुकही झालं होतं परंतु त्यानंतर मात्र त्याचं बॉलीवूड करिअरमध्ये अनेक उतार-चढाव आले. या वर्षी त्याचे यारम, छिछोरे आणि अभी तो पार्टी शुरू हुई हेै चित्रपट रिलीज होणार आहेत.