प्रथमेश परबचा नवीन लुक आणि सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

प्रथमेश परबचा नवीन लुक आणि सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

टकाटक हा विनोदी सिनेमा आणि दहा बाय दहा नाटकाच्या यशानंतर अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) लवकरच झळकणार आहे नव्या विनोदी चित्रपटात. प्रथमेशने नुकतंच आपल्या आगामी चित्रपटाचे टायटल पोस्टर सोशल मीडियावर रिव्हील केलं आहे. झेब्रा एंटरटेन्मेंटच्या ‘टल्ली’ या 2020 सालामध्ये रिलीज होणा-या सिनेमात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या नावामुळे सध्या या सिनेमा विषयीची उत्सुकता वाढली आहे.

प्रथमेशचा नवा लुक दिसणार टल्लीमध्ये 

टल्ली (Talli) या विनोदी चित्रपटातील भूमिकेविषयी विचारलं असता अभिनेता प्रथमेश परब म्हणाला की, “माझ्या आजवरच्या विनोदी भूमिकांना आणि चित्रपटांना महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. टल्ली सिनेमा जरी विनोदी असला, तरीही या सिनेमात विनोदाला समाजप्रबोधनाची झालर आहे. या सिनेमात पहिल्यांदाच माझी ओळख करून देताना नावाअगोदर ‘in & as’ प्रथमेश परब असे दिसेल. कोणत्याही अभिनेत्याच्या कारकिर्दीत अशी ओळख होणे, ही मानाची गोष्ट असते. या सिनेमात माझा लुकही वेगळा असणार आहे.सिनेमासाठी माझं फिजीकल ट्रेनिंगही लवकरच सुरू होईल.”

लघुपटाच्या यशानंतर टल्लीची निर्मिती

या चित्रपटाचे निर्माते संजय गोळपकर यांना चित्रपटाविषयी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “आमच्या निर्मिती संस्थेची टल्ली ही पहिली फिल्म आहे आणि नावाप्रमाणेच हा सिनेमा धमाल विनोदी चित्रपट असणार आहे. या चित्रपटात प्रथमेश परबचं नाव 'टल्ली' आहे. आता ज्याचे नावच 'टल्ली' असेल, अशा हिरोवर जेव्हा सिनेमा बनेल, तर तो किती विनोदी असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.”

उतरंड या निर्माते संजय गोळपकर यांच्या लघुपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाल्यावर कौटुंबिक कमर्शिअल सिनेमाची निर्मिती करायचं त्यांनी ठरवलं. प्रथमेश परब हा एक उत्तम अभिनेता आहे. त्याला विनोदाची चांगली जाण आहे. त्यामुळे या सिनेमातली मुख्य भूमिका तोच उत्तम प्रकारे वठवू शकेल, असा त्यांना विश्वास आहे.”

नव्या दिग्दर्शकांची जोडी

टल्लीमधून संगीत दिग्दर्शक गणेश-सुरेश दिग्दर्शनात पहिलं पाऊल ठेवत आहेत. याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “जरी सिनेमाचं नाव टल्ली असलं तरीही, संपूर्ण कुटूंबाला एकत्र बसून पाहता येईल, असा हा निखळ मनोरंजक सिनेमा असेल. सध्या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरू आहे. लवकरच चित्रपटाचे शुटिंगही सुरू होईल आणि पुढच्या वर्षी अभिनेता प्रथमेश परबसोबत मनोरंजनाची ही पर्वणी आम्ही घेऊन येऊ.”

झेब्रा एंटरटेन्मेंट निर्मित गणेश-सुरेश दिग्दर्शित टल्ली (Marathi Cinema) सिनेमात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून सिनेमाच्या इतर कलाकारांविषयीची लवकरच घोषणा होईल. हा विनोदी चित्रपट 2020 मध्ये रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.