परफेक्शनचा हट्ट अभिनेता प्रथमेश परब पडला महाग

परफेक्शनचा हट्ट अभिनेता प्रथमेश परब पडला महाग

अभिनेता प्रथमेश परब त्याची प्रत्येक भूमिका खूप समरसून वठवतो. मग तो ‘बालक पालक’चा विशु किंवा ‘टाईमपास’मधल्या दगडुसारख्या त्याच्या भूमिका चाहत्यांच्या आजही लक्षात राहिल्यात. प्रथमेश परब आता आपली नवीन फिल्म ‘टकाटक’ घेऊन येत आहे. ‘टकाटक’च्या चित्रीकरणावेळीही आपल्या गण्या या भूमिकेत प्रथमेश इतका एकरूप झाला की, एका सीनवेळी त्याला हे चांगलेच महागात पडले.

उसाच्या रसाने केला घात

View this post on Instagram

#Takatak Day 😎

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab) on

सूत्रांनुसार, ‘टकाटक’च्या चित्रीकरणावेळी एका सीनमध्ये प्रथमेशला उसाचा रस प्यायचा होता. प्रथमेशने चित्रीकरणावेळी एका घोटात रस प्यायला खरा. पण नंतर काही कारणामुळे रिटेकवर रिटेक होऊ लागले. त्यावेळी सीन चांगला व्हावा म्हणून प्रथमेश दरवेळी एका घोटात पूर्ण उसाच्या रसाचा ग्लास संपवत होता. असं करता-करता प्रथमेशने लागोपाठ 8 ते 9 ग्लास उसाचा रस प्यायला. ज्यामुळे थोड्या वेळातच त्याला उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि तो आजारी पडला.

नेमकं काय झालं?

हे खरं असल्याचं सांगत प्रथमेश म्हणाला की, “हो, आम्ही खूप उन्हात चित्रीकरण करत होतो. दुपारचं जेवण झाल्यावर आम्ही त्या सीनच्या चित्रीकरणाला सुरूवात केली. आधीच माझं पोट भरलं होतं. त्यात लागोपाठ 8 ते 10 ग्लास रस पोटात गेल्यावर मग मात्र मला मळमळायला सुरूवात झाली. चित्रीकरण सुरू होतं. म्हणून सुरूवातीला मी काही बोललो नाही. पण नंतर मात्र माझ्या उलट्या सुरू झाल्या आणि मी आजारी पडलो.”

इम्प्रोव्हायजेशन पडलं महागात

या सीनमध्ये काही बदल प्रथमेशनेच सुचवले होते. पण त्याचा परिणाम असा होईल हे त्याला माहीत नव्हतं. याबाबत प्रथमेश म्हणाला की, “जेव्हा त्या ठरावीक सीनविषयी चर्चा झाली. तेव्हा मला तो सीन करताना एका घोटात उसाचा रस संपवायचाय, असं इम्प्रोवायझेशन मीच करायचं ठरवलं होतं. जेव्हा मला ही कल्पना सुचली तेव्हा हे लक्षात आलं नाही की, समजा रिटेक झाले तर त्याचे काही साईड इफेक्ट्सही होऊ शकतात. मी सीनमध्ये एवढा इन्व्हॉल्व्ह झालो होती की, किती रिटेक होत होते आणि मी किती ग्लास रस प्यायलो याकडे माझं लक्षच नव्हतं. आता तो सीन बघताना खूप छान वाटतं. पण तेव्हा मात्र परफेक्शनच्या नादात चांगलाच आजारी पडलो होतो.

परफेक्शन तर सगळ्यांनाच आवडतं पण ते करताना स्वतःकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. टेक केअर आणि बी टकाटक प्रथमेश.

हेही वाचा -

असे मराठी चित्रपट जे तुम्ही हमखास पाहायलाच हवे

2018 मधले दर्जेदार मराठी चित्रपट 

मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘10’ हॉट (Hot) आणि बोल्ड अभिनेत्री