आगामी '83' मध्ये रणवीर सिंगचा नवा रेकॉर्ड

आगामी '83' मध्ये रणवीर सिंगचा नवा रेकॉर्ड

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने लग्नानंतर चित्रपटांमध्ये शानदार एंट्री केली आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

माइंड ICH ब्लोइंग !!! 🦁💥💥💥 #SIMMBA


A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on
रणवीरचा सिम्बा बॉक्स ऑफिसवर अजूनही धमाकेदार कलेक्शन करतोय.

तर रणवीरच्या आगामी गली बॉय बाबत सगळेच उत्सुक असून या चित्रपटाच्या गाण्यांची सध्या क्रेझ आहे. या दोन चित्रपटांशिवाय रणवीरची चर्चा सुरू आहे ती '83' या चित्रपटांमुळे.


‘83’ मध्ये रणवीर करणार शानदार खेळी
 

 

 


View this post on Instagram


 

 

Happy Birthday, Legend! 🙌🏽 #KapilDev @83thefilm @kabirkhankk


A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on
आगामी '83' या चित्रपटात रणवीर भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात भारतीय क्रिकेट टीमने 1983 साली उत्तम कामगिरी करत क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता, त्याची कथा आहे. रणवीरने काही आठवड्यांआधीच या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात केली आहे. तसंच शूटींग दरम्यानचे फोटोज ही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चित्रपटातील आपला लूक पर्फेक्शनसाठी रणवीर कपिल देवकडून ट्रेनिंगही घेत आहे.


भारत आणि क्रिकेट
 

 

 


View this post on Instagram


 

 

And the glorious journey begins........ #83 🏏 #kapildev @83thefilm #balwindersinghsandhu @kabirkhankk


A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on
भारतात क्रिकेट हा खेळ नसून धर्म मानला जातो. 1983 साली भारतीय क्रिकेट टीमने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला आणि इतिहास रचला. या काळातील आठवणी लोकांच्या मनात पुन्हा जागवण्याचा चित्रपटाचा मानस आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान करणार आहे.

कपिल देव यांच्या भूमिकेसाठी रणवीरची तर बलविंदर सिंग संधूच्या भूमिकेसाठी अॅमी विर्कची निवड करण्यात आली असली तरी अजून इतर कलाकारांची नाव जाहीर करण्यात आलेली नाहीत.


‘गली बॉय’ रणवीरच्या ‘मेरे गली मैं’ गाण्याचं ओरिजनल व्हर्जन तुम्हाला माहीत आहे का?


रणवीरचा नवा रेकॉर्ड
 

 

 


View this post on Instagram


 

 

Jaadoo ki Jhappi! 🤗 Joy to meet the Honourable Prime Minister of our great nation 🇮🇳 @narendramodi


A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on
हा रणवीरच्या करियरमधला हा पहिला चित्रपट आहे जो एकाचवेळी 3 भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. क्रिकेटवर आधारित असल्याने हा चित्रपट हिंदीशिवाय इतर भाषांमध्येही रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट तब्बल 3 भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. हिंदीशिवाय हा चित्रपट तामिळ आणि तेलूगूमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.


‘सिम्बा’च्या ‘आँख मारे’ गाण्यातून ‘गोलमाल 5’ हिंट