अभिनेता संतोष जुवेकर सध्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टच्या तयारीत व्यस्त आहे. एप्रिल महिन्यात संतोष जुवेकर एका जर्मन फिल्मसाठी काम करणार आहे. या फिल्मच्या वर्कशॉप्समध्ये सध्या तो व्यस्त असून हा संतोषचा पहिला इंटरनॅशनल प्रोजेक्ट असणार आहे.
View this post on Instagram
सूत्रांनुसार, या जर्मन फिल्मचं नाव ‘डिसोनन्स’ असे असून हा एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे. यामध्ये संतोष जुवेकर ‘पीटर’ या आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी संतोष गेल्या काही महिन्यापासून आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेत आहे. योग्य आहार आणि जिम ट्रेनिंगव्दारे त्याने आर्मी ऑफिसरसारखा फिटनेस मेन्टेन केला. त्याचप्रमाणे त्यांच्या फिजीकल अपिअरन्स आणि वागण्या-बोलण्याच्या पध्दतींचाही बारकाईने अभ्यास केला. सध्या एका जर्मन शिक्षकाकडून तो जर्मन भाषेचे धडे घेत आहे.
View this post on Instagram
या भूमिकेबाबत संतोष जुवेकरला विचारलं असता तो म्हणाला की, “आर्मीत जवानांना शारीरिक शिक्षणासोबतच मानसिक शिक्षणही दिलं जाते. त्यांच्या मेन्टल फिटनेसची परीक्षा घेताना त्यांच्यासोबत अनेक माइंड गेमही खेळले जातात. त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मेन्टली थर्ड डिग्री ट्रेनिंग देण्यात येते. यावरच हा सिनेमा आधारित आहे. पीटर या जर्मन आर्मी अधिका-याच्या भूमिकेत मी साजेसा वाटावा, यासाठी मी पूर्ण तयारी केली आहे.”
View this post on Instagram
संतोष पुढे म्हणाला की, “फिल्ममेकर्सना हा सिनेमा येत्या काही दिवसांमध्येच सुरू होणा-या एका जर्मन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवायचा आहे. सिनेमाचा विषय खूप वेगळा आहे. अशा विषयावरचा एखादा आंतराष्ट्रीय प्रोजेक्ट करायला मिळणं, ही प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते. म्हणूनच या सिनेमाला योग्य न्याय देण्यासाठी मी भूमिकेवर कसून मेहनत करतोय. यातला सर्वात कठीण भाग आहे, तो म्हणजे भाषा. जर्मन भाषा आणि त्याचे उच्चार अस्खलित व्हावे, यासाठी मी सध्या ट्यूटरकडून ट्रेनिंग घेत आहे.”