'तू सौभाग्यवती हो' मालिकेतून पदार्पण करणारी अभिनेत्री आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण

'तू सौभाग्यवती हो' मालिकेतून पदार्पण करणारी अभिनेत्री आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण

सोनी मराठी वाहिनी नेहमीच नव्या धाटणीच्या मालिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसून येते. अशीच एक नवी मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेमध्ये एक नवीन, बोलक्या डोळ्यांचा आणि ताजा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि तो आहे दीक्षा केतकर या अभिनेत्रीचा. दीक्षाची ही पहिलीच मालिका आहे. दीक्षाबरोबरच या मालिकेमध्ये हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकारही आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का दीक्षा नक्की कोण आहे? दीक्षा ही प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरची लहान बहीण आहे. शशांकने आतापर्यंत अनेक मालिकांमधून काम करत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे आणि आता त्याची लहान बहीणही मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकायला येत आहे.

सुयश टिळकला नेमकं झालंय तरी काय...पोस्टमुळे चाहते बुचकळ्यात

दीक्षाची ही पहिलीच मालिका

दीक्षाच्या या मालिकेचा प्रोमो प्रसारित झाला असून दीक्षाची ही पहिलीच मालिका आहे. या प्रोमोमध्ये दीक्षा खूप निरागस आणि हसरी दिसते आहे. या नव्या चेहऱ्याला पाहण्यासाठी  प्रेक्षक  उत्सुक आहेत. वयानी खूप मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबरोबर ऐश्वर्या का लग्न करते आणि जाधव घराण्याची सून कशी  होते, हे  पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे. ‘तू सौभाग्यवती हो’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या मालिकेत ऐश्वर्या ही भूमिका दीक्षा साकारत असून थोडा वेगळा विषय पाहायला मिळणार आहे.  दरम्यान बऱ्याच वर्षांनी ज्योती चांदेकर यांनाही मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दीक्षाने याआधी सेफ जेरनी, धूसर यामधून काम केले आहे.  मात्र बऱ्याच मराठी कलाकारांना खरी ओळख मिळते ती मालिकांमधून. पहिल्याच मालिकेत इतके तगडे कलाकार असल्यानंतर नक्कीच ही मालिका दीक्षासाठी खास ठरणार आहे. दीक्षाचा आत्मविश्वास या प्रोमोमधूनही दिसून येत आहे. 

शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांची गाणी आणि पोवाडा Shivaji Maharaj Marathi Songs & Powada

शशांकचीही येत आहे नवी मालिका

दरम्यान शशांक केतकरचीही ‘पाहिले न मी तुला’ ही नवी मराठी मालिका येत आहे. त्यामुळे दोन्ही भावंडं एकाच वेळी लहान पडदा गाजवणार असल्याचं दिसून येत आहे. दीक्षाने याआधी जास्त काम केले नसले तरीही तिच्या या प्रोमोवरून ती नवखी असल्याचे अजिबात जाणवत नाहीये. शिवाय प्रेक्षकांना एक नवा चेहराही पाहायला मिळेल. त्यामुळेच दीक्षा आता प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची जादू कशी चालवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शशांक केतकर हे मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध आणि गाजलेले नाव आहे. त्यामुळे दीक्षालाही प्रेक्षकांचे असेच भरभरून प्रेम मिळणार का ते पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे. दीक्षा केतकरला नव्या मालिकेसाठी ‘POPxo’ मराठीकडून भरभरून शुभेच्छा!

मराठी चित्रपटातून जया बच्चन करणार कमबॅक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक