Viral : अभिनेता शशांक केतकरने घेतली पिशवीवाले आजोबांची भेट

Viral : अभिनेता शशांक केतकरने घेतली पिशवीवाले आजोबांची भेट

आजचं युग हे सोशल मीडियाचं आहे. जिथे रोज कोणता ना कोणता फोटो नाहीतर व्हिडिओ हा व्हायरल होत असतो. एकदा का व्हिडिओ व्हायरल झाला की, मग त्याची शहानिशा न करता तो शेअर केला जातो. काही वेळा तो खरा असतो तर काही वेळा त्यातली संपूर्ण माहिती खरी असतेच असं नाही. अशीच मागच्या आठवड्यात व्हायरल झालेली पोस्ट म्हणजे डोंबिवलीच्या पिशवीवाल्या जोशी आजोबांची. ही पोस्ट अभिनेता शशांक केतकरनेही ना फक्त शेअर केली तर चक्क डोंबिवलीत जाऊन आजोबांची भेटही घेतली.

शशांकने घेतली पिशवीवाल्या आजोबांची भेट

अभिनेता शशांक केतकर हा नेहमीच सोशल मीडियावर एक्टीव्ह असतो आणि त्यावर बरेचदा व्यक्तही होतो. यावेळीही त्याने डोंबिवलीच्या आजोबांबाबतची पोस्ट शेअर करताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया केल्या. काहींनी आजोबांना मदत करायचीही इच्छा व्यक्त केली. पण फक्त पोस्ट शेअर करण्यावरच न थांबता शशांक स्वतः जाऊन आजोबांना भेटला आणि त्याची दिलखुलास मुलाखत घेतली. खरंच आजोबांची परिस्थिती कशी आहे, त्यांना नेमकी कशी मदत करता येईल हे त्याने जाणून घेतलं. पाहा शशांकने घेतलेली ही मुलाखत.

ही मुलाखत खरंच दिलखुलास होती. शशांकच्या भेटीने जोशी आजोबा आणि आजी खूपच खूष झाले. जोशी आजोबांचं वय 87 आहे तर आजीचं वय 80 आहे. आजोबा पिशव्या विकतात तर आजीही कॅटरिंग व्यवसाय करतात.

काय होती पिशवीवाल्या आजोबांची पोस्ट

आजोबांची शेअर झालेली पोस्ट अशी होती. ज्यामध्ये आजोबांना मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि किमान एक कापडी पिशवी त्यांच्याकडून विकत घ्या असं सांगण्यात आलं होतं. पण जोशी आजोबांची आर्थिक स्थिती चांगली असून ते छंद म्हणून हा पिशव्यांचा व्यवसाय करतात. तसंच ते टेलर आहेत. त्यांची दोन्ही मुलंही त्यांची काळजी घेतात. त्यामुळे काहीजणांनी सोशल मीडियावर त्यांच्या मुलांवर केलेली टीका ही चुकीची होती. या पोस्टमुळे जोशी आजोबांच्या घरच्यांना थोडा मनस्तापही झाला. एक मात्र खरं आहे की, आजोबांची पोस्ट व्हायरल झाल्याने त्यांच्याकडच्या पिशव्या तर संपल्याच पण त्यांना आता थेट दिल्लीपासून ऑर्डर येत आहेत. कोणी आजोबांसोबत फोटो काढत आहे तर कोणी त्यांना मदत करण्यास तयार आहे.

मग तुम्हीही पुढच्या वेळी एखादी पोस्ट व्हायरल झाली तर त्याची आधी शहानिशा करा आणि मगच ती पुढे फॉवर्ड करा. कारण प्रत्येक वेळा ती पोस्ट किंवा त्यातील माहितीही खरी असेलच असं नाही. त्यामुळे योग्य व्यक्तींना आणि योग्य माहितीलाच व्हायरल करा. जसं डोंबिवलीचे आजोबा व्हायरल झाल्याने त्यांना भरपूर मदत मिळाली आणि प्रेम मिळालं तसंच प्रत्येकवेळी होऊ दे.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.