अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा दिग्दर्शनात

अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा दिग्दर्शनात

चित्रपट, नाटक, मालिका, संगीत यांची आवड ज्यांना मनापासून असते. या माध्यमांच्या मदतीने आपण प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करायला हवे किंवा करु शकतो अशी भावना ज्यांच्या मनात असते त्या व्यक्ती मनोरंजनसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख बनवण्यासाठी विशेष मेहनत घेत असतात. मग ती व्यक्ती कलाकार असो गायक असो वा दिग्दर्शक असो. 

कॉमेडी भूमिकांमध्ये चांगलं काम केल्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदेने दिग्दर्शन आणि निर्मितीत हात अजमावला आहे. त्यानंतर श्रेयस आता पुन्हा हिंदी चित्रपटात अभिनयाऐवजी दिग्दर्शनात उतरतो आहे. सनी देओल आणि बॉबी देओलसोबत पोस्टर बॉईज हा हिंदी सिनेमा केल्यानंतर आता श्रेयस दुसऱ्यांदा दिग्दर्शनात करणार आहे. आता तो घेऊन येत आहे सरकार की सेवा हा हिंदी चित्रपट. त्याच्या या घोषणेमुळे श्रेयसच्या फॅन्समध्ये उत्सुकता आहे. 

अभिनेता श्रेयस तळपदेचा हा हिंदी चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून यातून सामाजिक संदेशही देण्यात येणार आहे. पण तरीही हा चित्रपट गंभीर नसून कॉमेडी असणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरचा फर्स्ट लुकही नुकताच समोर आला आहे. श्रेयस तळपदे सरकार की सेवा में या चित्रपटाचं पोस्टर पूर्ण पिवळ्या रंगाचं आहे. पोस्टरमध्ये एक कॅब दिसत आहे. या कॅबला टेकून श्रेयस तळपदे बसलेला दिसत आहे. चित्रपटाच्या नावावरून ही कथा गाडीशी निगडीत असल्याचा अंदाज लावला जात आहे. 

View this post on Instagram

♠ @filmfare 📸 - @kalsekarmrunal

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27) on

चित्रपटसृष्टीतल्या नव्या ट्रेंडप्रमाणे या चित्रपटाचं शूटींगही एका छोट्या शहरात केलं जाणार आहे. या चित्रपटाचा सेट यूपीच्या छोटे शहर लावण्यात येणार आहे. कारण श्रेयसला वाटतं की, भारताच्या छोट्या शहरात शूट करणं जिकीरचं असलं तरी, या चित्रपटाच्या कथेला तेच सूटेबल आहे. सूत्रानुसार, या चित्रपटाबाबत श्रेयस फारच उत्सुक आहे. आपल्या सामान्य जीवनात आपल्याला जो त्रास होतो तो या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. ज्याचं दिग्दर्शन श्रेयस पहिल्याच शेड्यूलमध्ये संपवणार आहे. 

या चित्रपटाची स्टारकास्टसुद्धा ठरली आहे. या चित्रपटात सुधीर पांडे, श्रद्धा जयस्वाल, मुन्नाभाई फेम अनिल चरणजीत, बिजेंद्र काला यांसारख्या अनुभवी आणि युवा कलाकारांचा समावेश आहे.या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये नवीन जोडीसुद्धा डेब्यू करत आहे. ही नवी जोडी आहे चेतन पांडे आणि निखील मेहता यांचा लीड रोल आहे.

हरिहरन अय्यर यांची ‘साईश वेंच्युअर सोल्युशन्स प्रा. लि.’ आणि राज भट्टाचार्य यांची ‘ओम साई राज फिल्म्स’ प्रॉडक्शन कंपनी या दोन नवीन प्रॉडक्शन कंपन्या नुकत्याच लाँच करण्यात आल्या आहेत. या लाँचनंतर हरिहरन अय्यर आणि राज भट्टाचार्य यांनी त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची घोषणा केली. ज्यामध्ये श्रेयसच्या चित्रपटाचा समावेश आहे. या प्रॉडक्शन कंपनीच्या लाँचिंग सोहळ्यात निर्माते हरिहरन अय्यर, राज भट्टाचार्य, दिग्दर्शक श्रेयस तळपदे, चित्रपटातील कलाकार सुधीर पांडे, ब्रिजेंद्र काला, श्रध्दा जैसवाल, अनिल चरणजीत, चेतना पांडे उपस्थित होते.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.