कोरोना झालेल्या हॉलीवूड अभिनेत्याने केलं आभार प्रदर्शन

कोरोना झालेल्या हॉलीवूड अभिनेत्याने केलं आभार प्रदर्शन

हॉलीवूड सुपरस्टार टॉम हँक्सला कोरोना झाल्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर होताच जगभरातील त्यांच्या फॅन्समध्ये चिंतेचं वातावरण होतं. पण टॉम वेळोवेळी आपल्या फॅन्सना आणि शुभचिंतकांना अपडेट्स देत आहेत. काही दिवसांपूर्वीचं आपल्याला आणि बायकोला कोरोना संसर्ग झाल्यानंतरचा पहिला फोटो त्यांनी शेअर केला होता. या फोटोमध्ये टॉम थोडे गंभीर दिसत होते तर त्यांची बायको रीटा हसताना दिसत होती. आता त्यांनी ब्रेकफास्ट असलेली पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता टॉम हँक्सने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांचा नाश्ता, कांगारू आणि क्यूट कुआला दिसत आहे. त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, मदतनीसांचे खूप खूप आभार. सर्वांनी एकमेकांची काळजी घेण्याची गरज आहे.

टॉमच्या त्या पोस्टने चिंतित झाले होते फॅन्स

या आधी टॉमने जेव्हा आपल्या कोरोना संसर्गाबाबत सांगितलं होतं की, आम्हाला कोविड-19 चा संसर्ग झाला आहे आणि आम्हाला एका स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलं आहे. ज्यामुळे हा संसर्ग अजून कोणाला होऊ नये. अशीही लोक आहेत ज्यांना गंभीर समस्या होऊ शकतात. त्यामुळे आम्ही एकेक करून लढा देत आहोत. तज्ज्ञांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्यास आपण या रोगाला मात देऊ शकतो.

टॉम हँक्स आणि त्यांची बायको हे एल्विस प्रेस्लीवरील चित्रपटाच्या शूटींगसाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. पण तेथे त्यांना सर्दी, थकवा आणि अंगारवर चट्टे उठण्याचा त्रास झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर या दोघांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. या दोघांच्या कोरोना टेस्टचे परिणाम सकारात्मक आले होते. तेव्हा 63 वर्षीय टॉम यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलियामध्ये शूटींगदरम्यान त्यांना या व्हायरसचा संसर्ग झाला आणि त्यांना खूप थंडी वाजून त्रास होऊ लागला.

टॉम हँक्सच्या चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये आमिर

ऑस्कर विजेता हॉलीवूड अभिनेता टॉमने फॉरेस्ट गंप, कास्ट अवे. कॅप्टन फिलीप आणि द पोस्ट सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. या अभिनेत्याच्या एका चित्रपटाच्या बॉलीवूड रीमेकमध्ये परफेक्शनिस्ट आमिर खान दिसणार आहे. आमिरचा आगामी लाल सिंग चढ्ढा हा फॉरेस्ट गंपचा ऑफिशियल रीमेक आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा थ्री इडियट्समध्ये झळकलेली करीना कपूर आणि आमिर खानची जोडी दिसणार आहे.

आमिर खानचा नुकताच वाढदिवस झाला तेव्हा बेबोने त्याचा हा क्युट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

दरम्यान हॉलीवूड काय आणि बॉलीवूड काय सगळीकडेच कोरोना व्हायरसमुळे घबराट पसरल्याचं चित्र दिसत आहे. पण हॉलीवूड अभिनेता टॉम हँक्सने सांगितल्याप्रमाणे एकमेकांची काळजी घ्या आणि या व्हायरसला आपण नक्कीच मात देऊ.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.