उदय टिकेकर यांचं मराठीत पुनरागमन

उदय टिकेकर यांचं मराठीत पुनरागमन

मराठी आणि हिंदी सिनेमा व टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे उदय टिकेकर. आता उदय टिकेकर एका मराठी वाहिनीवरील मालिकेतून पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.

टीव्हीवर सध्या गाजत असलेल्या जीव झाला येडा पिसा या मालिकेतील नायकाच्या वडिलांची भूमिका आता उदय टिकेकर साकारत आहेत. आपल्या सुनेच्या मागे वडीलांप्रमाणे नेहमी खंबीर उभा राहणाऱ्या, शिस्तप्रिय, प्रेमळ, सगळ्यांना समजून घेणारा पण वेळप्रसंगी खडसावून सांगणारा अश्या पात्राच्या भूमिकेला टिकेकर योग्यतो न्याय देतील अशी आपल्या सर्वांना खात्री आहे. नवीन मालिका आणि नवीन सहकलाकारांबरोबर टिकेकर नवीन प्रेक्षकवर्ग निर्माण करतील आणि त्यांच्या मनात आणखी एका नव्या पात्राच्या रूपाने घर करून राहतील एवढं मात्र नक्की. उदय यांच्या आधी ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी करत होते. 

या मराठीतील पुनरागमनाबाबत विचारलं असता उदय टिकेकर म्हणाले की, "नेहमीच मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात, देवाच्या कृपेने आईवडिलांच्या कृपेने आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादाने मला आणखीन एकदा वेगळी अनोखी भूमिका करायला मिळतीये. खूप आनंद होतोय मला आणखीन एकदा वेगळी भूमिका करण्यात. आजपर्यंत साकारलेल्या कॅरेक्टरपेक्षा अतिशय वेगळं हे कॅरेक्टर आहे, दिसायलाही वेगळं आहे स्वभावात ही वेगळेपणा आहे, अनेक रंग अनेक पैलू आहेत त्या कॅरेक्टरला. माझ्या पहिल्या चार भागांमध्येच प्रेक्षकांचा इतका प्रचंड प्रतिसाद मला मिळालाय, इतके फोन्स इतक्या शुभेच्छा मला मिळाल्यात. सगळ्यांचा मी आभारी आहे. असेच वेगवेगळया भूमिका साकारण्याचा प्रयत्न देवाच्या कृपेने आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने मी चालू ठेवीन."

कसौटीच्या सेटवरही खास सेलिब्रेशन

उदय टिकेकरांचं मराठीमध्ये तर पुनरागमन झालंच आहे पण त्यांना हिंदी मालिकेतही भरपूर प्रेम मिळतंय. नुकताच कसौटी जिंदगी की या मालिकेच्या सेटवर उदय यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं. या सेलिब्रेशनमध्ये त्यांच्या ऑनस्क्रीन कुटुंबाने खास सहभाग घेतला. उदय या मालिकेत मलॉय बासूची भूमिका करत आहेत. याचे फोटोजही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. पाहा हे फोटोज.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.