ब्रेकअप झाल्याच्या चर्चेदरम्यान Nach Baliye 9 च्या मंचावर दिसली ही जोडी

ब्रेकअप झाल्याच्या चर्चेदरम्यान Nach Baliye 9 च्या मंचावर दिसली ही जोडी

सध्या टीआरपीच्या रेटींग्ज्समध्ये वर असलेली हिंदी मालिका म्हणजे कसौटी जिंदगी की 2 या सीरियलमधील अनुराग आणि प्रेरणाची जोडी प्रेक्षकांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. लवकरच ही जोडी म्हणजेच पार्थ समथान (Parth Samthaan) आणि एरिका फर्नांडीस (Erica Fernandes) नच बलिए 9 च्या मंचावर थिरकताना दिसणार आहे. या शोमध्ये येऊन एरिका आणि पार्थ रोमँटीक गाण्यावर दमदार परफॉर्म करणार आहेत. 

पार्थ आणि एरिकाचा ब्रेकअप

कसौटी जिंदगी की 2 चे हे प्रमुख कलाकार पार्थ समथान आणि एरिका फर्नांडीस सतत काही ना काही कारणाने चर्चेत असतात. नुकतंच या दोघांचा ब्रेकअप झाल्याचीही चर्चा आहे. या चर्चेमुळे या दोघांच्या प्रत्येक बातमीवर त्यांच्या फॅन्सचं लक्ष असतं. सूत्रानुसार, पार्थ आणि एरिका आता वेगळे झाले आहेत. पण या दोघांनीही ब्रेकअपच्या बातमीवर कोणतंही रिएक्शन दिलेलं नाही. पण जर तुम्ही या दोघांना एकत्र पाहू इच्छित असाल तर लवकरच ही जोडी नच बलिए 9 मध्ये गेस्ट म्हणून येणार असून एक रोमँटीक परफॉर्मन्सही देणार आहेत.

नच करताना दिसणार पार्थ आणि एरिका

शोच्या मेकर्सनी या स्पेशल एपिसोडचा प्रोमोही रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये एरिका आणि पार्थची ही आधीपेक्षाही जास्त दमदार दिसत आहे. या प्रोमोमध्ये एरिका आणि पार्थने किंग खान शाहरूखच्या झिरो चित्रपटातील मेरे नाम तू या सुंदर गाण्यावर परफॉर्म केलं आहे. या गाण्यावर परफॉर्म करताना एरिका आणि पार्थ एकमेकांमध्ये इतके बुडून गेले आणि या परफॉर्मन्सनंतर सर्व जजेसनी त्यांची भरभरून तारीफही केली. मुख्य म्हणजे पार्थ आणि एरिका म्हणजे अनुप्रेरणाच्या एंट्रीला उर्वशी ढोलकिया खास कोमोलिकाच्या अवतारात दिसणार आहे. पाहा या दोघांच्या रोमँटीक परफॉर्मन्सची झलक…

आता हा प्रोमो पाहिल्यावर तर असं अजिबात वाटत नाहीयं की, या दोघांमध्ये नक्की ब्रेकअप किंवा काही भांडण झालंय.

कसौटीच्या सेटवर जुळली जोडी

पार्थ आणि एरिकाची भेटही एकता कपूरची मालिका कसौटी जिंदगी की 2 च्या सेटवर झाली होती आणि इथेच दोघांची मैत्री झाली. त्यानंतर हे दोघं एकमेंकाना डेट करत असल्याच्या बातम्याही येत होत्या. हे दोघं एकमेंकासोबत बराच क्वालीटी टाईम स्पेंड करताना दिसत असत. पण या खरंच हे दोघंही एकमेंकासोबत खूप छान दिसतात. 

Instagram