ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अभिनेता ज्यांनी ऑनस्क्रिन गाजवल्या महिलांच्या भूमिका, दिसतात सुंदर

अभिनेता ज्यांनी ऑनस्क्रिन गाजवल्या महिलांच्या भूमिका, दिसतात सुंदर

बॉलीवूडमधील अभिनेता म्हटला की तो अगदी हँडसम आणि तुफान अॅक्शन करणारा किंवा चॉकलेट बॉय अशा अनेक उपाधी देण्यात येतात. प्रत्येक अभिनेत्याची कोणते ना कोणते तरी वैशिष्ट्य असतेच.  काहींची कॉमेडी तर काहींचे अॅक्शन सीन तर काहींचे रोमँटिक सीन प्रेक्षकांना आवडतात. पण त्यापैकी काही अभिनेता असे आहेत ज्यांनी महिलांच्या भूमिकेत कमाल काम तर केलेच त्याशिवाय महिलांच्या वेशात हे अभिनेता इतके सुंदर दिसले की प्रेक्षकांनी या अभिनेत्यांना या भूमिकेत अक्षरशः डोक्यावर उचलून धरले. तर काही अभिनेत्यांनी भूमिकेची गरज म्हणून महिलांच्या वेशात काम केले मात्र प्रेक्षकांना त्यांची ही भूमिका भावली नाही.  पण असे काही अभिनेता ज्यांना ऑनस्क्रिन महिलांच्या भूमिका गाजवल्या त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊ

कमल हसन

चाची 420 हा चित्रपट पाहिला नाही असा माणूस विरळाच. या चित्रपटाने तुफान यश मिळवले. पण या यशाचा खरा धनी ठरला होता तो कमल हसन. कमल हसनने चाचीची भूमिका इतकी सुंदर साकारली होती की, त्या वेशभूषेत कमल हसनला ओळखणेही कठीण होते. कमल हसनच्या मेकअपला त्यावेळी खूप वेळ लागत होता असे त्याने एका मुलाखतीमध्येही सांगितले होते. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही तुफान यश मिळवले होते. चाचीच्या भूमिकेतील कमल हसनने बाईच्या लकबी, बोलणं आणि अदा या सगळ्या इतक्या आत्मसात केल्या होत्या की कमल हसनची ही भूमिका प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहील. इतकंच नाही कमल हसनला या भूमिकेसाठी अनेक पुरस्कारही मिळाले होते. हा चित्रपट नव्वदच्या दशकात सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक ठरला होता. 

गोविंदा

कॉमेडी म्हटलं की सर्वात पहिले बॉलीवूडमध्ये कोणत्याही हिरोचं नाव डोळ्यासमोर येत असेल तर ते म्हणजे गोविंदाचं.  गोविंदाने अनेक कॉमेडी चित्रपट केले आहेत. त्यापैकीच त्याचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘आँटी नं. 1’.  या चित्रपटामध्ये गोविंदाने केलेली आंटीची भूमिका ही अतिशय लोकप्रिय झाली. मराठी नाटक मोरूची मावशीवरून निर्माण केलेला हा चित्रपट हिंदीतही खूपच यशस्वी ठरला.  तर गोविंदाने साकरलेली आँटी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. गोविंदाने कुठेही या वेशभूषेत अथवा या भूमिकेला वल्गरपणा येऊ दिलेला नाही. गोविंदाची ही भूमिका आणि हा चित्रपट आजही टीव्हीवर लागला तरी अतिशय आवडीने प्रेक्षक पाहतात. 

रीनाच्या “इन्स्टा लाईव्ह” चा बोलबाला… चक्क भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहलची हजेरी

ADVERTISEMENT

रितेश देशमुख

रितेश देशमुखचा ‘अपना सपना मनी मनी’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्यातील रितेशने साकारलेली महिलेची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. रितेश महिलेच्या वेशभूषेत अधिक सुंदर दिसतो अशा अनेक प्रतिक्रिया त्यावेळीही देण्यात आल्या होत्या. रितेशने ही भूमिका साकारताना खूपच मेहनत घेतली होती आणि त्या मेहनतीचं त्याला फळंही मिळालं होतं.  बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी झाला होता. खास रितेशची भूमिका बघायला प्रेक्षक सिनेमागृहात गेले होते. तसंच त्यानंतर रितेशला बऱ्याचशा अशा भूमिकांचा प्रस्तावही आला होता असं रितेशने एका मुलाखतीतही सांगितलं होतं. रितेशने ही भूमिका खूपच उत्तम वठवली होती आणि त्यात कोणताही वल्गरपणा येऊ दिला नव्हता. 

कुलदीप सिंगने ‘या’ कारणासाठी सोडली विघ्नहर्ता गणेश मालिका

आमिर खान

बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननेदेखील एका चित्रपटात महिलेची भूमिका साकारली आहे. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाजी’ या चित्रपटात ज्युली ही व्यक्तिरेखा आमिर खानने साकारली होती. शत्रूशी लढण्यासाठी त्या भूमिकेची गरज म्हणून आमिरने ही भूमिका साकारली होती. आमिर या मुलीच्या या गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसला होता. त्यावेळी त्याने खूपच लाऊड मेकअप या भूमिकेसाठी केला होता. इतकंच नाही तर काही जाहिरातींंमध्येही आमिरने मुलीची भूमिका केली आहे.

ADVERTISEMENT

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींच्या डोळ्यांनी जिंकली आहेत अनेकांची मनं

सचिन पिळगावकर

‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी शान आहे. या चित्रपटातील सचिन पिळगावरने साकारलेली सुधा आजही प्रेक्षकांंना भावते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 31 वर्ष झाली आहेत. पण आजही अगदी पुढची पिढीही तितक्याच आवडीने  हा चित्रपट बघते. इतकेच नाही तर साधारण दोन दशकांपूर्वीच्या पिढीला आजही या चित्रपटाचे प्रत्येक संवाद पाठ आहेत. यामध्ये सचिन पिळगावकर सुधाच्या भूमिकेत खूपच सुंदर दिसला असून अगदी मुलीलाही लाजवेल इतकी सुंदर लकब त्याने आत्मसात केली होती. तर त्याला लक्ष्मीकांत बेर्डेनेही पार्वतीच्या भूमिकेत उत्तम साथ दिली होती. 

03 Aug 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT