मिसेस मुख्यमंत्रीमधील सुमीचा ऑफस्क्रीन लुक

मिसेस मुख्यमंत्रीमधील सुमीचा ऑफस्क्रीन लुक

मिसेस मुख्यमंत्री ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. एवढंच नाही या मालिकेतील सुमीचं पात्र हे प्रेक्षकांना अगदी आपल्या घरातीलच वाटत आहे. या मालिकेत समर आणि सुमी हे लव्ह कपल दाखवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री असलेला समर एका खानावळ चालवणाऱ्या सुमीच्या प्रेमात पडतो. दोन भिन्न स्वभाव आणि लाईफस्टाईलच्या व्यक्तींमध्ये होणारं प्रेम, लग्न आणि लग्नानंतरच्या गमतीजमती असं या मालिकेचं कथानक आहे. काही महिन्यांपूर्वी या मालिकेतून सुमी आणि समरच्या  लग्नाची धुम दाखवण्यात आली होती. अगदी प्री-वेडिंग फोटोशूटपासून लग्नाच्या वरातीपर्यंतचे सर्व विधी असा थाटमाट या मालिकेतून दाखवण्यात आला. या लग्नसोहळ्याचा इतर मालिकेप्रमाणे विशेष भाग प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यामुळे या मालिकेबद्दल अधिकच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. या मालिकेतील लग्नसोहळ्याला सोशल मीडियावरही चांगला प्रतिसाद मिळाला. 

View this post on Instagram

Safarnama 💚

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongadeofficial) on

View this post on Instagram

😎

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongadeofficial) on

मिसेस मुख्यमंत्रीमधील समरची सुमी

मिसेस मुख्यमंत्री मालिकेत समरची भूमिका अभिनेता तेजस बर्वे तर सुमीची भूमिका अभिनेत्री अमृता धोंगडे साकारत आहे. अमृताने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. ज्यामुळे आता ती सुमी या नावाने महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. साधी, भोळी मात्र हुशार असलेली सुमी प्रेक्षकांना सध्या फारच आवडत आहे. ही सुमी साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे ही मुळची कोल्हापूरमध्ये राहणारी आहे. तिने तिचं शालेय शिक्षण पुण्यातून केलं आहे. मिसेस मुख्यमंत्री मालिकेत काम करण्यापूर्वी तिने एका मराठी चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाचं नाव मिथुन असं होतं. मात्र मिसेस मुख्यमंत्री ही मालिका तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरली.

 

अमृताचा बोल्ड अवतार

सुमी म्हणजेच अमृता खऱ्या आयुष्यात देखील सुमीप्रमाणेच खट्याळ आणि मनमोकळ्या स्वभावाची आहे. ज्यामुळे ती ऑफस्क्रीन सेटवरही तितकीच धमाल करते.  अमृताच्या लुकबाबत विचार केल्यास मात्र ती सुमीपेक्षा फारच निराळी आहे. कारण  मालिकेत सरळ साध्या सुमीची भूमिका साकारणारी अमृता तिच्या खऱ्या जीवनात मात्र ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. सध्या अमृता या मालिकेप्रमाणेच तिच्या स्टाइलस्टेटमुळे सुद्धा प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये  लोकप्रिय होत आहे. अमृताने तिच्या सोशल मीडियावर कॅज्युअल आऊटफिटमध्ये काही फोटोज पोस्ट पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिने कॅज्युअल आऊटफिट, शूज आणि त्याला साजेसा मेकअपमध्ये दिसत आहे. मालिकेतील सुमीप्रमाणेच या लुकमध्येही अमृताचं सौंदर्य तितकंच खुलून दिसत आहे. ज्यामुळे ऑनस्क्रीन सुमीप्रमाणेच ऑफस्क्रीन कॅज्युअल अवतारमध्ये दिसणाऱ्या अमृतालाही प्रेक्षक चांगलीच पसंती देत आहेत. थोडक्यात सुमीच्या या कॅज्युअल लुकला सोशल मीडियावर भरपूर लाईक्स मिळत आहेत. ज्यामुळे भविष्यात अमृताला सुमीपेक्षा  वेगळ्या भूमिकेतून नक्कीच पाहण्याची संधी मिळेल.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

छपाक'नंतर दीपिकाची लागली या रिमेक चित्रपटात वर्णी

मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच झळकणार ही बापलेकाची जोडी

‘सावित्रीजोती’चा महापरिवर्तक लग्नसोहळा, प्रेक्षक अनुभवणार अविस्मरणीय क्षण