माझी बाजू कोणालाच नाही माहीत, पहिल्यांदाच अंकिता बोलली ब्रेकअपबाबत

माझी बाजू कोणालाच नाही माहीत, पहिल्यांदाच अंकिता बोलली ब्रेकअपबाबत

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता जवळपास 9 महिने झाले आहेत. तरीही त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडे आणि सुशांत यांचे नक्की ब्रेकअप का झाले याची चर्चा अजूनही सुरू असते. पण अंकिताने पहिल्यांदाच याबाबत आपली चुप्पी तोडली आहे. सुशांतबाबत तिला ट्रोल करणाऱ्यांना अंकिताने अनेक प्रश्न विचारले आहेत. जेव्हा सुशांत तिला सोडून गेला होता तेव्हा हे सर्व लोक कुठे होते? 2016 मध्ये सुशांतने अंकितापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सुशांतचा होता असं अंकिताने सांगितले. गेलेल्या माणसाबद्दल आपल्या मनात कोणताही राग नाही. पण आपण काय सहन केले आहे हे कधीच कोणाला सांगितले नाही. सुशांतने अंकिताला न निवडता करिअर निवडले आणि तो पुढे निघून गेला. पण त्यानंतर या नात्याचा नक्की आपल्यावर काय परिणाम झाला याबाबत पहिल्यांदाच अंकिताने सांगितले आहे. 

माझी बाजू कोणालाच माहीत नाही - अंकिता

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने आपली बाजू मांडली. ‘या परिस्थितीत गप्प राहणंच चांगलं आहे असं मला वाटलं होतं. कारण कोणत्याही नात्याची एक पवित्रता असते. मी एक अशी व्यक्ती आहे, जी जगासमोर आपल्या आयुष्याचा तमाशा बनवू इच्छित नाही. हा त्यावेळी अनेकांनी मला चुकीचे मानले. लोक आजही मला म्हणतात, की मी सुशांतला सोडले. पण माझी बाजू कोणालाच माहीत नाही. मी सुशांतला सोडले नाही तर त्याने मला सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मला त्याच्यासह लग्न करायचे होते. त्यावेळी बाजीराव मस्तानीसारखे चित्रपटही मी यासाठी सोडले होते. जेव्हा सुशांत मला सोडून गेला आणि मी नैराश्यात गेले तेव्हा हे सगळे लोक कुठे होते?’

'Dance Deewane 3' मध्ये मराठी पाऊल पडते पुढे...

ती वेळ माझ्यासाठी अत्यंत वाईट

अंकिताने पुढे असंही सांगितलं की, ‘मी इथे कोणालाच दोष देत नाही. सुशांतला पुढे जायचं होतं आणि हे त्याने स्पष्टपणे सांगितलं होतं. तो करिअरच्या मागे निघून गेला. पण त्यापुढची अडीच वर्ष मी कशी काढली माझी मलाच माहीत. मी शरीराने फक्त काम करत होते. पुढे जाणं माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. त्यामुळे मी नंतर कोणतं कामही केलं नाही. पण माझ्याबरोबर माझं कुटुंब ठामपणे उभं राहीलंं. मी त्याला दोष दिला नाही. पण मी परिस्थितीशी अत्यंत वाईटरित्या झुंज दिली. या सगळ्यातून बाहेर यायला मला खूपच वेळ लागला. मला वाटलं माझ्यासाठी सगळं काही संपलं आहे. त्यावेळी अनेकदा माझ्या मनात आत्महत्येचेही विचार आले. पण ही माझ्यासाठी एका चांगल्या गोष्टीची सुरूवात होती हे कळायला मला वेळ लागला. त्यानंतरही मी सुशांतच्या कुटुंबीयांची काळजी घेतली आणि नेहमी घेत राहीन. कारण त्यांच्यासह माझे नाते हे वेगळे आहे. सुशांतबाबत माझ्या मानत राग नाही. पण मला दोष देण्याइतकं मी काहीही केलं नाही.’

अभिनेता विद्युत जामवालचा शिवशंकर अवतार, चाहत्यांनी दिल्या या प्रतिक्रिया

लवकरच करणार विकी जैनशी लग्न

सुशांतनंतर अंकिताच्या आयुष्यात प्रेम घेऊन आला तो विकी जैन. अगदी सुशांतच्या जाण्यानंतरही विकीने अंकिताला व्यवस्थित सांभाळले. सुशांतच्या आत्महत्येनंतरही कितीतरी लोकांना ट्रोल केल्यानंतरही विकीने ही परिस्थिती उत्तमरित्या हाताळली. आता अंकिता या सगळ्यातून पूर्णतः बाहेर आली असून लवकरच ती विकीशी लग्न करणार आहे. सुशांत हा आपला भूतकाळ होता आणि यातून बाहेर येण्यासाठी आपण खूपच प्रयत्न केले असल्याचेही अंकिताने सांगितले. सुशांतवर आपलं प्रेम होतं आणि कायम तसंच राहील असंही अंकिता म्हणाली. सुशांतच्या आत्महत्येनंतरही अंकिता पूर्ण उद्धस्त झाली होती. पण तिच्या कुटुंबीयांची साथ आणि विकीच्या प्रेमामुळेच ती स्वतःला सावरू शकली. 

टाईमपास 3 लवकरच येणार का प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक