अंकिता लोखंडे करत आहे सुशांतची स्वप्नं पूर्ण, उचलले पहिले पाऊल

अंकिता लोखंडे करत आहे सुशांतची स्वप्नं पूर्ण, उचलले पहिले पाऊल

सुशांतच्या मृत्यूनंतर सुरूवातीपासूनच त्याच्या कुटुंबासह त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे उभी राहिली. सुशांत नक्की कसा होता हे अंकिताने ठामपणे सर्वांसमोर येऊन सांगितले. आता सुशांतची स्वप्नं पूर्ण करण्यासाठीही अंकिता पुढे सरसावली आहे. सुशांत आपल्या आयुष्यात बरंच काही करू इच्छित होता. त्याने आपली 50 स्वप्नं डायरीमध्ये लिहून ठेवली होती. त्यांची एक यादीच बनवली होती. त्यापैकी काही स्वप्नं त्याने पूर्ण केलीही होती. तर त्याची काही स्वप्नं ही तशीच अपूर्ण राहिली आहेत. या यादीतील त्याची काही स्वप्नं आता अंकिता पूर्ण करत आहे. त्यापैकी सुशांतचे एक स्वप्नं होते ते 1000 झाडे लावणे. त्याचे हे स्वप्नं अंकिता आता पूर्ण करत आहे. इतकंच नाही तर तिने यासाठी सगळ्यांना साथ देण्याचीही विनंती केली आहे.

Love is in the air: चारू आणि राजीव पुन्हा एकत्र, प्रेमाच्या वर्षावाचे व्हिडिओ व्हायरल

सुशांतचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी केली सुरूवात

सुशांतची काही अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंकिता आता सरसावली आहे. नुकताच अंकिताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती आपल्या आईबरोबर रोपं खरेदी करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ कॅप्चर करत असताना अंकिताचा आवाजही येत आहे, ‘सर्वांना संदेश द्या, झाडे लावा. सुशांतच्या 50 स्वप्नांपैकी त्याचे हे एख स्वप्नं होते की,  1000 झाडे त्याला लावायची होती. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या घरापासून सुरूवात केली आहे आणि मला आशा आहे की, तुम्ही सर्वजणही झाडे लावाल.’ अंकिता आणि सुशांतचे ब्रेकअप झाल्यानंतरही अंकिताने नेहमीच सुशांतसाठी चांगलीच प्रार्थना केली. अंकिताचं व्यावसायिक विकी जैनबरोबर लग्न ठरलं असूनही अंकिताच्या मनातील सुशांतची जागा कोणीही घेऊ शकत नाही हे सिद्ध झालं आहे. अंकिताने सुशांतला खूपच चांगली साथ दिली होती. मात्र काही कारणाने या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही आणि ब्रेकअप झालं. पण सुशांतच्या अशा जाण्याची रूखरूख अंकिताला नक्कीच लागून राहिली आहे. 

संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटात पार्थ समथान साकारणार मुख्य भूमिका

पुन्हा टेलिकास्ट होणार पवित्र रिश्ता

अंकिता आणि सुशांतची पहिली भेट झाली ती एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर. तिथेच त्यांची मन जुळली. सुशांत आणि अंकिताची जोडी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली होती. ही मालिकाही खूप वर्ष चालू होती. दोघेही सहा वर्षे नात्यात होते. पण शेवटी हे नातं टिकू शकलं नाही. पण तरीही सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता त्याच्या कुटुंबाला साथ देत आहे. ही गोष्टही तिच्या चाहत्यांना खूपच भावूक करून गेली आहे. या दोघांना एकत्र पाहणं प्रेक्षकांना आवडतं. त्यामुळेच आता पुन्हा एकदा ही मालिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मालिका आता पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचं अंकिताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा आता प्रेक्षक या मालिकेला नक्कीच भरभरून प्रतिसाद देतील असा विश्वासही तिला वाटत आहे. सुशांतच्या आता काही इच्छा पूर्ण करण्यासाठी अंकिता पुढे आली असून ती कायम सुशांतला न्याय मिळावा यासाठी पोस्ट करत असते. 

टायगर सिंगर होतो तेव्हा.. या गाण्यातून पदार्पण

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा