‘जुनं ते सोनं' म्हणत भाग्यश्री मोटेने केले फोटो शेअर, सोशल मीडियावर व्हायरल

‘जुनं ते सोनं' म्हणत भाग्यश्री मोटेने केले फोटो शेअर, सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या जरी कोणत्याही मालिकेत अथवा चित्रपटात दिसत नसली तरीही सोशल मीडियावर मात्र तिचाच बोलबोला असल्याचं वाटत आहे.’ भाग्यश्रीने दोन फोटो शेअर केले असून या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. भाग्यश्री मोटे नेहमीच आपल्या अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. तिच्या या फोटोंमुळे पुन्हा हे सिद्ध झाले आहे. भाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटो व्हायरल झाले असून तिचे चाहते या फोटोंवर अनेक कमेंट्सही करत आहेत.

प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकला विवाहबंधनात, चाहत्यांना सुखद धक्का

स्वतंत्र आणि वाईल्ड असल्याचे भाग्यश्रीचे मत

भाग्यश्री नेहमीच तिच्या सोशल अकाऊंटवर फोटो शेअर करत असते. भाग्यश्रीचे अनेक चाहते आहेत. सध्या कोणत्याही मालिकेमध्ये काम करत नसली तरीही ती सोशल मीडियावर व्यग्र असते. भाग्यश्रीचे केवळ फोटोच नाहीत तर तिने फोटोला दिलेल्या कॅप्शनही तितक्यात बिनधास्त आणि बोल्ड असतात. आपण स्वतंत्र आणि वाईल्ड असल्याची कॅप्शन तिने एका फोटोला दिली आहे. तर जुने फोटो शेअर करत भाग्यश्री म्हणाली, ‘जुन्या कलेक्शनमधील’...इतकंच नाही तर हा फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर काय कमेंट्स येतील याचीही कल्पना भाग्यश्रीला असावी. त्यामुळेच तिने हॅशटॅग निवडतानाही अत्यंत बिनधास्तपणे #letthehaterstalk #behindmyback असेच वापरले आहेत. यावरूनच आपल्याला हवं तेच आपण करणार. कोणालाही जे काही बोलायचं असेल ते बोला, आपण घाबरत नाही असंच भाग्यश्रीने कोणालाही न उद्देशून एक प्रकारे दाखवूच दिले आहे. इतकंच नाही तर भाग्यश्री नेहमीच आपले बोल्ड आणि ब्युटीफूल फोटो पोस्ट  करत असते. भाग्यश्रीचे अनेक फॉलोअर्स आहेत.

अभिनेत्री दीपिका कक्कर हिवाळ्यात ओठांची घेते अशी काळजी

 

लवकरच नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार

भाग्यश्रीने आपल्या सोशल मीडियावर आपण लवकरच एक नवा प्रोजेक्ट घेऊन येत असल्याचे फोटो शेअर करत म्हटले आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसाचा फोटो तिने शेअर केला असून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नाही. ‘एकदम कडक’ चे दुसरे शेड्युल चालू झाल्याचे तिने म्हटले आहे. आपण लवकरच काहीतरी हिट देणार आहोत असंही तिने हॅशटॅगमध्ये म्हटले आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी मालिकांमधूनही भाग्यश्रीने आपल्या अभिनयाची चमक दाखवून दिली आहे. ‘देवयानी’ या मराठी मालिकेतून घराघरात पोहचलेली भाग्यश्रीचे मनमोहक आणि घायाळ करणारे फोटो नेहमीच सर्वांना आवडताना दिसतात. तर पाटील, देवा श्री गणेशा, काय रे रास्कला, माझ्या बायकोचा प्रियकर यासारख्या चित्रपटातूनही भाग्यश्री प्रेक्षकांना दिसली आहे. इतकंच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटातही भाग्यश्री झळकली असून नुकताच तिचा तेलुगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू हा प्रसिद्ध झाला होता. भाग्यश्री नेहमीच आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. यावर्षी भाग्यश्रीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येईल अशीच तिच्या चाहत्यांची तिच्यासाठी इच्छा आहे. त्यामुळे या नव्या वर्षात भाग्यश्री कोणते कोणते नवे प्रोजेक्ट करते याचीच चाहत्यांनाही उत्सुकता लागून राहिली आहे.

मुलगी झाली हो! विराटच्या भावाने शेअर केली मुलीची झलक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक